॥1॥७॥ 8॥१॥)॥५ ()॥५॥४/८॥२5७/१|_ (3२,५२४ 0) 192531 २०) १०० हि ॥४७0/॥५] काही पाण सें [ स्फुट लेख ] सदाशिव विनायक देशपांडे मूल्य सव्वा रुपया प्रथ' वृत्ति: १९४५ ग्र || सर्वाधिकार .सुरक्षित च | प्रकाशक केशव भिकाजी ढवळे भ्रीसम्थ-सदन, गिरगांव, मुंबई ....$ मुद्रक जयराम दिए"री देसाई राष्ट्रवेभव प्रेस, गिरगांव, मुंबई तोंड ओळख ज्या जातींचीं माणसे येथे चित्रित केलीं आहेत त्यांची थोडी फार तोंडओळख प्रत्येकाला असतेच. जवळून सूश्मपणे पाहाणारांना तीं जास्त स्पष्टपणें दिसतात, इतकेंच. ह्यांपेकीं कांहीं पूर्वीच पाहाण्यांत आलीं आहेत. त्यांच्या भरतीला कांहीं नवीन आणून त्यांचा ' संग्रह केला आहे. त्यांचे स्वरूप प्रत्यक्षच दिसत असल्यानं त्यांचे अधिक वर्णन नको. ' संग्रह ! करण्यास ज्यांनीं अमोल सहाय्य केले त्यांचं तण मात्र फिटण्यासारखें नाहीं. इति शम । स. वि. देशपांडे भामचा टपाळवाला वाटचा भिकारी ... गुन्हेगार गवळी ... वेडा हसन्या ... पा्हेल छाके ... भामचा दिपी .., आंधळी क दक्षिणी आणि गुजराथी कळाकार कोल्हटकर १० वाड्ायांतीळ सावरकर १५ स्टॅकिन विरुद्ध टॉटस्की ५२ मास्तर १२३ अंबादास १४ हवे इंग्रज १५ संगीत रत्न १६ पोऱ्या “9 ६ ७ 60. ७४. बट. .»४७.. /९ ० 4 | _आमचा टपालबाला | टपालवाला | आमच्या टपालवाल्यासंबंधीं मला अलीकडे फारच आदर वाटत चालला आहे. इतकेंच नव्हे, तर त्याला पाहातांच किंवा त्याचें स्मरण होतांच माझ्या मनांत त्याच्याविषयीं स्नेहभाव जाग्रत होतो. तसें म्हटलें तर टपालवाल्यासंबंधीं विशेष कांहीं वाटण्याचे कारणच काय १ सरारनें दिलेले, आंगाच्या प्रमाणाशीं कोणतेंही प्रमाण न सांभाळणारे डगळे आंगावर चढवावयार्‍चे, तांबड्या पट्टीचे मुंडासे डोकीला बांधाबयाचें व रोज सकाळीं पायपीट करीत घरोघर पत्रे टाकीत चाळू लागावयाचें. कित्येकांची सुखदुःखे त्या पत्रांतून तो व्यक्तीव्यक्तीला पोचवीत असेल. कोणाकोणाला कायकाय गमतीजमती पत्रांतून आढळत असतील, आपल्या हातांतील एवढ्याशा कागदाच्या कपस्याकरितां किती आसावलेलीं मनें आतुरतेने वाट पाहात असतील, त्यांच्या परिपूण झालेल्या ह्यृदयवृत्ति अभावितपणे आपणांला कसा मूक आशीवाद देत असतील, किंबा पत्राच्या अभाबानें नकळत आ॥ं१...भ कितीकांचा उत्साहदभंग होत असेल व त्या लोकांचे शिव्याशापही कदाचित अदृष्टरूपाने कसे भोवती वावरत असतील, कसळी कसलीच दखल त्याला नसते. एखाद्या स्थितप्रज्ञ योग्याच्या निर्विकारतेने तो बटवड्याचें काम करीत असतो, कोणी निंदा अगर कोणी वंदा, त्याचा आपला ' पोटाचा धंदा ' शांतपणे अखंड चाळू. त्या निंदक-वबंदकांच्या यादींत केव्हां केव्हां माझेही नांब घालण्यासारखे असणारच, कारण अनुकूल पत्र आल्यास बरें वाटावे व पत्राची अपेक्षा असून पत्र न आल्यास हिरमोड व्हावा ह्या मानवी दुबलतेंतून मी सुटलो आहें थोडाच ! पण आजचा माझा आदर किंत्रा स्नेहभाव त्याबद्दल नाहीं. कोठल्याही अनुकूल अभिप्रायांचीं पत्रे त्यानें मला अजून दिलीं नाहींत. कोठल्याही संपादकांचे प्रसंशोद्रार त्याने मला पोचवावेत, असें झालें नाहीं. खरें म्हटलें तर “ साभार परत? मजकूरच वारंवार त्यानें आणला असेल. आपल्या हातांतील जाडजूड टपाल देतांना त्याला गंमत वाटली असेल, पण तें टपाल लांबून पाहूनच आम्हीं ओळखावे, कीं आलें कांहींतरी वाण परत ! पण आतां ह्यांतील कांहींच घडलें नाहीं; आजच्या वृत्ति आहेत त्या वेगळ्याच - शै -- क॑डीं माणसें ची कारणानें. एके दियशीं अगदीं भर मध्यान्दींच्या वेळीं आमच्या टपालवाल्याची स्वारी आनच्या दारावरून चालली होती. हातांत अद्याप वांटावयाच्या पत्रांचा संच होता. माझें अर्थातच कांहीं टपाल नव्हतें. त्याने हसत हसत, झून्यपणें तें केव्हांच सुचविले होते. परंतु मध्यान्हीची वेळ, लोकांची जेवणीखाणींही होऊन गेलेली व ही स्वारी अद्याप पायपीटच करते आहे ! सहजच थोडासा कळवळा आला. थोडासा कनवाळूपणा दाखवायला काय खच होतें १ फुकटांत चांगुलपणा कां न घ्या ! म्हटलें, “ काय टपाल्ाले, अजून तुमचं काम संपलं नाहीं १ बारा वाजून गेले. रोज असाच का उशीर होतो १” “' होय साहेब, रोजचंच आहे हें. सकाळीं सहा वाजतां पोस्टांत ज्ञावे तें आठाला पत्रांचा गठ्ठा घेऊन बाहेर पडावं. तेव्हांपासून बटवडा करतां करतां रोवटचं पत्र वांटेपावेतों साधारण बाराचा सुमार सहज होतो. मोठा जिल्हा आहि माझा, घरीं जाऊन आंघोळ करावी, देवपूजा करावी, जेवण करावं तों एकदीड होऊन जातो. तों पुनः दोन वाजतां पोस्टांत हजेरी व दुपारचे दुसरे टपाल. पुनः एकदा सर्व जिल्हाभर फिरणं. दुसऱ्या वेळेला पत्रे असतात थोडींच पण सवे घरीं फिरावं तर लागणारच ना! जवळजवळ पांचाचा सुमार होतो, मग मात्र मोकळा होतों मी. बरं येतों ! ” सकाळीं सहापासून सायकाळीं पांच पावेतां वणवण फिरायचे आणि तही उन्हाळा, पावसाळा, हिंवाळा, सर्वे कत्रनूंत सारखेच, काय मर्धे दोन तासांचा अवधि मिळत असेल तो, तुम्ही म्हणाल, ह्यांत विदोष तें काय आहे ? सवच. टपालबाले फिरतात. ह्यांत ह्या एकऱ््याचेंच इतकें कोतुक तें काय ? ह्याच गोष्टीबद्दल का तुम्हांला आदर वाटला ! मला आदर वाटूं लागला तो वेगळ्या कारणानें. आपल्या आयुष्याचें वर्णन करतांना कोठेंही त्याने असमाधानाचचे, त्वेषाचे, संतापाचे उद्गार काढले नाहींत. अगदीं सरळ, साध्या शब्दांत तो बोलत होता. शिवाय त्याच दिवशीं सायंकाळीं मीं त्यास पुनः पाहिलें तों त्यांत किती फरक आढळला ! सकाळचा तो गबाळ टपालवाला कोणीकडे व आतांचा हा स्वच्छ, ठाकठिकीचा पोशास्व केलेला नीटनेटका पुरुष कोणीकडे ! डोकीला स्वच्छ, भगव्या रंगाचा रुमाल, आंगांत घरींच धुतलेला पांढरा सदरा, त्यावर स्वच्छ कोट, नेसत धोतरही निर्मळ, कपाळाला गंधाची टिकली. स्वारी आपल्याशीं गुंगत स्वतःच्या तंद्रीत चालली होती. बहुधा त्या दिवशींचे सायंकालचें त्याचें तें देवदर्शन असावें. कारण ल 4 न्न । आमचा 1. पुनः त्याला मीं पाहिला तो मंदिरांत भजन करतांना. त्यावरून त्याच्या भाविकतेचें वरील अनुमान. आमच्या जवळच्या *दिरांत एकादशीच्या उत.वप्रसंगी अखंड नामसंकीर्तन चाळू असतें व त्यानिमित्ताने अखंड टाळ जाजतो. एकदा सायंकाळीं देवासमोर भजन करीत आमच्या टपालवाले वुबांची स्वारी उभी. पोशाखाचा तोच स्वच्छ थाट; हातांत टाळ, मुखांत ' जयजय विठ्ठल, जयहरि विष्ठळ' असा नामघोष ! बुवा एकटेच आपल्या भजनांत दंग होते, साथीला दसरा कोणीच नव्हता. मनांत म्हटलें, ' हा खरा निष्ठावान. देवाच्या कानीं भजन जातच असलं तर तें याचंच जाईल. खरंच, पुढें व्हावं व देवाबरोबरच ह्यालाही वंदन करावं.' अर्थात हा विचार फार चांगला होता; यण माझ्या पांढरपेशेपणाचा खोटा अभिमान मला तसें करूं देईना ! मनानेच मीं त्याला नमस्कार केला. आतां सांगा, कां बरें अशा व्यक्तीविषयी आदर वाटूं नये ! पोटभरू धंद्याचा हा काळू माणूस मनानें कसा आनंदी निष्ठावान आढळला ! धंद्यावर काय आहे ? माणसाच्या मनाची सुसंस्कृतता ही अनेक वेळां व्यक्तिनिष्ठच असते. विचारांचा भकासपणा नाहीं, बडबडीचा कलकलाट नाहीं, मनाचा भ्यकरपणा नाहीं ! उलट मन प्रसन्न, चित्त शांत ! “: काय टपालवाले, काल रथयात्रिला गेलां होतां का १ ” :< हो, गेलों होतों थोडा अधोरात्रीं पावेता. वाटेंतूनच परतलां. सकाळीं ळवकरच कामावर जावे लागते. ” शांत उत्तर, जेवढें हातून झालें त्यांतच आनंद. वृथा सकाळच्या नोकरीवर कातावण्यापेक्षां ती शांतपर्णे करण्याइतके सामर्थ्य बाकी ठेवून उरला वेळ आपल्या निष्ठेच्या सत्कारणीं लागल्याचेच समाधान ! नाहींतर आमच्यासारखा एखादा बुद्धिवादी--पण जाऊं द्या ! मला आतां माझ्यासारख्या बुद्धिवायाचें वर्णन कोठें करावयाचे आहे १ मी सांगतों आहे तें आमच्या टपालबाल्यासंबंधीं वरच्या त्याच्या वृत्तीमुळे मळा त्याच्याविषयीं खरोखरच आदर वाटतो. मग त्याबद्दल मला कोणी भाबडा म्हटलं तरी चालेल. एखाद्याबद्दल॑ आपले बरें मत होत असतांना जगाचा एखादा शब्द ;ऐकावा लागला तरी तो सोसावा, कारण वाईट मत काय ? तें नेहमींच सर्वांचे होत असतें ! मत चांगलें होणेंच कठीण, २ बाटय़ा भिका | डत | वाट्या भिर भिकारी कोणाला सांगितळें तर खरेंही वाटणार नाहीं असा हा मिकारी आहे. दुसऱ्या कोणाचें कशाला ? प्रत्यक्ष माझ्या दृष्टीनें जर तशी साक्ष दिली नसती तर नुसत्या ऐकीव गोष्टीवरून मींही त्याला भिकारी म्हटलें नसतें. दिसायला माणूस अगदीं भिकाऱ्यासारखा, कळकट पोशाख, दाढी वाढलेली, केसांच्या झिंज्या झालेल्या, डोकीवरच्या अपुऱ्या फाटक्या टोपींतून केस डोकावणारे, आंगाला पाण्याचा स्परदाही न झाल्याने शरीरावर घामटपणाचचीं पुटें चढलेली, मिकाऱ्याचीं आणखीं कोणतीं चिन्हे हवींत ? निदान त्याच्या हातांतील काळ्या किट्ट झोळीकडे पाहून तरी त्याचा धंदा ध्यानीं यावा ना १ पण छे, मिकाऱ्याचें मुख्य चिन्हच त्याच्या ठिकाणीं नव्हते. तो कुणाच्याही दाराशीं, आठोने उभा राहून, दीनवाण्या मुद्रेने ब रडक्या आवाजाने कोणालाही काल्पनिक नांबांनीं हाका मारीत नव्हता, कोणाचीं आर्जवें करीत नव्हता, आपला कंठ रिणवबीत नव्हता, कोणाला त्रास देत नव्ह्ता! तो कोणाजवळ कसलीच याचना करीत नव्हता. उगीच कोणाची याचना करून अपेक्षाभंगाचे दुःख कां भोगा किंवा कोणाचे धिक्काराचे, अपमानास्पद शब्द कां ऐका ? तो स्वतंत्र वृत्तीचा मिकारी होता. लोकांनीं रस्त्यावर फेकून दिलेल्या उष्ट्या खरकट्यांतून तो अन्न वेचून घेत होता ! भाताचीं डिखळें, भाकरीचे तुकडे, जे सापडेल तें नीटनेटकेपणें वेचून, झाडून झटकून तो आपल्या झोळींत भरीत होता ! गायीला सुद्धा आंबोण म्हणून चालेल कीं नाहीं अशा खरकटवाड्यांतून तो आपल्या क्षुधापूर्तीची साधनसामुग्री जमवीत होता. कोणीं सांगितळे असते तर विश्वासही ठेवला नसता, पण प्रत्यक्ष आपल्याच डोळ्यांचा अविश्वास धरण्याचा धीर होईना ! सत्य हें केव्हां केव्हां कल्पनेपेक्षांदहदी अधिक प्रखर असतें. त्या प्रखर सत्याचा साक्षात्कार झाला त्याच वेळेला उपनिषदांतील “ अन्नं ब्रह्म विजानीयात्‌ ह्या वचनाचे स्मरण झालें व मनांत एक विचार आला, कीं “ तो पाहा वाटचा मिकारी समोर अन्नख्पी ब्रह्माचा कसा बारकाईनें शोध करीत आहे; आम्ही अह्मत्रितन करूं वा न करूं, परंतु तो मात्र अन्नरूप ब्रह्माचा ध्यास घेऊन बसला आहे. -- ७ -- बाटचा भिकारी काका ळा त्या अह्माचे अंशन्‌ अंश टिपून वेचून काहून आपल्या गांठीं बांधीत आहे. ! आपलें ब्रह्मसंशोधन संथपणे उरकून, आ'"ब्राजूच्या जगाकडे एकह? दृष्टिक्षेप न करतां तो आपल्या वाटेनें चाळू लागला, त्याचा हा नित्यावाच व्यवसाय आहे. रस्त्याच्या कोपऱ्याला, भिंतीच्या आडोशाला, कोठेंही कांहीं पडलेले असो, तें कोणींही टाकलेले असो, मुकाट्याने वेचून झोळींत टाकावयाचे व रस्त्याला लागावयाचें. भिकाऱ्याला जातपात नाहीं, स्पशोस्पदये नाहीं, स्वच्छास्बच्छ नाहीं, कांहीं नाहीं. त्याच्या लेखीं अन्न ह॑परखद्म. पखझ्म नेहमींच शुद्ध, सोवळे; त्याच्या ठिकाणीं अमंगलता कोठली ! तो कोणाकरितां अन्न गोळा करतो ? तो एकटाच आहे, कीं 3॥णखी कोणी जीव तो पोसतो, कोणास काय ठाऊक ? ह्या जीवांची पृसतपास कोण करणार ! दूरदैनानें कारुण्य उमजावें इतका दरिद्री अवतारहि तो धारण करीत नाहीं. आंगावर लकतऱ्या धारण करून, थंडींत कुडकुडत तो बाहेर पडता आणि आल्या गेल्य़ापाशीं तोंड वेंगाडता, तर त्याला पेपेसा मिळता व दोन बरे घासही त्याच्या मुखीं पडते, पण असला भिक्षेकऱ्याचा धंदा त्याला करावयाचा दिसत नाहीं, कोण्या आंधळ्या पांगळ्यालाही तो बरोबर वागवीत नाहीं. हो तेवढीच लोकांच्या मनांत करुणा अधिक ! मला वाटतें त्याला लोकांची करुणा नको असावी. लोक तरी रस्त्यावर टाकावयाचे अन्नच आपल्या पद्रीं टाकणार ना! दारच्या भिकाऱ्यांच्या नरिबीं उष्ट्याखरकट्यारिवाय काय येणार १ मग तेंच उपरे खरकटें रस्त्यावरच वेचावें, त्यांत निदान मागण्याची लांछनास्पद यातायात तरी नाहीं, असा अभिमानी विचार करून त्यानें ही बिलक्षण रीत आरंभिली असावी. कसेंही असो, कारणें कांहींही असोत, ता कोणीही असो, परंतु ज्या ज्या वेळीं तो मला कोठेंही दिसतो, त्या त्या वेळीं मला त्याची ही अन्न वेचण्याची रीत आठवते व आतां हा जातां जातां कोठचें काय वेंचणार म्हणून माझी दृष्टि सहज एकदा चोफेर फिरून जाते, ा गुन्ह्गार गवळी | गार गवळी | आज सकाळीं आमच्या गवळ्याचा मला मनस्वी राग आला. त्याचें कारण असें झालें: मला सकाळच्या चहाला ताजें दूध मिळालें नाहीं! डोकें शांत ठेवावयास ताज्या दुधाचा गरमगरम चहा हें एवढेंच साधन मजजवळ आणि अद्याप तर ताज्या दुधाचा कांहींच पत्ता नाहीं ! कां बरें राग येऊं नये १ माणसाच्या सोटिकधणाःरा तरी कांहीं मर्यादा आहे कीं नाहीं ? रोजच्या रोज लवकर येण्यासंबंधीं बजावून सांगून सुद्धा ह्या गवळ्याच्या ध्यानींही नाहीं. गवळ्याची जातच असली; वेळेचें भानच नाहीं; इत्यादि इत्यादि, माणसाचा राग एकदा अनिवार झाला व तो दुसर्‍यावर काढावयाचा असला, म्हणजे कोण कशाला कमी करतो ? आमची धुसपुस, पुटपुटणे चाळूच होतें. एकदाची गवळीबुवांची स्वारी आली. बिचाऱ्याचा चेहरा थोडा खिन्न दिसत होता. पाहाणाराला त्याच्या तोंडावर्ची चिंता आढळलीही असती. पण पाहातो कोण व कशाला ! शिवाय आपण रागावलो आहोंत ह्याची नको का त्याला जाणीव व्हायला १ आम्ही जें दूध घेतों ते आम्हांला दूध वेळेवर मिळांवे म्हणून कीं त्याचे खपावे म्हणून ? “: काय रे, किती वेळां तुला सांगितलं दूध वेळेवर आणीत जा म्हणून १ तुझ्या दुधाची वाट पाहात किती वेळ बसून राहूं १ मला कांहीं दुसरा उद्योगधंदा आहे कीं नाहीं १ तुला ठाऊक आहि ना, चहाकरतां मळा ताजं दूध लागतंत १ असा उद्यीर करशील तर कसं काय जमणार बुवा १? मी रागारागाने म्हणालों. £ होय साहेब, झाला खरा थोडासा उशीर आज. आपण अगदीं ताटकळत बसून असाल, हें ध्यानीं येऊन कसं वाईट वाटत होतं पाहा. पण काय करणार ? वाटेने थोडीशी चुकवाचुकबी करून यावं लागलं, त्यामुळे थोडी आडवाट करून येतांना वेळ लागला. रोजच्या सरळ वाटेने आलों असतां तर केव्हांच येऊन पोहोंचलां असतों, पाहा ना!” गवळ्यानें शांतपणे उत्तर दिलें £ अरे, चुकवाचुकवी कुणाची १ काय एखाद्या पठाणाचं क्जेबिजे काढलं आहिस कीं काय ?” मीं जिज्ञातेनं प्रश्न केला. न द्‌ स गुन्हेगार गवळी “: अहो कसचा पठाण? देवाच्या दयेने अद्याप कजे काढण्याचा बाका प्रसंग आला नाहीं, पण सध्या सरकारचे डोकच आमच्यामागें पठ'णासारखे लागतात.” हें बोलतांना तो मोठ्या काकुळतीनें एकेक शब्द .काढीत होता, मला त्याचें बोलणें नीटस समजेना म्हणून मीं नुसताच “ऑ? असा कांहींसा आश्चयोद्वार काहून प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहू लागलों. माझी आस्था पाहून त्यालाही बोलण्याचा धीर आला व तो आपली हकीकत सांगू लागला. तो म्हणाला, “ त्याचं आतां असं झालं आहे, सरकारनें दूध तपास- ण्याचं काढलं आहे यंत्र, हछ़ींच्या काळांत कसलीं कसलीं वतं निघतील भगवान जाणे ! रस्त्यांत कुणीही दूधवाला सापडला, कीं धरतात त्याला व लावतात त्याच्या दुधाला यंत्राची तपासणी ! सरकारनें दुधाचा कस स्वतःच्या मनाशीं जो ठरवला आहे, त्या कसाचं दूध दिसलं नाहीं, कीं दुधांत पाणी मिसळलं ह्या आरोपावरून लगेच त्याला गुन्हेगार धरतात व करतात दंड. काल मी सुद्धा असाच अचानक त्यांच्या हातांत सापडलो. त्यांचं यत्र कांहीं माझ्या दुधाचा सरकारी कस दाखवीना. लगेच ठरलां गुन्हेगार व झाला दुंड ! आतां बघा, दंड कुठून देणार £! शिवाय वर अप्रामाणिक ठरलां तें वेगळंच.” तो हताद चेहरा करून थांबला, “ अरे, मग त्यापेक्षां सरकारी कस येण्याइतकं चांगलं दूध येण्याची व्यवस्था करावी. गुरांना सरक्‍्या-पेंडीचा खुराक चाळू करावा. दु'धांत पाणी मिसळू नये, म्हणजे आपोआपच दूध चांगलं निघतं. . .” माझ्याजवळ उपदेश काय थोडा होता ! एखाद्या व्याख्यात्याच्या आवेशाने मीं भाषण सुरू केलें. :: साहेब, आपण म्हणतां तें ठीक आहे. आतां मी आपणांलाच विचारता, इतकीं वर्षे मी आपल्या घरीं दूध घालतो आहे, कधीं एक दिवस तरी पाणी मिसळलेळ आढळलं का १? पोराबाळांची शपथ घेऊन सांगतां साहेब, पाण्याचा एक थेंबह्दी कधीं मिसळला असेल तर हराम, अहो, आपल्यासारख्यांना दूध विकायचं, पेसे घ्यायचे नि पाणी घाळून पाण्याचे पेसे घेऊं ? तें पाप कुठें फेई १ आतां दुधाचा कस्च कमी होत चालला, त्याला काय करणार ! तुम्ही पाहातांच आहां, महागाई ही अशी, आमच सर्वांचं पोट दुधाच्या धंद्यावर, घरों चार कच्चींबश्वी आहेत. त्यांच्या तोंडीं घास घाळून मग गुरांचं चारापाणी बत्ता १9 शत्र कोढीं माणसें व्हायेचं. गुरं सुद्धा लेकरांसारखींच, पण साहेब, पोटच्या पोरांइतकी माया ! काय गुरांची येणार आहे ? थोडीर १ हयगय होतेच. नाहीं करायची म्हटलं तरी होते ! आणि मग असा भुर्दंड भरावा लागतो. आणि समजा साहेब, मीही गुरांना भरपूर खायला घालूं लागलों व मींही स्वतःचं खाणं तसंच ठेवलं, तर मल््र दूधही महागच नाहीं का विकावं लागणार? आज ज्या भावानें दूध मी विकतों त्या भावानें विकणं मग मला कसं परवडेल ! दिवाय गोरगरीब तरी मग महागडं दूध कुठून विकत घेणार £ गोरगरीब कशाला साहेब, आपण तरी मग घ्याल कीं नाहीं कोण जाणें ! घ्याल का? देतां का मला एखादा रुपाया भावांत वाढर्न १? तेवढाच चांगला घास माझ्या गुरांच्या तोंडीं पडेल... ! ” गवळ्यानें ह्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा ठेवलीच नव्हती, तो आपलें भांडं उचळून चालूं लागला होता. त्याच्या गुरांच्या तोंडीं चांगला घास घालण्याची तूत माझी तयारी नव्हती, मला घाई होती ताज्या दुधाच्या चहाची ! पण त्या गवळ्याच्या बोलण्यांत तथ्यांश नव्हता का ? दुधांत पाणी मिसळल्याची तक्रार करण्याचा प्रसंग आम्हांला कधींच आला नव्हता. आतां सर्वच गवळी इतके प्रामाणिक असतात असें नव्हे, किंवा बहुतेक गवळी नसतातही. परंतु वाइटाबरोबर चांगल्यालाही शिक्षा होते ती अशी, अधिक सकस दूध मिळण्याकरतां जो अधिक खर्चे करायला हवा तो त्यानें कोटून करायचा ? दूध अत्यंत महागळें तर गोरगरिभांना त्याचा एखादा थेंब तरी मिळेल का ! दूध निर्मळ, घुद्ध हवें हें खरें; पण तें विकत घ्यायला पैसे तरी हवेत ना ? माझेच पाहा ना, भावांत एखादाही रुपाया वाढवून देण्याची माझी कोठें तयारी होती ? महाग दूध विकले गेलें नाहीं तर गवळ्याचा चरिताथ कशावर चालायचा ?! मग आमचीं तीं सरकारी माणसें व दूथ तपासण्याची त्यांचीं यंत्रे, तीं काय उगीचच ? मग काय, आहे तीच स्थिति चालू ठेवून लबाड गवळ्यांना दुधांत पाणी मिसळण्यास अवसर ठेवायचा ! का आमच्या गवळ्याप्रमाणे निरपराधी गवळ्यांना शिक्षा करायची ! नेमके गुन्हेगार कसे सापडणार ? तोंपर्यंत निरपराधी लोकांनींही त्रास सोसावा ! जगाचा न्यायच आहे असा! ज्र ४ ' वेडा हसन्या ! | हसन्या ! | हसन्या ! हो हसन्याच ! आतां त्याला हसन म्हणून कोण ओळखतो ? पूर्वीची ओळख असली तरी त्याच्या वेडेपणीं कोण ती ओळख दाखविणार ! वेड्या माणसाशी कधींकाळीं आपला संबंध होता असे शाहाण्या जगाला दाखवावेंसे कसे वाटेल ! म्हणूनच जाणतीं माणसेंही चार पावलें दूर्च राहून; : अरेरे, गरीब बिचारा ! ? म्हणून सहानभूति दाखवितात, फुकटचा एक सुस्कारा टाकून आपल्या मार्गाला लागतात. जगाच्या व्यवहार जाहेर गेलेल्या हसनला त्याची दखलही नाहीं. त्याच्या ठेखीं आजूबाजूचे जग असून नसल्यासारखेंच आहे. तो आपल्या स्वतःच्या तंद्रींत खुशाल रस्त्यावर येरझारा घालीत असतो, स्वतःशींच कांहींतरी पुटपुटत असतो. वेड्याचे बरळणें जगाच्या चाळू भाषेंत नसल्यानें त्याचा अर्थच कांहीं लागत नाहीं, किंवा अथ लावण्याचा प्रयत्न करण्याचे तरी कारण काय १ नाहीं म्हणायला पू्वपरिचित हॉटेलवाल्याची ओळख मात्र हसन विसरला नाहीं. आजही त्याच्या दाढीमिद्यांनीं भरलेल्या तोंडांतून “ दांकरराव शांकरराव ? म्हणून हाक येऊं लागली, म्हणजे झाडाझुडुपांतून चील्कारणाऱ्या एखाद्या श्वापटाचाच भास होतो, वेडा म्हणजे पद्यूच तो ! पण ह्या [ नर ] पशूंना सुद्धा सॉम्य करणारी- भूक त्यांना भानावर आणते व मग ते खाऊं घालणाऱ्या ओळखीच्या जीवांना हृुडकीत साद देऊं लागतात, तसाच परकार हसन्याचा, पोटांतील भुकेनें जागे केल म्हणजे रामनामाप्रमाणे प्रथम त्याच्या तोंडून “ शंकरराव, शांकरराव ? म्हणून नामोच्यार होऊं लागतो. एरव्हीं हसन्या पांघरण्याचें घुंगट घेऊन रस्त्याच्या कडेला स्वतःच्या शरिराचे मुटकुळे करून पडला, म्हणजे मग तो जिवंत आहे, कीं मेला ह्याची वासपूसही कोण करतो ? जाणारा येणारा स्वतःच्याच व्यवसायांत; त्याला तरी काय ठाऊक, कीं हें बोचकें ग्स्वाया जिवंत माणसाचे दारीर आहे, तो माणूस पूर्वाश्रमीं धोब्याचा धंदा करीत होता आणि आज तो धोबी वेडा होऊन असा पडला आहे. हसन्याला सकाळ संध्याकाळ खाऊ घालणारा व चहा पाजणारा शांकरराव केवळ एका हॉटेलचा मालक असून नेत्रपरिचयादिबाय त्याची नि हसन्याची दुसरी कांहींच ओळख कलल एट “न्य क कांही माणसें नाहीं, परंतु माणुसकीची ओळख अधिक अंशानें असल्यामुळें शंकरराव आज ह्या वेड्य, जीवाला पोश्ीत आहे ! जग माणुसकीवर चाललें आहे म्हणतात तेच खर ! हूसनचा प्रेमभंग झाला नाहीं, किंवा दारिद्याच्या आंचेनें इतर सर्वे शक्ति करपून जाऊन हसन्या वेडा बनला नाहीं. हसन्या वेडा झाला बायकोच्या त्रासाने ! सुशिक्षित जगतांत आणि स्त्रीदाक्षिण्याच्या कालांत स्त्रियांना होणारा पुरुषांचा जाच वर्णन करण्याचा आजचा संकेत आहे. पण हसन्याच्या आयुष्यांत त्याने बायकोला छळल्याचें ऐकिवांत नाहीं; उलट त्याच्या बायकोनेंच त्याला सतावून सोडल्याचे प्रत्यक्ष पाहाण्यांत आहे. पुरुषासारखा पुरुष्र हसन्या, परंतु एकदा का कडाडणाऱर्‍्या विजेप्रमाणे बायको आंगावर आली, कीं अगदीं गोगलगायीपेक्षां गरीब बनून जात असे, त्याच्या दुर्दैवाचे ते विपरीत हृदय पाहून आंगावर काटा उभा राही व त्या वेळी कोपऱ्यांत खालीं मान घाळून व केविलवाणी मुद्रा धारण करून बसलेल्या हसन्याविषयीं विशेषच अनुकंपा वाटे. पुरुषांना तर तें दृश्य लज्ञास्पदच वाटे; परंतु स्त्रियांना सुद्धा हसनचीच कीव येई. स्त्रीजात म्हणून हसनच्या बायकोची कड घेणारी व्यक्ति कोणीच नव्हती. स्त्री काय किंबा पुरुष काय़ कोणालाही सहानुभूति वाटते ती सजञनाविषयींच ! हूसन्या आपल्या घोब्याच्या धंद्यांत वाकबगार होता. बाप अनतांनाच त्याचें लय्न झाले होतें. त्याला मुलेंबाळेंही होतीं. बाप होता तोंवर त्याचा आयुष्यक्रमही व्यवस्थित चालला होता. त्याला म्हणण्यासारखे व्यसनही नव्हते. शिवाय मर्यादशीलही असा, कीं बापासमोर विडीही पिण्यास तो कचरे, धंद्यांत प्रामाणिक तसाच, गिऱ्हाइकांच्या कपड्यांत कांहीं सापडळें तर तो जसेच्या त्से त्यांना परत करी. एकदा तर एका गिऱ्हाइकाच्या कोटांत चुकून दहाबारा रुपये तसेच आले. बिचारा ग्रहस्थ धावपळ करीत शोध काढीत हसनच्या घरीं आला, तां त्यापूर्वीच हसन स्वतः त्या गिऱ्हाइकाच्या घरीं पेसे परत करावयास गेलेला, असा सच्चा व्यवहार ! हसनच्या डोक्‍्यांतही कोणतीही विकृति नव्हती. हसनचें आयुष्य जगाच्या राहाटीप्रमाणं सुखासमाधानाने चाललें होतें. हसनची बायकोही सासरा असतांना कधीं आक्रस्ताळीपणा करीत नव्हती, सासऱ्याच्या सेवेंत व नवऱ्याच्याबरोबर कामधंदा करीत तीही नीटपणे राहात होती. तेव्हां कोणाला वाटलें होतें, कीं ह्यांच्या ह्या संसाराची पुढें धूळधाण दोणार आहे क नका वेडा हसन्या ! हसन वेडा होऊन ह्याच जागीं निराधार होऊन पडणार आहे १ पण भवितव्यता केव्हां केव्हां इतकी बलवत्तर ठरते, कीं ती' कल्पनेलाही लाजवील इत्या स्वर्‍्या गोष्टी घडवून आणते ! हृसनचा बाप वारला व संसाराचा सारा भार हसन वाहूं लागला, धेदेवाइकांच्या घरांत वरच्या माणसाच्या मृत्यूने सारे घर एकदम अन्नाला महाग होत नाहीं. मिळविता पांढरपेशा कारकून गेला, म्हणजे सगळें कुटुंब एकदम उघडें पडते व साऱ्यांच्याच जीविताचा उन्हाळा होतो. कामकऱ्यांच्या घरीं प्रथमपासूनच सर्वजण आपापल्या कामाला लागलेली असतात; तेथें एखादा गेला तर खांदेपालट होतो, इतकेंच. साराच संसाराचा गाडा पडून रहात नाहीं. टसन्या घर चालवू लागला, दुकानदारी करूं लागला, परंतु काय त्याचें दुदैब ओढवलें कोण जाणें, त्याची बायको त्याच्याशीं भांडू लागली, घरांतल्या घरांत भांड्यास भांडे लागून थोडा आवाज व्हायचाच, पण हा तसला आबाज न होतां रोज आक्रोश होऊं लागला. प्रथम प्रथम हसन्या उत्तराला प्रत्युत्तर देई व बायकोला गप्प करण्याचा प्रयत्न करी, नवराबायकोचे भांडण सुरू झालें म्हणजे वाटचे तमासगीर साहाजिकच त्याच्या दारासमोर गोळा होत. बघ्या मंडळींची गर्दी जमली, कीं त्याच्या बायकोला चेव येई व ती तावातावाने बोळूं लागे. बायकोचा उपमर्द सहन न होऊन हसन तिला दरडावण्याचा आव आणी, पण त्याचें तं उसनें बळ फार वेळ टिकत नसे. तोंडाळ बायकोच्या गर्जनेपुढें त्याचा बिचाऱ्याचा सोम्य आवाज किती वेळ टिकणार ? लवकरच तो गप्प बसे. रस्त्यावरच्या लोकांची त्यालाच लाज वाटे ब तो कोपऱ्यांत स्तब्ध बसे. बायकरोपुढें हार खातांना त्याच्या पुरुषी मनाळा काय यातना होत असाव्यात हें त्याच्या दीन मुद्रेवररून नीट ध्यानीं येई. मध्येंच उसळून तो म्हणे, “ औरत है या कोन हे १ मैं तेरा मरद हूं ! ” हसन्याच्या त्या डिवचण्यांने अधिकच खवळलेली त्याची बायको त्याच्या पुढें जोरजोराने हातवारे करूं लागे व त्याला तुच्छतेने म्हणे, “ तूं औरत हें, ओरत तूं है! में मरद हृं ! ” स्रीजातीचा तो पुरुषी आविर्भाव बाहेरच्या बघणारांना सुद्धा स्तंभित करी, तेथें ब्रिचारा हसन हतारा होऊन भकास चेहरा करून बसल्यास नतल काय ! चाललेल्या प्रकारावर कांहींच तोड नाहीं म्हणून वाटेवरचे लोक निमूटपणे आपापल्या मार्गाला लागत, हसनच्या बायकोचे तोंड वाजतच राही, वडे १ १ तळ कांहीं माणसे र मुले दीनवाणीं तोंडं करीत रस्त्याकडे पाहात, हसन दोन हातांच्या बेचक्यांत डोकें धरून खस्थ बसे, रिकामें पडलेले हसनचें इस्त्रीयंत्र काम नसल्यानें कुशीवर स्वस्थ पहुडे, घरांत अभिसाधनही नसल्यानें चूलखंड सदैव थंडच असे, पोरांची कीव करून कोणी शोजारीपाजारी त्यांना घास दोन घास भरवीत. हसन फक्त आंवढा व दुःख गिळीत दिवस काढी ! असा दुर्देवी क्रम कित्येक दिवस चालला होता, दिवसेंदिवस ददसनचें लक्ष धंद्यांतून कमी होत चाललें, त्याचा बराचसा वेळ बायकोशीं झगडण्यांत जाऊं लागला, नेहमीं हसनलाच हार खावी लागे. पुढें पुढें रस्त्याने जातांनाही डोकें फिरल्यागत वेडसर चाळे तो करूं लागछा, आपल्याशींच हातवारे करीत चालणाऱ्या हसनकडे पाहून त्याचे स्नेही सोबती त्याची कीब करूं लागले. लवकरच हसन बिऱ्हाड बदळून दुसरीकडे चालता झाला ! परंतु काय चमत्कार ? पुनः बऱ्याच दिवसांनीं हसन्या आपल्या पूर्वपरिन्षित जागीं आला ! त्या वेळचा त्याचा अवतार काय विचारावा ? वेडच लागलेलं त्याला आतां. फक्त नेसूं वस्त्र जागेवर होतें इतकंच, बाकी त्याच्या वागण्या- बोलण्याला कांहींच ठिकाणा नव्हता. गमतीची गोष्ट अशी, कीं त्याचें डोकें फिरलें होते, पण मनावरचा जुन्या राहात्या जागेचा संस्कार गला नव्हता किंवा तिजवरतचें त्याचें प्रेम नाहींसें झालें नव्हतें. एखाद्या जुन्या खास ओळखीच्या माणसाला भेटावयास यावें त्याप्रमाणे हसनच्या पायाने त्यास जुन्या ठिकाणीं आणले होतें. गातगात, डुलतडुलत हसनची स्वारी पुढें चाललेली व मागाहून पोरांचा तांडा वेड्याची गंमत करीत चाललेला असा ता थाट होता. हसन घेडा खरा, परंतु आपल्याला पारांनींही हसावें हें त्याला खपना, त्यांच्यावर उलटून तो ओरडून म्हणतो, “ हंसते क्यो हो ! क्या यहा कोडं पागल आदमी हे १” वेड्या माणसाचा तो शहाणपणाचा प्रश्न ऐकून तर त्याच्या दुर्दैवाची अधिकच कीव आली. आपल्याच नादांत विलीन झालेल्या त्या वेड्याला स्वतःच्या वेडेपणाची तरी जाणीव कोठची १ हसन्या आतां पूर्ण वेडा झाला आहे. त्याच्या बायकोचे व पोरांबाळांचें पुढें काय झाळें कोण जाणे. माणसांनीं बुजबुजलेल्या जगांत हसनची बायको ब त्याचीं पोरें ह्यांचा हिदोब काय ? आणि आतां खुद्द हसनच्या जिवाची तरी काय किंमत आहे? मधे मधे हसन रस्त्यावर येरझारा तरी करीत असे, चळ >> १ विडा र पडा हसन्या ! आतां तर तो तंही करीत नाहीं. आपल्या अनदात्या दुकानदाराच्या दुकाना- समोरच आपल्या शरीराचे गाठोडे करून हसन्या पडलेला असता. त्याचा जीव भुकेने कळवळूं लागला म्हणजे मग तो ' दोकरराव, शांकरराव ? म्हणून विव्हळू लागतो. पोटांत अन्नांश जातांच त्याचा थंडावलेल्य़ जीव आपल्या वेडाच्या लह्रींत पुनः मम होतो. हसन्या जागा होईल तेव्हां त्याचा दिवस, तो निजेल तेव्हां त्याची रात्र. ह्या वेड्या, दुर्दैवी जीवाच्या नशिबी आयुष्य तरी किती आहे, इश्वर जाणे ! कोणी प्रेमभंगानें वेडे होतात, कोणी द्रव्यनाश्यानें वेडे होतात, कुणी अतिविचारानें वेडे होतात; हसन्या वेडा झाला तो बायकोच्या त्रासाने ! आतां एक मृत्यूच त्याचें वेड दूर करूं शकेल आणि त्याच्या मृत्यूची नोंदही नगरसभेला स्वतःचीं माणसें पाठवूनच करावी लागेल, त्यांतही त्याचा मृत्यु होऊन त्याची वार्ता नगरसभेला लागेपावेतों किती वेळ जाईल कोणीं सांगावें ? रस्त्यावरच्या कुत्र्यामांजरांत आणि हसन्यांत आतां काय अंतर आहे ? जन्य १ ३ - | पर्सठ हाक | ह | पासंलठ झाक | जनूभाऊ पोस्टांत पार्सल लाक म्हणून नेमले गेळे आणि त्यांनीं एक सुटकेचा निःश्वास टाकला. आज इतके दिवस पायपीट करकरून नोकरी शोधण्याच्या यातायातींत जनूमाऊ अगदीं रडकुंडीला आले होते. रोज सकाळीं आशेने उठावे, आज तरी कोठें वर्णी लागेळ, कोणाचा तरी शब्द आज फळेल, ही अपेक्षा मन'ंत बाळगावी, स्विन्न मनाने चार घास पोटांत कोंबावे, अजीचे कागद गुंडाळून खिश्यांत भरावे व दुपारपासून नोकरीकरितां सर्वत्र वणवणावें अशा कार्यक्रमांत जनूमाऊंचे कित्येक दिवस लोटले. रोज तेंन्‌ तेंच. तसलाच दिवस, तसलीच पायपीट, तीच निराशा ! नकार, नकार, सर्वत्र नकार! ह्या नित्याच्या नकारामुळें जनूमाऊ अगदीं जिवाला वैतागून गेळे. पण नको असलेला जीव सुद्धा टाकून देणें कांहीं सोपें नाहीं. त्या नकोशा झालेल्या जिवाचे ओझें बाळगूनच जनूभाऊ फिरत व नित्य नव्या ठिकाणीं याचना करीत. शेवटीं एकदाचें त्यांच्या तपश्चर्येला फळ आलें व त्यांची पोस्टांत पार्सल क्लार्क म्हणून नेमणूक झाली, जनूभाऊंना सहजच मोठा आनंद झाला; नवजीवन प्रास झालेसें वाटलें. रोजच्या त्यान्‌ त्याच निराश भटकण्याला आतां आपण सुटलों, नव्या आयुष्याला आपण सुरुवात करणार ह्या सुखद विचारांत जनूमाऊ नोकरीवर दाखल झाले. कोणत्याही गोष्टीचा नवेपणा मनुष्याला प्रथम आपणाकडे आकर्षून घेतो; मग ती गोष्ट मुळांत कितीही त्रासाची, कंटाळवाणी असो. नवें घर, नवी बायको, नवें मूल, नवा संसार, नवी नोकरी, नवेपणाच्या झगझगाटांत त्यांचे खरें स्वरूप ध्यानीं येत नाहीं. रंग उतरलेल्या नटाप्रमाणें त्यांचें खरें स्वरूप परिचयानेच कळते, जनूभाऊंचें तसेंच झालें. प्रथम जनूमाऊ पोस्टांत कामावर रुजू झाले ते कोण डोलांत. पार्सलांचा ढीग आजूबाजूला पडला आहे, त्या प्रत्येकावरील पत्ता चटकन्‌ वाचून जनूभाऊ तें पोस्टाच्या शिपायाच्या हातीं बटवडा करण्याकरितां फेक्ताहेत; मध्येच रजिस्टरे, पार्सल करावयास आलेल्या मंडळींच्या बंग्या जनूमाऊ झरझर घेताहेत, तोल करून तिकिटें किती पाहिजेत ते सांगताहेत, पावतीबुकांत त्यांची नोंद करून ठकूकन पोस्टाच्या छापानिश्ी जत १ ७ - पासल क्ञाक पावती मालकाच्या स्वाधीन करताहेत, अशी जनूभमाऊंच्या जिवाची एकच धांदल उडे. पण ह्या साऱ्या धांदलींतही जनूमाऊ गडबडत नसत, ग्जन करणे, पावत्या लिहिणे, छाप मारणे, इत्यादि गोष्टींत त्यांचें चापल्य दिसून येई व हा पार्सल क्लार्क मोठा चपळ आहि असेंच खिडकीशीं गर्दी करून उभ्या असणाऱ्या साऱ्या लोकांना वाटे. जनूमाऊंचे उपरी अंमलदारही त्यांच्या आवरशक्तरीवर खूष असत. आजूबाजूची इतर नोकर मंडळी त्यांचा तो प्रारंभींचा उत्साह पाहून आपल्याशींच हसत, पण ही कामाची नवाळी फार दिवस टिकली नाहीं. लवकरच जनूभाऊंना स्वतःचा उत्साह कमी होत चालला आहे असें वाटूं लागलं. पार्सलांच्या ढिगाचा त्यांना पुढें पुढें राग येऊं लागला, लोक एवढें एकमेकांना पाठवितात तरी काय, ह्याचाच त्यांना अचंत्रा वाटूं लागला, एका नंबरच्या पोस्टमनचीं पार्सलें केव्हां केव्हां दुसऱ्या नंबरांत जाऊं लागलीं, पोस्टमन कुरकुरे व जनूमाऊ त्रासिकपणें कांहीं तरी बोलत. खिडकीशीं गर्दी करून उम्या राहाणाऱ्या लोकांवर जनूभाऊ त्रासिकपणे एक दृष्टिक्षेप करून मग खिडकीचे दार खटकन्‌ उघडीत. लोकांवरचा राग क्षणभर ते खिडकीच्या निर्जीव दारावरच काढीत. गर्दी करून रेंटारेट करणाऱ्या लोकांवर जनूभाऊ खेकसत व त्यांचे हात मागे रेटीत, व्ही. पी.चीं पावतीबुकें, रजिस्टर्चीं पावतीबुके यांची गुत होऊं लागे, शिक्का चटकन्‌ हातीं लागेना, शिक्कयाची शाई चांगली उठेना, असे एक कीं दोन अनेक प्रकार होऊं लागले. खिडकीच्या दाराशीं जमलेली झिम्मड पाहून जनूमाऊंचा धीर खे, मान खालीं घाळून ते जे कामाला लागत ते कपाळावरचा घाम टिपून टाकायला म्हणून ती बाजूला करीत. इतर्के असूनही बाडेरच्या लोकांना जनूभाऊंच्या कष्टाची जाणीव व्हावी तशी होईना. त्यांना वाटे हा मास्तर बराच ढिला आहे, त्याचा हातच चालत नाहीं. जो तो आपल्यापुरतेच पाहाणारा व जो तो अगदीं घोड्यावर आलेला. प्रत्येकाची इच्छा ही, आपण पोस्टांत पाऊल टाकतांच आपलें काम तात्काल व्हावें ब आपण उलट पावलीं परतावे. प्रत्येकाची निकड स्वतःपुरती, पण जनूमाऊंना तर सर्वांचे काम उरकायचें व तेंही ठरलेल्या वेळांत. तोच कांटा, तींच वजने, तसलींच पार्सठें, तेच हिशोब. ह्या त्याच- त्यापणाचा जनूभाऊंना कंटाळा येत चालला, बंगी घ्या, वजन करा, तिकिटे व ९ "५ -- कांहीं माणसें सांगा, पावती लिह्य, शिक्का मारा, ह्या साऱ्या क्रमाचा यांञ्रिकपणा जनूभाऊंना जाचक होऊं लागला, बसून बसून कंबर दुखे, खालीं पाहून पाहून मान अवघडे, लिहून लिहून हात दमत, ठराविकपणामुळें डोकें जड होई, कामाच्या जबाबदारीमुळें जीव दडपून जाई. हा सारा मुका मार जनूभाऊ मुकाट्याने सहन करीत. त्यांच्या कामांतील वाढता संथपणा अलीकडे त्यांच्या उपरी अंमलदाराच्या थोडा थोडा ध्यानीं येत चालला होता व एक दोन वेळां त्यांना त्याबद्दल समजही मिळाली होती. त्यांचे सवंगडी आतां हा आपल्या कळपांत पुरापुरा येत चालला आहे म्हणून आंतल्या आंत समाधान मानीत होते. जनूमाऊ मात्र पूर्वीची आपली तरतरी मिळविण्याचा क्षीण प्रयत्न करीत होते. पण त्यांच्या त्या प्रयत्नांना यश यावें कसे ? प्रातःकालीं थोडा वेळ ताजातवाना असलेला त्यांचा जीव कामावर जाण्याची वेळ होतांच तेथच्या कामाच्या कल्पनेने हबकून जाई. निरुत्साही वृत्तीने सुरू केलेलं काम दिरंगाईने चाले, मन व डोकें दुर्बल होई ब त्यामुळें शरीरावरही दुबळेपणा'ची कळा येई. ह्या साऱ्या गोष्टी दिसत असूनही जनूभाऊंना टाळतां येत नसत. कामाची वेळ संपली, कीं केलेल्या कामाचा ढीग पाहून जनूमाऊ एक निःश्वास टाकीत, उठायची वेळ होतांच हुराहुर करीत आंगाला आळेपिळे देत उठत व एस्वाद्या केदखान्यांतून सुटल्याप्रमाणे बाहेर पडत. पायऱ्या उतरतां उतरतां एक तिरस्कारा-चा दृष्टिक्षेपही मार्गे टाकण्यास चुकत नसत. पण तेव्हांच त्यांच्य मनांत एक विचार डोकावून जाई... उद्यां काय ? पुनः हॅंच ! तीच खिडकी, तोच कांटा, तींच वजने; तसल्याच बंग्या, त्याच पावत्या न॒ तोच शिक्का. हें तेंच तेंच आपल्या नशिबाचे केव्हां संपणार ? का हे तेंचतेंचपण आपले सारं आयुष्य खाणार ! ज्र ड्् 4 द प्न्ड | आमचा हिपी| अमचा दिपी केव्हांही त्याच्याकडे जा - आज वौीस वर्षे त्याचा माझा व्यवहार आहे - त्याची स्वारी दुकानाच्या तोंडाशीं अगदीं तशीच उभी. गळ्याभोबतीं टाकलेली टेप, तोंडावर हसं, सदा आनंदाने स्वागत करायला तयार. “ काय साहेब, कोट ना १ सजेचा करतां का मद्रास चेकचा ? ” हा त्याचा नेहमींचा प्रश्न. नेहमीं कापडाचे हे दोनच काय ते नमुने माझ्या पसंतीला तो टाकी, गेल्या बीस वषांत त्यांत कांहीं फरक झाला नाहीं. आणि आतां तर कांहीं बदल करण्याची वेळच टळून गेली. “६ काय सर्जच ना १ हं सर्जंच ! जांभळं १---जांभळं.” जणूं काय तो मला एखादी नबी कल्पनाच सुचतब्रीत आहे. “ हं मगन, काढ " तें आपल्या जांभळ्या सर्जचं ठाण, हं, हें पाहा साहेब, अगदीं कोरं करकरीत.” जसे कांहीं सहजच त्याच्या हाताला एखादे उत्कृष्ट ठाण लागलें असावें. एक पाय उंच करून; त्यावर कापडाची घडी ठेवून जेव्हां तो हाताने त्याचें पोत दाखत्रूं लागे तेव्हां तर कोणीही क्षणभर त्याच्याकडे कोतुकार्नेच पाही. ह्या पवित्र्यांत कापड दाखवीत असतांना गिऱ्हाईक तें पसंत करणार नाहीं म्हणजे काय बात आहे ! कापडाची खरी खुमारी कळायला तें एखाद्या शिंप्यार्ने आपल्या पायावरच दाखविलें पाहिजे. मला वाटे, कीं असा एक पाय वर करून, विकलांग झाल्याप्रमाणे हा हवा. तेवढा वेळ उभा राहूं शकेल, ५६ पण हें बरं असेल का ? ” मी त्यास विचारीं. ६६ बरं म्हणजे काय, अगदीं फकड.” तो उत्तर करी, त्याच्या उत्तराविषयीं संशय घेण्याचें मला कारणच नाहीं. आणि कापड तरी चांगलें कां दिसूं नये हेच मला समजत नाहीं. परंतु हाच प्रश्न मी नेहमीं विचारी; कारण मला ठाऊक, कीं त्याचीच तो अपेक्षा करीत असे व त्यापासून त्याला आनंदही होई. व्यवहार आहे हा, त्यांत देवघेव उभयपक्षी सारखी हवी. रे -- १७- कांडी माणसं. ६ घण त्याचा रंग जरा भडक नाहीं का £ ” माझा नेहमींचाच पण त्याला आनंदनिणारा प्रश्न ££ छे, छे, भडक कसचा १ तसं म्हटलं तर हा रंग अगदीं सोम्य आहे आम्ही आमच्या गिऱ्हाइकांना भडक रंग केव्हांही सुचवीत नाहीं.” भडक रंगाचा कोट आजवर मीं कधींच केला नाहीं. परंतु आपलें विचारलेले बरें म्हणूनच मी विचारीं इतकेंच, , नंतर माप -फक्त छातीचेच माप, बाकीचीं मापे कित्येक वषापूवी घेतलीं तींच चालू. आतां छातीचे माप घ्यायचे ते केवळ मला जरा बरें वाटावे म्हणून. नाहों तर मी कोठें प्रतिवर्षी वाढत होतों ! “ छाती थोडी वाढली आहे, नाहीं ! समजलं का मगन, छाती थोडी - अधो इंच-सेल हं...! ” केबळ थाप, पण किती प्रेमळ, छाती वाढली हें ऐकून कोणाला आनंद होत नाहीं १ : हू मग...” मग म्हणण्याची त्याला नेहमींचीच खोड, “ पुढील मंगळवारच्या आठा दिवसा ! समजलं का मगन ! पुढील मंगळवारच्या आठा दिवसा.” ५: बरं पण पेसे. . .” मी बोलूं लागे. छटू , पण आमचा दिंपी मुळीं पैशाची गोष्टच काढ देत नाहीं. जणूं काय त्या विषयानें त्याला व मला दोघांनाही दुःखच होईल, पैशाचा प्रश्न आम्ही असा सोडवीतच नाहीं; तो निरोपानिरोपीं पण कोणालाही राग न येईल अशा रीतीनेंच आम्ही सोडवीत असू, त्याचा निरोप यावयाचा तो असा, कीं जणूं कांहीं मोठ्या कष्टानेंच तो हें काम करीत असावा. पैशाची ओढ, इतर गिऱ्हाइकांचा बुडवेपणा, नवीन यंत्रखरेदीची गरज, इत्यादि कारणांमुळेंच केवळ आपण शब्द पाठवीत आहों, नाहीं तर एरवहीं पैशाचें नांवबही काढलें नसतें, हें त्याचें नेहमीं म्हणणे. आतां माझे एकामागून एक दोन तीन कोट होऊन गेले तरी त्याची यंत्रखरेदी चाळूच होती. हे जरा विचित्र खरें; “पण केवळ योग, दुसरें काय? असो, पण पैशाची गोष्ट आम्ही त्या वेळीं काढीत नसू हें खरें. त्याऐवजी आमचा शिंपी हवापाण्याच्या गोष्टी काढी, सामान्य माणसें बोलण्याचा आरंभ हवापाण्यापासून -- १८ - आमचा डीपी करतात. मला वाटतें, शिंपी लोक हवापाण्याचा उछेख शेवः करीत असावेत. कपडे शिवावयास टाकले तरच त्या शिळोप्याच्या गोष्टी निघावयाच्या -< एरव्हीं नाहीं. :६ हवा सध्या छान आहे, नाहीं १ ” नेहमीं हवा चांगली; कधींही तक्रार नाहीं. कदाचित गिऱ्हाइकांनीं कपडे शिवावयास टाकणें म्हणजे तेवढीच पैशाची ऊब. मग हवा बरी न वाटावयास काय झालें ! झालें, संपले काम. नंतर मी सहजच दुकानाच्या पायऱ्यांकडे वळें, “ कांहीं खमिस वगैरे १ ” “ ळे, छे, कांहीं नाहीं,” हा सुद्धा एक औपचारिक व्यवहार होता. खरें म्हटलें तर मी त्याजकडून खमिस केव्हांच शिवून घेत नसे, तरी सुद्धा वषीनुब्षे तोच प्रश्न तितक्‍याच आजेवानें तो विचारी. ५६ बरं, एखादी कॉलरबिलर! ” पुन्हा निरर्थक प्रभ, कॉलर मी वापरतोंच कधीं १ असे आमचें संभाषण आज कित्येक वर्षे अविच्छिनपणें चालले. त्यांतील कांहीं गोष्टी निरर्थक खऱ्या पण त्यांची जर विचारपूस केल्यारिवाय त्या राहिल्या तर अंतःकरणांतील कोठला तरी एखादा धागा तुटला कीं काय असें मला वाटे. नंतर आम्ही निरोप घेत असूं, “६ बरं नमस्कार. पुढल्या मंगळवारच्या आठा दिवसा हं, नमस्कार,” मृ र ... असा आमचा हा व्यवहार चाले. चाले म्हणण्याचें कारण तो नुकताच परवां संपूर्ण झाला, नेहमीप्रमाणे कोट शिवण्याकरितां त्याच्या दुकानांत पाऊल ठेवतों तों तो मृत झाल्याचें समजे ! इतर मंडळी आपापलीं कार्मे करीत होती, त्यांनींच मला त्याच्या निधनाची बातमी सांगितली, मला तर एकदम धक्काच बसला. प्रथम तर तें खरेच वाटेना. मला वाटे, कीं त्याला मरण- छे, त्याला मरणच नसावे ! धंद्याच्या हलाखीनें तो मेला म्हणे, छे, रक्‍यच नाहीं. तो किती आनंदी, किती शांत दिसे, गळ्याभोवतींची त्याची ती पट्टी, तोंडावरचें तें हसं , गिऱ्हाइकांचें माप घेण्याची त्याची ती लकज ! त्याला मरण ! कित्येक वं्धे धंद्यांत त्याचा पाय मार्गच पडत होता, त्याच्या कुटुंबाची तर -- १९ -- कांडी माणसे अगदीं दुर्दशाच झ्षोती म्हणे ! त्याचें कुटुंब वगेरे कांहीं असेल हे आजवर माझ्या ध्यानींच आलें नाहीं. नाहीं म्हटलें तर बिचाऱ्याला बायको व एक मुलगी होती, मुलगी कोठें तरी गायनाचा अभ्यास करीत होती व स्वतः त्यालाही गाण्यांचा शोक होता. त्याला कीर्तनाचीही आवड होती. परंतु गाणें» कीतैन ह्या गोष्टी आमच्या बोलण्यांत कधीं आल्याच नाहींत. दुकानाच्या बाहेर पाऊल टाकतांना त्याचा तो ओळखीचा राब्दच कानीं पडतो आहे कीं काय असा मला भास झाला-- “£ आणि कांहीं खमिस वगैरे १” आणि खरोखरच त्याच्यापासून खमिस करविले नाहींत म्हणून क्षणभर मला बाईट वाटले, ह्या क्थेतही तात्पर्य आहे असें मला वाटते. परंतु जाऊं द्या, हव्यात कशाला त्या तात्पर्याच्या गोष्टी ? आणि समजणाराला सांगायला कशाला पाहिजे ? बदर र ९ -> (आंधळी | | आंधळी _आंघळी गरीब बिचारी आंघळी ! -“-आणणखी त्यांतच भिकारी ! --तिच्या आयुष्यांत तें सांगण्यासारखे, पाहाण्यासारखें काय असणार १ -णाशिवाय तिला आपली जीवनकथा दुसऱ्याला सांगायला लागणारी बुद्धि कोठें होती ! ---किंवा जग पाहातां येणारी दृष्टिही तिला नव्हती ! --स्स्त्याच्या कडेला बसून देवाचा धावा करीत ती भिक्षेकरितां हात पसरी, --बिचारीला आपणासमोर कोणी आहे कीं नाहीं, हेंही ठाऊक नसे ! --कर्से ठाऊक असणार १? कारण तिला मुळीं दिसतच नव्हते. आंघळी होतीना ती! व -णतिच्या आंगावरच्या लकतरांतून तिचें दारिद्यच जणूं काय बाहेर पडत होतें. रभ ---ती पोटावर थापट्या मारी, मध्येंच परमेश्वराच्या नांवानें टाहो फोडी, मध्येंच आपल्यासमोर पसरून ठेवलेल्या कळकट फटकुरावरून हात फिरवी. --तिला वाटे, न जाणों कोणी एखाद्या दयाळू संजनानें आपल्याला नकळत एखादा पैसा टाकला असला तर... पण असा गुसदान करणारा सज्तन कोण असणार ? -र्‍परंतु भोळी बिचारीची आशा. "आशा आंधळी म्हणतात ना ? मग ही तर आंधळीचीच आशा ॥ -क्‍्क्चितच एखादा जाणारा येणारा तिची केविलवाणी स्थिति पाहून तिला कांहीं देईही. तसें नसते तर ती जगते कशी ! -्किचित्‌ एखादा टारगट मुलगा तिच्या हातावर दगड टाकी व दूर उभा राहून हसे -निष्ठ्रपणें हसे ! -नबिचारी आंधळी खेदानें दगड दूर भिरकावून देई व पुन्हा देवाचा धावा करूं लागे, | व्य २ १ डं कांहीं माणसें -गदूत्लला ती आपली असहायता: सांगत होती, कीं त्या मुलाला पारिपत्य करायला विनवीत होती, कीं त्यालाही क्षमा करायली ती प्रार्थीत होती १ तिला ठाऊक, कीं तिचें अंतःकरण जाणणाऱ्या देवाला ठाऊक, --ःरोज रोज त्याच जागेवरून जाण्यानं माझेही लक्ष रोज तिच्याकडे जाई. --तीच अवस्था, तोच धावा, त्याच विनवण्या, तेंच दृक्य! -णरोजच्या पाहाण्यामुळें मलाही त्यांचा जणूं सराव झाला इतकेंच नव्हे, तर त्याविषयीं उत्सुकताही वाटूं लागे. त्या सळीं येतांच नेमकी त्या जागेकडे दृष्टि जाई. आंघळी आहे असे दिसले, कीं एखादी वस्तु जागच्या जागीं असल्यासारखं वाटे आणि मी निश्चितपणे पुढें सरके. -ण्हहा आपला रोजचा एक क्रमच होऊन बसला होता म्हणा ना ! --एके दिवशीं मी नित्याप्रमाणे त्या वाटेने चाललों ब सवयीने माझे डोळे ती आंधळी बसे तिकडे वळले --मपरंतु आज तेथे आंधळी नव्हती, तिचें तें परिचित ओरडणेंही नव्हते, कांहीं नव्हतें. जागा रिकामी होती --रोज लोक तेथून बाजूनें जात, आज लोक त्या जागेवरून चालत जात होते. त्यांना कांहींच ठाऊक नव्हतें. मला मात्र वाटले, कीं जणूं काय ते त्या आंधळीवरूनच चालत जात आहित. “एखादी जागची वस्तु दूर गेल्यामुळें ती जागा रिकामी पडावी ना, तसा मला भास झाला >-आणि मग उगीचच चुकल्यासारखे वाटलें. वेडे मन, दुसरें काय ! पुन्हा दुसऱ्या दिवशीं तीच्र गोष्ट, आजही कोणी नव्हतें. माणसांची ये जा -वाललीच होती, माणसांना काय ? कोणी राहिलें काय कोणी गेलें काय ! त्यांचा व्यवहार अखंड आहे, -मला मात्र प्रथमप्रथम उगीचच आठवण येई. -वमपरंतु पुढे पुढे मलाही विसर पडला. आणि एके दिवशीं ती जागाही दुसऱ्याच कोणी तरी पटकावली, -"जग हें असच आहे. ज्र व्र “र २ स्य ह दक्षिणी आणि गुजराथी ““ या रावसाहेब ! काय पाह्यजञे आपणाला १? अगदीं नवीन, उमदं कापड आलं आहे. नमुना पाहा, तब्बेत नुसती खूष होऊन जाईल. मगनभाई» रावसाजने कापड बताव, ” गुजराथी व्यापाऱ्याचा लाघवीपणा काय वणीवा ? परंतु माझा दक्षिणचा स्नेही तरी क्षणभर ह्या आतिथ्यानें गार झाल्यासारखा दिसला, त्या व्यापाऱ्याचा नम्न भाव, आमच्या स्वागताची तयारी, विदोषतः त्यानें आम्हांला दिलेली रावसाहेब ही पदवी, ह्या सोचा साहजिकच त्याच्या मनावर परिणाम झाला. आम्हांला नको असतांही थोडेसें अधिक कापड घेऊनच आम्ही बाहेर पडलों आणि मगच त्याच्या शाब्दिक आतिथ्याने आमचे मात्र चार पैसे अधिक खर्च झाले हें आमच्या ध्यानीं आलें ! आतिथ्याचा खचे त्याला व्हायच्या ऐवजीं आम्हांला झाला ! इतरत्र दुसराच प्रकार दृष्टीस पडला. एका गुजराथ्याचें दुसर्‍या कोणाशीं भांडण चाललें होतं. तो ग््हस्थ तावाताबानें बोलत होता. अगदीं हातघाईवर, वदळीवरच आला होता. परंतु त्या गुजराथी ग्रहस्थाची शांतता ढळली नाहीं. आजूबाजूचे लोकही “ जवा दो, जवा दो? ( जाऊं द्या, जाऊं द्या ) म्हणून सोडवीत होते, कांहीं नुसताच कोलाहूळ करीत होते. तें ह्य पाहून माझा दक्षिणचा पाहुणा म्हणतो, “ गृहस्थ अगदींच शामळो बुबा ! मी असतों तर समोरच्याला केव्हांच लंबा केला असता. गुजराथी म्हणजे एकंदरींत शामळोच ! ” गुजराथ्यानें आम्हां दक्षिण्यांना ' रावसाहेब ? पदूबी द्यावी आणि माझ्या दक्षिणी मित्राने त्यांना उलट * शामळो” म्हणावें या देवाणघेवाणाची क्षणभर तरी मला मोठी मोज बाटली परंतु हा प्रकार येथेंच थांबून राहिला नाहीं. येथून एक नवीन विचारचक्र सुरू झालें. दोन समाजांना एकमेकांविषयीं पुरेशी ओळख नसली म्हणजे बारीकसारीक गोष्टींचे सुद्धा एकमेकांना हसूं येतें आणि केबळ तेवढ्यावरूनच ते एकमेकांची चे£ःच नव्हे तर उपहासही करूं लागतात, वास्तविक सारें 2 हन चा कांहीं माणसें भरतखंनर आतां एकजिनसी हिंदी शनतेनें व्यापून अंसांवें, हिंदीत्व हाच सर्व जनतेतील सर्वसाधारण घटक असावा, दुय्यम भेद व पक्षोपपक्ष नाहींसे व्हावेत. असा जोराचा प्रयत्न चालू असतांना दक्षिणी, गुजराथी असले प्रांतिक भेद बाळगणे, त्यांची जोपासना करणें, एकमेकांतील वैचित्र्याला फाजील महत्व देऊन त्याबद्दल चेष्टा किंबा उपहास करणें खरोखर अनुचितच ! परंतु आज तरी सारेच प्रांतिक भेद चटकन्‌ नष्ट. होतील असे वाटत नाहीं. शिवाय सामुदायिक राजकारणांत सारेजण एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसण्याइतके एकऱ्येयी झाले असले तरी कोटुंबिक आणि सामाजिक भेद हे राहाणारच, तेव्हां कोणत्याही दोन समाजांत सलोखा नांदण्याचें उत्तम साधन म्हणजे दोन्ही समाजांना एकमेकांच्या आचारविचारांची सहानुभूतिपूर्वक माहिती असणें हेंच होय. शिवाय मिन्न समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे ज्ञान होतें हा लाभ वेगळाच, लोकमान्य टिळकांच्या काळीं चाळू हिंदी इतिहासांत महाराष्ट्राला मानाचे स्थान होतें, तेव्हां सहजच महाराष्ट्रीयाकडे कोणीही चौकसपणें पाही. आज महात्मा गांधींच्या असहकारितेच्या युगांत गुजराथ्यांनीं आघाडी मारली; बुद्धिजीवि वगाची जागा वाणिज्यवृत्तीच्या लोकांनीं गांठळी व राजकारण खेळविले. वेगळ्याच प्रकारच्या टोथेधेग्रांचा आविष्कार- आजवर अज्ञात असा--त्यांच्या ठायीं दिसून आला. स्वाभाविकच ते कोतुकाचा विषय बनले. गुजराथी मुलुख व मराठी राज्य अशा सयोगांत राहाणाऱ्या एखाद्या चोकस दृष्टीच्या जिज्ञासूला तर नित्याच्या आयुष्यांतही विनाश्रम उभय समाजांचे जीवनवृत्त, आचारविचार पाहातां येतात व पारखतांही येतात. इंग्रजी शिक्षणाने व इंग्रजी अनुकरणाने समरस किंबा एकरंगी झालेल्या सर्वे समाजांत्तील वरच्या थरांतून कदाचित्‌ वैचित्र्य वा विभिन्नता कमी झाली असेल; परंतु बहुजन- समाजाचें सर्वसाधारण आयुष्य मात्र अद्याप अविचलितच आहे आणि तेणेंकरून तटस्थपणे दोन मिन्न समाज न्याहाळतांना गंमतच वाहते. माणसाच्या ठायीं डावेउजवेपणा असतोच; परंतु एकनिष्टपणामुळे त्याचें कांहीं वाटत नाहीं. परंतु दक्षिणी-गुजराथ्यांत मात्र डाव्याचें उजवे व उजव्याचें डावें आढळून येतें आणि त्या वेळीं वैचित्र्यापेक्षां विरोधच जास्त वाटतो. दक्षिणी माणूस धोतर नेसल्यास डाव्या बाजूला कासोटा व उजव्या बाजूला क “4 ७ -- दक्षिणी आणि गुजराथी निऱ्या करील, तर गुजराथी माणूस उजव्या बाजूला कासोट। ब डाव्या बाजूला निऱ्या खोचील. दक्षिणी ग्रहस्थाच्या डोकीवरील पगडीच्या झिरमिळ्या किंवा कोकी उजवीकडे एका बाजूला असेल, तर गुजराथी “ पाघडी 'चा जर डोकीवर मधोमध पुढें येईल, गुजराथी माणूस जोडा किंवा वहाणा क्चितच वापरील, सदैव पायांना बुटाचीच सवय; मग बंदांचे बूटही मोज्यांशिवाय वापरतांना त्याला केव्हांही चुकल्यासारखे वाटणार नाहीं. उलट मोज्यांशिवाय बंदांचे बूट म्हणजे दक्षिण्याला रीतीचा भंग वाटेळ ! एकादा कोणी तसा आढळल्यास * हा काय आज गुजराथी प्रकार ? म्हणून म्हणायलाही तो सोडणार नाहीं. दक्षिणी स्त्री सकच्छ नेसून उजवीकडे पदर काढते -हृल्लीं कोणी विकच्छ नेसल्या तरी पदर उजवीकडेच कायम आहे-तर गुजरथी स्त्री विकच्छ नेसून पदर डाबीकडे काढते. गुजराथी स्त्रीच्या दुपटीने लांब- लुगडे नेसूनही दक्षिणी स्त्रीचे पाय मागें अधे उघडेच पडतात; त्यामुळेच ' सोळा हात साडी, अर्धी तंगडी उघडी ? अशी एक उपहासात्मक म्हण गुजराथींत प्रचारांत आहे. ,तिचा रोख दक्षिणी स्त्रियांवर आहे हें सांगणें नकोच. परंतु आवेशाने 'पळावयाच्या वळीं किंवा चारदोन पावलें झपास्यानें टाकतांना हीच नेसण्याची पद्धति कामीं येते हा अनुभव आहे. त्या' वेळीं बिस्तृत घेराचें गुजराथी नेसणे अडचणीसारखेंच व्हायचें ! स्वागताचा दक्षिणी ' नमस्कार? तर गुजराथी ' जयजय ? ! हा जयजयकार आतां गुजराथेंत वास्तव्य करून राहाणाऱ्या दक्षिण्यांनींही उचलला आहे. सांप्रतचा भाईवाद उत्पन्न होग्यापूर्वायासून गुजराथी सर्वांना भाई म्हणून संबोधीत आला आहि. तो नुसतें “काय, कसं काय £१? म्हणणार नाहीं, तर ' केम भाई, ठीक छे ने !? अर्से बंधुभावानें विचारील. आल्या अतिथीचा सत्कार कसा कराबा हें शिकावे गुजराथ्याकइनच. परंतु पुढे केलेल्या पानाच्या डब्यांतून एका वळीं सबंध पान उचलले, तर गुजराथी हिशेबी दृष्टीला तें मानवत नाहीं. दक्षिणी रावसाहेबी रुचीला किमान दोन यानें तरी हबींत, तर गुजराथी व्यसनांतही काटकसरी, हिरोनी वृत्ति न सोडतां एका पानाचे दोन भाग करून एकाच तुकड्यावर आपली तल्लफ भागवील. * गुजराथी स्त्रीवर्गही जात्या धीटच. आल्या माणसाची ' भाई? म्हणून शविचारपूस किंवा- निःसंकोच आगतस्वागत करतांना त्यांना विदोष कांहीं वाटत -- २५ -- कांहीं माणसे नाहीं, पाहुण्यांनींती येतांजातां ह्या घरच्या “ बेहेन ची विचारपूस करणें अगत्याचे समजलें जाते. दक्षिणी स्त्रियांचा संकोच व त्यांची लाजरी वागणूक सर्वप्रसिद्धच आहे. अनोळखी पाहुणा त्यांच्या वाऱ्याला बेतानेंच उभा राहातो. नित्यनेमित्तिक कृत्यांचा व हृव्यकव्यांचा दक्षिणी कुटुंबांत हा रगाडा ! आज अमको पूजा, उद्यां तमर्के तरत, परवां श्राद्धपक्ष, तेरवां सणवार, अशी दक्षिणी घरीं एकच गर्दी. रिकामे दिवस किंबा उसंत कमी. शिवाय रोजच्या साध्या आयुष्यांतही सकाळ संध्याकाळ खाण्यापिण्याची व उष्ट्याखरकट्याची धांदल. दोन्ही सांज चारी ठाव स्वयंपाक व तेवढेच आवरणें. गुजराथी कुटुंबांनी हा कारभार साराच आटोपशीर करून ठेवलेला. घरगुती नित्यनैमित्तिक कृत्ये जवळजवळ नाहींतच. न्रतसायासांची घरीं धांदल नाहीं; देवळांत जाऊन दिवसांतून चार वेळां दर्शन घेतलें, कीं झाली सुटका. नित्याचा जेवण्याचा बेतही खिचडी, शाक-रोटली ( भाकरी ) असा साधा. साहजिकच दक्षिणी स्त्रियांच्या मानानें गुजराथी स्त्रियांना रिकामपण अधिक, त्या वळीं मोलानें शिवणकाम, किंबा निवडणें टिपर्णे करून दोन पैसे मिळविण्याचा व्यवसाय करणाऱ्याही बऱ्याच असतात, दक्षिणी स्त्रियांच्या पद्राचें ओझे आतां सरास डोकीवरून खांद्यावर आलें आहे. मराठमोळ्यांत काय डोकीवरून पदर घेण्याची चाळ असेल तीच. बाकी पांढरपेशा वर्गात आतां पद्र खांद्यावरूनच रुळत असतो, गुजराथी स्त्रिया मात्र साऱ्या डोकीवरूनच पदर काढतात. शिवाय डोकीवरच्या पद्राचें टोंक तोंड झांकण्याइतकें पुढें ओढून ' लाज काढण्याचा ? आणखी एक प्रकार त्यांच्यांत असतो तो निराळाच. सासूसासरा किंबा नवरा ह्यांच्याविषयींचा आदर असा “ लाज काढून? दाखवावयाचा. मग ह्या पद्रा3्यड लपलेल्या तोंडांतून अपराब्दांचा वर्षांव झाला तरी चिंता नाहीं ! लमका्यात दक्षिणी स्त्रियांपैकी एखादी तरी ठेवणीचा बुटद्ठेदार शाळू पांघरून डोलानें मिरवेळ, गुजराथी, स्त्रियांना हें उत्तरीयप्रकरण वज्येच आहे. दक्षिणी माणूस जितका सुधारणाप्रिय, तितकाच बेडर. कुटुंबाच्या विचारानेही तो अडणार नाहीं; मग ज्ञातिविचारानें त्याला कसचा पायबंद बसतो ! आज गुजराथी कितीही सुधारणेच्या मा्गाळा लागला असला तरी ' ज्ञातिबंधारण त्याला सुटत नाहीं, “ ज्ञातिसंस्था ? अद्यापही त्याला नाना तःइेनें उपसग देत दन र द्‌ ट्ट र दक्षिणी आणि गुजराथी असते. बहिष्काराचे ( सामाजिक ) शास्त्र अद्यापही त्यांच्यांत चालते. अगदीं गंजून जाऊन तें कधींच म्यानांत पडलें नाहीं. दक्षिण्याला आज कोणीही विचारतापुसता राहिला नाहीं. गुजराथी माणूस एकंदरींत फाजील हिशेबीच. पैपैचा हिशेब तर तो ठेवीळच; त्यांतही तो तपशील लिहिण्यास चुकणार नाहीं. पोटच्या पोराप्रीत्यर्थ होणाऱ्या अगदीं बारीकसारीक व्ययाची नोंद त्याच्या “ चोपड्यांत ' सापडेल. “ तुम्ही माझ्यासाठीं काय केलंत? म्हणून विचारलें तर मुलाच्या तोंडावर हिशेभाची वही टाकून चटकन्‌ तो त्याला गप्प करूं शकतो. दक्षिण्याचा स्पणच' बिनहिशेबी कारभार ! महिन्याच्या आदिअंतालाही आयव्यया'चा पत्ता लागायचा? नाहीं, तर मागले हिशेब आणि पुढचे धोरण कसचे सापडणार ? धार्मिकतेची धागधुगी अद्याप गुजराथी समाजांत कायम आहि. यात्रिची पर्वणी साधण्याची धडपड अद्याप दिसते. “ चारी घाम यात्रेच्या ' स्पेशल ? गाड्या अजूनही गुजराथ्यांनीं भरून जातात. जैनाचायांच्या नेतृत्वाखाली भाविक लोकांचा हजारोंचा समुदाय आजही पालिताण्यासारख्या पवित्र स्थलीं पायीं यात्रेनें जात असतो. ह्या यात्रांच्या पायीं लक्षावधि रुपयांचा व्यय करण्याइतकी धार्मिकता व दानशूरता अद्याप त्या संपन्न समाजांत आहे. मथुरेच्या द्वाराधीशाच्या चरणीं एकदा तरी मस्तक ठेवावें ही इच्छा अजून दिसून येते. पोर्णिमेला डाकोरच्या यत्रिचीही झिम्मड असते. दक्षिणी समाजाची धार्मिकता आतां ओहोटीला लागली आहे. नव्या पिढीनें धर्माचरणावर हत्यार उपसले असून आतां त्याची सुटका जरा कठीणच दिसते. दक्षिणी वृद्धाला आपण “ आजोबा ? म्हणतां, तर गुजराथी वृद्ध “ काका? होतो. दक्षिणी वृद्ध स्त्री ' आजीबाई ? बनते, तर गुजराथी * डोशी मा? होते.. दक्षिणी कधीं बापाला * बाप ? म्हणणार नाहीं; गुजराथी मात्र बापाला ' बापा ? म्हणूनच हाका मारतात. दक्षिण्यांच्या अनुरोधाने गुजराथ्यांतही आतां साहित्य-परिषदा स्थापन होत असून वाडय़य-संमेलने भरत आहेत. वबक्‍्तृत्वसमारंभ, व्याख्याने, साटित्यिकांचा सत्कार ह्या सर्वे प्रकारांची झोड उडवून दक्षिण्यांचा बोलकेपणा चा. प्रांतही ते हलवून गोडीत आहेत. वतेमानपत्रें ब नियतकालिके आतां केवळ डा -ई ९9 -- कांहीं माणसे बाजारभावांतील पये, आणे, पैची चर्चा करीत नसून कलेचा जोराने पुरस्कार करीत आहेत, सामाजिक विचारांचे पडसाद आतां तेथेही जोराने उठत आहेत. गुजराथी माणूस स्वच्छतेंत तर मूळचाच मागसलेला व आजही दक्षिण्याच्या मागेच; शिवाय चाळू काळांतही आपल्या जुन्या सवयी किंबा खोडी कायम ठेवणारा. दंतधावन करतांना आपल्या जुन्या पद्धतीनें बाभळीच्या काटक्या चावून चावूनच तो “ दांतवण? करील; बराच वेळ हा चर्वणविधी झाल्यावर तीच काटकी मध्ये दुभंगून जिभेवरून खराखरा फिरवील, हा सारा चवेणविधी घरांत आडोशाच्या मोरींत मात्र होणार नाहीं. तो बाहेर रस्त्यावरच्या ओरट्यावरच व्हावयाचा. त्यांतही स्त्री, पुरुष, मुळें ह्या सर्वांची रीत एकच. साहजिकच प्रातःकाळच्या फेरफटक्यांत गुजराथी वस्तींत रांगाच्या रांगा चर्वणमम़न आढळतात. रस्त्यावर पाणी सांडण्याचा तर विधिनिषेध नाहींच, समाराधनेच्या वेळीं किंवा लग्मकायंप्रसंगी आपणाकडे पंगतीचा कोण थाटमाट व केवढी रीत ! पाटरांगोळ्या, केळीचीं पानें, उदबत्त्यांचा घमघमाट, वाढण्याची रीत, वाढप करणाऱ्या स्त्रिया, संपूर्ण वाढपानंतरच जेवणा'चा आरंभ, ह्या साऱ्या बारीकसारीक गोष्टी अगदीं कसोशीने पाळल्या जातात. गुजराथी ' न्यातींत ? ती कांहींच काळजी नाहीं. साऱ्या जमातीला सामुदायिक आमंत्रण; तेव्हां कोण आला किंबा कोण राहिला हें पाहाणें नाहींच. “ वाडी ?त जागा मिळाली तर ठीकच, नाहींतर रस्त्यावर उघड्यावरच दुतफो बसण्याची तयारी. कोणी कोठेंही व कसेही बसावें. वाढण्याला रीत नाहीं कीं क्रम नाहीं. फक्त भजी, वाळ व पकवान आलें, कीं झाले. पानावर पडलें, कीं खायऴा सुरुवात; मग दोजारच्या पानावर तो पदाथ जावो वा न जावो ! कोणी कोणाला सुरुवात करा म्हणून म्हणायला नको, कीं कोणाकडे पाहायलाही नको ! दक्षिणी माणूस प्रारंभीं वरणभात घेईल, तर गुजराथी शेवटीं वरणभात मागून त्याला ' आपोष्णी ? म्हणेल. लग्नाची किंबा मर्तिकाची “ न्यात ? ( ज्ञातिजेवण ) या गुजराथ्याला टळत नाहीं. पाहुणा आला, कीं त्याच्या स्वागताच्या तत्परतेत दक्षिणी कुटुंबांत यजमाना- थासून पोरांबाळांपावेतों सवांनाच गोडाधोडाचें जेवण सारखेंच मिळावयाचें; 'ल॑वेढ्यापुरती तरी सर्वांची सारखीच व्यवस्था, “ झांकली मूठ सव्वा लाखादी ? या न्यायाने मुख्य यजमान आपली परिस्थिति दोन दिवस तांकून ठेवून प्रसंगीं न्य गोळ दक्षिणी आणि गुजराथी उसनी ऐटही आणतो आणि दोन दिवस साजरे करतो. परंतु/गुजराथी माणूस असा अपव्यय होऊं देणार नाहीं. तो पाहुण्यापुरतेच दोन पदाथ 'अधिक करील, त्याच्याच बेताची साजुकशी भाजी आणील, त्यालाच एकट्याला जेवावयास बसवील, स्वतः आपणही त्याच्या पंक्तीला बसणार नाहीं; मग दुसऱ्या कोणाची गोष्टच कशाला १ आणि तो पाहुण्याला आग्रहही करीळ, पण बेताचाच. सारा बेत त्या एकस्या पाहुण्यापुरता. पाहुण्याच्या निमित्ताने घरच्यांनीं अवास्तव चैन कां करावी हा हिशेबी विचार. पाहुणाही त्याच पद्धतींत बाढला असल्यानें त्याला ह्या एकलकांड्या भोजनाचे कांहीं वाटत नाहीं. निरोप घेतांना आपण ' येतों हं ) म्हणतों, तर गुजराथी * आकनो ' «णून सांगतो. हा ' आवजो ' आतां गुजराथेतील दक्षिण्यांनींही थोडाफार उचलला आहे. पाहुणा परत जातांना गुजराथी आतिथ्याचा मासला पाहावयास सापडतो तो कांहीं विचित्रच. सारें सामान व सारी मंडळी गाडींत बसल्यावर, निरोप देणेंधेणें आटोपून आतां गाडी चाळू लागणार, तरीही यजमान * रही जाव ने, रही जाव ने ! असे तोंडानें म्हणतच असतो. केव्हांकेव्हां हा प्रकार आगगाडी सुटायच्या सुमारालाही दिसून येतो. साहजिकच मग तिऱ्हाइताला हसं. येतें. एवढी पाहुण्याच्या राहाण्याची इच्छा होती, तर येथवर येऊंच कां दिलें ! परंतु “ रही जाव? या शाब्दांना विशेष कांहीं अर्थ नसतो. “ आपल्या 'आगमनानें विशेष आनंद झाला ? असे म्हणण्यापेकींच एक मामुली प्रकार. आपल्याकडे लमनामुंजींत मुहूते साधण्याची कोण धांदल ! परंतु गुजराथी लमविधींत ही कांहीं धांदल नाहीं. सारा बडिवार काय तो मिखणुकीचा. गुजराथेंत त्या मिरणुकीला “ वरघोडा ? म्हणतात; आणि खरोखरच अगदीं आतांआतांपावेतों त्यांच्यांतील बरराज घोड्यावर मिरवीत असे आतां मात्र मोटारीने तो मान पटकावला आहे. पानसुपारी, चांदला ( आहेर ) इत्याद सारी गर्दी, ल्न आपलें सवडीने लागतेंच आहे ! गुजराथी समाजांत प्रत्यक्ष लग्नापूर्वी वाडनिश्चप्राचें महत्तव फार. त्याला ते ६ विवाह ? म्हणतात. लहानपणींच मुलांमुलींचे ' विवाह ' होतात व मग पुढे मोठेपणीं ' लम़ ? होतें. एखाद्या दक्षिण्याला हा विवाह आणि लग्न ह्यांतील भेद माहीत नसला म्हणजे मोठी जेधा उडते; कारण ' तमारूं लगन थर्यू छे?” : नथी, * या प्रश्नोत्तरनंतर ' तमारो निवाह थयो छे £' हा प्रश्न मोठा चमत्कारिक वाटतो. न - ९ -- - कांहीं माणसें मिरवणुकींतशे डावाउजवा हा प्रकार खराच. लांबच लांब मिरवणूक काढणें, ताशांच; तडतडाट, धोडागाडींची लांबलचक रांग, बंडचा थाट हा गुजराथी मिरवणुक्रीचा विशेष. लक्षांत येतें म्हणजे दक्षिणी मिरवणुकींत स्त्रिया पुढे व पुरुष मार्गे, तर गुजराथी मिरवणुकींत पुरुष पुढें व स्त्रिया मार्गे. मुख्य विहिणीच्या डोक्यावर भली मोठी पाटी व तींत जरीच्या वस्त्रांच्या लोंबत्या घड्या. खुद्द वरराजांचा पोषाख भाड्यानें मिळूं शकतो ही कल्पना आपल्याला तरी कशीशीच वाटणार ! खुद्द हवापाण्याच्या बाबतींतही दक्षिण्यापेक्षां गुजराथी अगदीं अधिक काटकसरी. पांकड्या जागेंत तीन मजली घराचा डोलारा त्याला परवडतो. घराच्या तोंडाशींच स्वयंपाकघर व त्यांतूनच जा ये करतांना त्याला संकोच बाटत नाहीं. आलागेलाही तेथून यावयाचा ! सांडपाण्याचा व्यवहारही तो झोकळेपणीं करणार नाहीं. दक्षिणी माणसाला पाणी फार लागते ही इकडे गुजराथ्यांची फार तक्रार ! त्यामुळें घरांतील दक्षिणी बिऱ्हाडकरूंचा पहिला खटका बहुतेक पाण्याच्या वापरावरून व्हावयाचा ! सुळक्‍्यासारखे उंच, अरुंद जिने आणि माणसाला धड बसतांही येणार नाहीं अशी मोरी हा गुजराथी घराचा विदोष. दक्षिण्याला ऐसपैस जागा हवी, वापरण्याला पाणी मुबलक हवे, घरांत खेळती हवा हबी, मागेपुढे मोकळी जागा मिळाल्यावर तर अधिकच चांगलें ! एखाद्याच बाजूच्या झरोक्‍्यांतून येणाऱ्या हवेवर ऐन उन्हाळ्याच्य दिवसांतही खस्थ व्यवहार करणाऱ्या गुजराथी माणसाच्या सहनशीलतेचे मात्र आश्चये वाटतें. घरांतील कचरा ब घाण रस्त्यावर आणि तीही रस्त्याच्या मध्यभागीं फेकून द्यावी व आपले घर स्वच्छ करावे, असा गुजराथी क्रम. मग त्यापायी रस्ता खवराब झाला तरी हरत नाहीं. घरगुती स्वच्छता आपल्याशिवाय कोण करणार £! रस्ता साफ करायला नगरसभेचीं माणसें आहेतच. नगरसभेला कराच्या रूपानें पैसे देतोच कीं नाहीं ? तेव्हां रस्त्यावर घाण टाकण्याचा एक प्रकारचा हकच उत्पन्न होतो ! असल्या हिदोजी तकंपद्धतीला कोण समजावू शकणार १ खडकी किंवा पोळ हा गुजराथी नगररचनेचा विस्मयावद्द विशोष होय. अर्थात्‌ त्यांत हेतु संरक्षणाचा हें मान्य केलें पाहिजे. दुतफो उंचउंच घरें, मध्यें मा ३ ९७ -> दक्षिणी आणि गुजराथी लहानसा रस्ता, त्याला प्रवेश म्हणजे एक भला मोठा दिंडी दरवाजा, दुसरी बाजू बंद, असा हा प्रफा/ असतो. एकदा दखाजा बंद केला, कीं आंत पेटीसारखी सुरक्षितता ! परंतु याच एखाद्या पोळांतून जाण्यायेण्याचा प्रसंग आला तर नाक बंद करूनच जावें लागावयाचे ! सरकारदरबारी आतां सवेत्र इंग्रजी तारीख चाळू असली तरी कोटुंबिक व्यवहारांत अद्याप शक,संवत्‌गणना रूढ आहि. दक्षिणी माणूस शक मानतो व चेत्री प्रतिपदेला वर्षारंभ समजतो, तर गुजराथी माणूस संवत्‌ गणतो व कार्तकी प्रतिपदेला नवीन वषे सुरू करतो. नूतन वषोरंभीं दक्षिणी माणूस गुढ्यातोरणें उभारून आनंद प्रदर्शित करील, गोडाधोडाचे जेवण करील, मुला शाळेंत घालील, कडुलिंबाचा पाला चाखील, इ, इ, ' ५७/151 ४०५ 3१ ॥०७ए४ 1163 ४6९91 'ही प्रथा दक्षिण्यांत नाहींच. गुजराथी मात्र आपल्या इष्टमित्रांना आुभेच्छादशीक संदेश ब आशीर्वाद पाठवावयाला विसरणार नाहीं. शिवाय “ चोपडीपूजन ? करून नवें खातें चालवील, महाराष्ट्रांतील दसऱ्याचा सण मात्र गुजराथ्यांत बेताचाच. “ सारी शिलंगणा'चा प्रकार त्यांना ठाऊकच नाहीं. मराठ्यांचा इतिहास वेगळा, गुजराथचा इतिहास भिन्न. मराठी संस्थानांतील ६ दसऱ्याची स्वारी ? गुजराथ्यांना सानंद करमणुकीचा विषय होत असते. गुजराथंतील दक्षिणी व्यापारीही चोपडीपूजनांत भाग घेतात. दक्षिणी समाज शांकर तत्त्वज्ञान मानतो, आचारानें तो वारकरी, भक्तिमार्ग आहे. गुजराथी समाज विचाराने आणि आचारानेही बहुतांशी वछभपंथी पुष्टिमार्गी आहे. माध्वमत मानणारेही पुष्कळ, गुजराथ्यांत जैनांचा भरणा विशेष. गुजराथी देवळांतून होणारे अन्नकोट त्यांच्या अंध भाविकतेइतकेच त्यांच्या उदारमनस्कतेचे द्योतक आहित. देवळांत गेल्यावर आपली ' पाघडी ? उतरून गुजराथी देवाला लवून नमस्कार करील, हळूच दोन तोंडांतही मारून घेईल. देवापुढे शिरस्त्राण काढण्याची पद्धति दाक्षिणात्यांत नाहीं. साष्टांग नमस्कार घालतांनाही पगडी घरंगळून न जाण्याची सावधानता तो ठेवतो सणावारांत व धार्मिक आचारांत दक्षिणी-गुजराथ्यांत भिन्नता खरीच. दक्षिणी श्रीकृष्णाची जन्माष्टमी साजरी करतो, तर गुजराथी गोकुळ अष्टमीचा उत्सव करतो. मंगळागोरीतारखे केवळ दक्षिणी उत्सव गुजराथीसमाज केबळ दुरूनच पाहाणार. कन च रन कांहीं माणसें गुजराथी माणस कपड्याला “ लुगडां ' म्हणतो. “ लुगडां पेहरो? हा शब्दप्रयोत ऐकून तर दक्षिणी पुरुष क्षणभर गांगरतोच. ' ट॒गर्डे ) ह्या स्त्रियांच्या वस्त्राच्या सहद वर्णध्वनीनें त्याचा गोंधळ उडतो हें सांगणें नकोच. काटकसरी गुजराथी आठ वार धोतरजोडीवर सहज चालवितो. मागेपुढे तो सोगे सोडील. नऊ वार धोतरजोडीही दक्षिण्याला पुरेशी वाटत नाहीं. अकरा वारांची जोडी बापरणारेही आहेतच. गुजराथी माणूस वाणिज्यवृत्तींचा, संग्रशील, आतिथ्यपर. व दानशूर, दक्षिणी माणूस बुद्धिप्रधान, अल्पसंतोषी, किंचित्‌ अरेरावी व थोडाफार चैनी. बुद्धि. घेजें पीक दक्षिण्यांत विशेष खरे, परंतु दारिद्याचा दोष त्यांना कायमचा चिकटलेला; शिवाय लाखांचे व्यवहार करण्याची दुर्दमनीय महत्ताकांक्षा त्यानें कधीं धघरलीच नाहीं. सामुदायिक त्यागत्रत्तीवर त्यानें मोठमोठी कार्ये आरंमिलीं, परंतु द्रव्याकरितां त्याला इतरांकडे पाहावें लागलें व आजही लागते. मूलतः सधन व दानशूर गुजराथी वर्गाने आजवर इतरांना लाखांनीं देणग्या दिल्या. असहकारितेच्या नव्या युगापासून त्यांच्यांतही बुद्धिमत्तेचा प्रकषे झाला, समाजकारणांत स्फूर्ति आढी, राजकारणांत अग्रस्थान मिळाल, बोद्धिक विषयाकडे लक्ष लागलें, सामुदायिक, त्यागी, संग्राहक वृत्तीने कामे करणारीं माणसे आतां त्याही समाजांत निमाण होऊं लागलीं आहित. बुद्धिप्रधान राजकारण खेळविणाऱ्या दक्षिण्यावरही आज भावनाप्रधान असहयोगी गुजराथ्याने मात केली आहे. शिवाय आतां दोघांनींही मिळून बुद्धि व भावना यांच्या संयोगावर व तजन्य सामथ्यावर तिसऱ्याशीं झुंज खेळावयाची आहे. अशाच बेळीं “ रावसाहेब ' काय किंग्रा * शामळो ' काय, दोघांनींही परस्परांच्या बारीकसारीक गोष्टींकडे हसून दुलेक्ष करावें आणि मोठ्या लाभाकडे दृष्टि ठेवून एकमेकांशीं सहकार्य करावें व सप्रेम सहानुभूति बाळगावी हेंच उचित, र्क -€“&२ - । कलाकार कोल्हटकर | कोल्हटकर | £ क[य बाबुराव, काय चाललं आहे १ ” दिल्पकार महादेव काशीनाथ कोल्हटकर ह्यांच्या स्टूडिओंत प्रवेश करतां करतां मीं विचारलें “८: आ, काय १ ” बाबुराव म्हणाले, त्यांचे लक्ष मात्र आपल्या हातांतील कामाकडेच लागून राहिलें होतें “६ बुरेच कामांत दिसतां ? काय काम चाललं आहे ? ” “ कार्म कसचं हो १ रिकामपणचा उद्योग चालला आहे. रबराचे प्रयोग करून पाहातों आहे. रबराचे मिश्र...” पण त्यांचें पुढचे बोलणें कांहीं कारणानें तसेंच राहिलें. आजूबाजूला मी पाहूं लागलों तों माझी दृष्टि स्वामी रामतीथोच्या पुतळ्यावर खिळून राहिली. त्या अध्यात्मवादी योग्या'चे सर्व अंतर्भाव प्रतीत करणारी मूर्ति निमाण करणारा हा शिल्पकार रनराचे प्रयोग कां करीत आहे हें कोरडे मला उलगडेना. ह्या “ कां 'चें उत्तर कोल्हटकर असे देतात, “ अहो, तें एक माझे व्यसन आहे. ” आणि हातीं घेतलेल्या कामांत व्यसनासारखें रंगून जायचे, स्वतःला विसरायचें, ह्यांतच कोल्हटकरांच्या यशाचे मर्म आहे. नाहींतर अठराव्या वर्षा दरमहा फक्त चौदा रुपयांवर रेल्वेच्या सव्हे खात्यांत कास करणारे कोल्हटकर आज हिंदुस्थानांतील प्रमुत्त शिल्पकारांच्या नामावळींत बसते ना ! वर उल्लेखिलेल्या गोष्टीला आज वीसबावीस वर्षे झालीं. पाश्चात्य देशांत शिक्षण घेतलेल्या शिल्पकारांच्या तोडीच्या म्हणून त्यांच्या कलाकृति गाजतात. “ ह्या कलेचा श्रीगणेशा तुम्हीं गिरवलांत तरी कुठे १ शिकलांत कुणाजवळ आणि किती वर्षे १” ह्या प्रश्नाचे त्यांनीं उत्तर दिलें, :: हें पाहा सदुभाऊ, माझं ह्या विषयाचे शालेय शिक्षण फक्त दहा महिन्यांचे आहे. पण माझं शिक्षण कधींच थांबलं नाहीं. तें अजून चालूच आहे नि दोंबटपर्यंत चालू राहील. प्रत्येक कामांत मला कांहींतरी नवीन शिकायला मिळतं. ” मोठें मननीय वाटलें मला त्यांचे तें उत्तर, कलाकार कोल्हटकरांच्या शिल्पकलेचा श्रीगणेशा केव्हां आणि कसाही झालेला असो, पण त्यांच्या कलेची आर्थिक सुरुवात मात्र शाडूमातीच्या रै कड केने नच कांहीं माणसें श्रीगणेशानेंच झाली. त्यानंतर त्यांनीं शाडूच्या, पंचधातूंच्या, चांदी वगैरेंच्या अनेक मूर्ति केल्या. बडोद्याच्या माजी महाराणीसाहेबांसाठीं सोन्याचा गणपति बनविल्यावर आतां पुनश्च शाडूची मूर्ते बनवावयाची नाहीं असा त्यांनी संकल्प केला; परंतु लोक त्यांना सोडीनात. नाइलाज म्हणून अल्प प्राप्तीचा हा धंदा कोल्हटकरांना लोकाग्रहास्तव चाळू ठेवावा लागला आहे. दिल्पकार कोल्हटकरांनी आपली कलादष्टि अनेक विषयांतून फिरविली आहे. पॉटरी, काचकाम, खरारचे कापड, बनावटी आरसपान अश्या अनेक परस्परनिरपेक्ष विषयांत त्यांनीं आपल्या बुद्धीला गुंतविले, हाताला खेळविटें, द्रव्याचा व्यय केला व आपल्या उलाढाली मनाचे समाधान केलें. आज कलाकार कोल्हटकरांचें नांव सर्वांच्या तोंडीं आहे ते त्यांच्या शिल्पकटेतील नेपुण्याइतर्केच त्यांच्या ब्रॉझ धातूच्या ओतकामाबद्दलळ. ओतकामांत म्हात्रे आणि कोल्हटकर हे दोघेच त्या विषयाचे जुने तज्ज्ञ होत. पण श्री. म्हात्रे आपल्या कारखान्यांत आपलींच कामें ओतून तयार करतात, कोल्हटकरांच्या कारखान्यांत त्यांचीं स्वतःचीं कामे ओतलीं जातातच; पण इतरांचींही कामे ते विश्वासाने करून देतात, मोठमोठीं ओतकामें सुंदर व वेळेवर व्हावींत म्हणून तीं कोल्हटकरांकडे पाठविण्यांत येतात. ओतकामाला प्रारंभ करून परदेशांत जाणाऱ्या पेश्यांचा ओघ कोल्हटकरांनीं थांबविला व हिंदी शिल्पकारांना आपलीं ओतकामें करण्यास हक्काचें व विश्वासाचे स्थान निमाण करून दिले. दहा वर्षापूर्वीची गोष्ट, के. लोकमान्य टिळकांच्या स्मारक कमिटीच्या प्रदीधे प्रयत्नांनी स्मारकयोजना तयार झाली. श्री. फडके ह्यांचा नमुना मान्य झाला, पुतळ्याचें मोठें * मोडेल ? तयार झालें आणि नंतर झालेल्या विलंबामुळे वतैमानपत्री टीकेचें प्रचंड वादळ उठले, परंतु कमिटीच्या अडचणी दूर करून कोल्ह्टकरांनीं ओतकाम करून देण्याचें कबूल केल्याचे प्रसिद्ध होतांच वर्तमानपत्री टीकेची झोड एकदम बंद पडली ! कोल्हटकरांनीं फेब्रुवारी महिन्यांत हातीं घेतलेले काम जुलेमध्ये म्हणजे अवघ्या सहा महिन्यांत पुरें करून दिलें. श्री. फडके व श्री. कोल्हटकर ह्या दोन महाराष्ट्रीय कारागिरांच्या सहकार्याने निर्माण झालेली ही कृति मुंबापुरींत सागराच्या सीमारेषेवर आज उभी असून हिंदी कलेचे गुण आपल्या मूकभावानें सर्वांना पटवून देत आहि. कठीण, साहसी गोष्टींकडेच वळणे हा कोल्ह्टकरांचा स्वभावविशेष आहे. ते म्हणतात, “ कठीण वाटणाऱ्या गोष्टींत धडपडणं मला मानवतं, शंभरांतील कर 0० ला कलाकार कोल्हटकर एक होण्यापेक्षा पांचांतील एक होणंच मला आवडतं. ” पांचांपैकीं एक होण्यासाठींच त्यांनीं चित्रकलेचा नाद सोडला, चित्रकलेच्या बिषयांत अनेक माणर्से वावरणारी; त्या गदींतच आणखी एक होण्यापेक्षा विरल वहिवाटीच्या बिकट मागोकडे ते वळले. त्यांतूनच शिल्पकार निमाण झाला व दिल्पकलेश्वर मात करील अशी ओतकामाची कला त्यांनीं आत्मसात्‌ केली. बडोद्याच्या कलाभवनांत शिल्पकलेचे अध्यापक म्हणून काम करीत असतां ओतकामाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यांच्या समव्यवसायी कलावंतांना ह्या ओतकामा'ची नेहमींच अडचण भासत असे. त्यांचा धाडसी स्वभाव, शास्टीय विषयाकडे असलेला त्यांचा कल, त्यांना ह्या कामांत यरा मिळण्याने स्वतःची होणारी सोय हीं सवे ध्यानीं घेऊन श्री. तालीम आणि श्री. फडके ह्या त्यांच्या शिल्पकार स्नेह्यांनीं त्यांना ह्या कामीं आग्रह केला. त्या कामाच्या प्रयोगांत पेसे घालवून ज्यांचे हात पोळले होते अक्शांनीं भीतीही दाखवली, परंतु कोल्ह्टकरांची निर्भय वृत्ति निश्चयाने ह्या प्रयोगांत जी एकदा गुंतली ती पूर्ण यश घेऊनच पार पडली. इतरांना अनेक वर्षे घालवून न मिळालेले यश कोल्ट्टकरांनीं बारा न्महिन्यांत मिळविलें. त्या वेळीं भरलेल्या वेम्ब्ले प्रदरशांनांत जागतिक कलेचे अनेक नमुने आले होते. त्यांत हिंदुस्थानांतून आलेला ब्रॉझच्या आतकामार्‍चा गारुड्याचा पुतळा कोल्हटकरांच्या कारखान्यांत ओतला गेला होता. हिंदुस्थानांतील तें एकमेव ओतकाम होतें. त्याची तिकडे तर वाहवा झाळीच, पण तो पुतळा करणाऱ्या श्री. तालिमांना धन्यता वाटली ती त्याचें आतकाम करणाऱ्या आपल्या स्नेह्याची -बाबुराव कोल्हटकरांची ! त्यांच्या ओतकामाचा विशेष्र गुण असा, कीं मूळ कामाशीं ते तंतोतंत मिळतें. शिल्पकाराने केलेला प्रत्येक स्प त्यांत तसाच राहातो. त्यामुळे आपण शिल्पकाराच्या कृतीची नक्कल पाहात नसून एखादी मूळ कृतीच पाहात आहोंत असें पाहाणाराला वाटते, ओतकामाचा अवश्य गुण जो वजनांतीळ हलकेपणा तो त्यांच्या ओतकामांत हटकून असतो. कोल्हटकरांच्या शिल्पकलेचे नमुने दूरवर पसरळे आहेत. हिमाल्यांतीळल हंसवाहिनी लक्ष्मीची मानससरोवराजवळची मूर्ति, दक्षिणस विजयानगरच्या महाराजांचा संपूर्ण पुतळा, पश्चिमेस द्वारकेस स्थापलेळें शिवाजीमहाराजांचे स्मारक, उदेपूर, फलटण, औंध, बडोदें वगेरे संस्थानांत असलेल्या त्यांच्या डे ३ ७ -- कांडी माणसें कृति, लाहोरचा दे. भ. लाला लजपतरायांचा संपूणे पुतळा, नवसारीचा के. सयाजीराव गायकवाड ह्यांचा पुतळा, अहमदाबाद म्युनिसिपालिटीने श्री, वळभभाई पटेल अध्यक्ष असतांना उभारलेळें लोकमान्य टिळकांचे स्मारक अर्ग किती नांबें सांगाबींत ! लाहोरच्या के. सर गंगाराम ह्या दानशूर ग्रहस्थाच्या पुतळ्याची हकिगत वर विशेष उल्लेखनीय आहे. ह्या ग्रहस्थांचा एक अधेपुतळा प्रथम इटलींत तयार करून आणवला गेला; पण तो पसंतच पडेना. तेव्हां कुणीं कोल्हटकरांचे नांव सुचचावेखं, परंतु शिल्पकलेचे आगर मानलेल्या इटली देशोत्पन्न शिल्पकाराच्या ऱृतीनें नाउमेद झालेल्या लोकांना ह्या हिंदी शिल्पकाराचा भरवसा वाटेना. परंतु “' काम पसंत न पडले तर दिडकीही घेणार नाडीं ” असा सणसणीत करार करणार्‍या ह्या बाणेदार दिल्पकाराबद्दल आदर उत्पन्न होऊन थोड्या वादक मनानेच तें काम कोल्हटकरांकडे सोपविण्यांत आलें. कोल्हटकरांना यथे मेहनत करावी लागली नाहीं हं सांगणे नकोच. त्यांचें काम इतकें पसंत पडले, कीं पूर्वीचा पुतळा काढून त्यांनीं केळेला पुतळा स्मारकाच्या जागीं ठेवण्यांत आला, कै. सर सयाजीराव गायकवाड ह्यांचे सानिध्य कलेच्या निमित्ताने रोल्हटकरांना बरेंच लाभले. पुतळा करण्याच्या वळीं त्यांच्यासारख्या घोरणी माणसाला मनानें गुंतवून ठेवून स्थिर बसविण्यास कलाकाराजवळ बरेंच चातुर्य हवे. कोल्हटकर आपल्या बहु श्रतपणाच्या जोरावर “ सिटिंग ? करितां आलेल्या माणसाला नानाविध गोष्टींत रमत ठेवून त्याची प्रतिकृति मोठ्या सावधपणे तयार करतात. के. सर सयाजीराव महाराज त्यांच्या ह्या गुणावर अति खूप होते. मीरत येथील माजी कलेक्टर मि. मिल्नर ह्यांनीं त्यांच्या पत्नीचा पुतळा पूणे झाल्यावर पाठविलेल्या अभिनंदनाच्या पत्रांत ह्या गोष्टींचा मुद्दाम उल्लेख केला आहे. स्वतःची कला, स्वतःचा धंदा ह्यांना आनुषंगिक असलेल्या सर्व गोष्टींचे जान प्रात्यक्षिकांनीं करून घेण्याची कोल्हटकरांची होस व कलाविषयक साधनें स्वतः तयार करण्याची तत्परता हीं विस्मय़ावह आहेत. फोटोग्राफीपासून पोलादाचीं हत्यारें घडविण्यापर्यंतचीं सर्व कामें त्यांनीं खहस्तें केलीं आहेत. वर :: द्‌ न कलाकार कोल्हटकर त्यांच्या शिल्पकलेंतील रहस्य साघेपणा, संयम, सूचना ह्यांत आहे. व्यक्तिमत्तेचें पूर्ण दर्शन ते घडवितात. त्यांच्या कलाकृतींत गोडव्याइतकेनच तंत्रही असतें. आपल्या प्रतिभेने निसगावर संस्कार करून ते स्वतःच्या कलाकृति निमाण करतात. कोल्हटकरांनी कलाविषयाचा सखोल विचार केला आहे एस्बाद्या शुद्ध कलेइतकाच त्यांना मिश्र ( अलाडड आर्ट ) कलेबद्दल आदर वाटतो, रस्त्यावर चाक ठेवून त्याच्या चक्राकार गतीच्या साहाय्याने मातीच्या गोळ्यांतून सुंदर मडकीं, सुरया घडविणाऱ्या कुंभारालाही त्यांची कलादृष्टि दूर लोटीत नाहीं. विश्वप्रजापतीचा हा दरिद्री अवतारही आपल्या स्वतंत्र प्रतिभेचीं स्मारके निर्माण करीतच असतो. केवळ नि्धनतेमुळे आणि उनास्थमुळे त्यांच्या प्रतिभेची आज हीन स्थिति झाली ह्याबद्दल त्यांच्या कलाभिज्ञ मनाला खेद होतो. हिंदी चित्रकला, स्थापत्यकला, शिल्पकला ह्या सवे हिंदी कलांचें प्राचीन वेभव आजच्या यंत्रसिद्धीच्या अभावींही कसं थोर होतें स्याबद्दल ते वारंवार सद्वदितपणें बोलतात. आमच्या कलाकृति नमुन्यासाटीं पश्चिमेकडे डोळे लावून बसल्याने त्यांचा हिंदीपणा पार पुसत चालला आहे टें त्यांना जाचंते. म्हणूनच नानाविध प्रयोग करून आपले * हिंदीत्व राग्वण्यासाठीं ते झटतात. बाबुराव सुस्वभावी आहेत, मोकळ्या मनाचे आहेत; त्यांना सुपारीच्या खांडाचे व्यसन आहे, पत्ते खेळण्याची होस आहे. स्वतः ते गरिब्रींतून वर आले असल्यानें गरिबांच्या अडचणी ते जाणतात. स्वतःचे पहिल ओतकाम करण्याच्या वेळीं प्राथमिक ख्चोकरितां आपल्या पत्नीकडून तिच्या मालकीची एकुलती एक सवणमोटोर त्यांना उसनी घ्यावी लागली. आज ते मुस्थितीला चढळे आहेत; पण त्या सुवर्णमोहोस्चें क्ण अद्याप फिटले नाहीं असे ते म्हणतात. त्यांचे एक चिरंजीव जे. जे. स्कूल ऑफ आटंचा शिल्पकलेचा अभ्यास पूर्ण करून वाड्ययकलेचा अभ्यास करण्याच्या होसेनें कॉलेजांत शिकत आहेत. दुसरे चिरंजीव बी. एस्‌्सी.चा अभ्यास करीत आहेत. दोघेही घरच्या प्रयोगशाळेत वडिलांच्या सन्निध प्रात्यक्षिक ज्ञान घेत आहेत. मोठ्या कोल्हटकरांच्या प्रयोगशाळेत दोन छोटे कोल्हटकर तयार होत आहेत. यी -: १७9 -- कांडी माणसें आल्यागेल्याची खबर काढीत, प्रश्नोत्तराचा शब्दप्रतिशाब्द चालला असतांना एक कान कारखान्यांतील कामाकडे देऊन, आपली दृष्टि स्वतःच्या तयार होत असलेल्या कामावर खेळवून, त्याही व्याप्रत स्थितींत कोल्हटकर आपल्या आवडत्या विषयाचे चिंतन करीतच असतात, आपले बेत अस्पष्टपणं बोलूनही दाखवतात. ते मध्येंच थांबतात तें थकवा आला म्हणून नव्हे, तर आपल्या विचारांना स्वैर गति मिळावी म्हणून. अशा वेळीं त्यांच्या हातांतील आडकित्ता जोराजोराने सुपारीचीं खांडे पाडतो ती सुपारीची निकड म्हणून नव्हे. तर आपल्या विचारांना ताशीवपणा यावा ह्या अमूर्त इच्छेने । कलाकार कोल्हटकर मला दिसतात ते हे असे. इतरांना त्यांचा अधिक परिचय करून देण्यास त्यांच्या ठिकठिकाणीं उभ्या असलेल्या कलाकृति पूर्ण समर्थ आहेत. १० काला | वाडूमयांतील सावरकर दिली तिलाजली देहसुखावरि काय अश्ांस अपाय १ खुशाल घाला अशां तुरुद्धी, काय अशांचे जाय ! भीती का चतुरड्जल तपा £ दिला मृत्यु्शिरि पाय ! धन्य तुझा गे कुसवा माते! देन्य कां न तव जाय १ -- कविग्म 0, एका जन्मठेपेच्या काळ्यापाण्याच्या दिक्षेने निढोवलेल्या अट्टल, नेडर बेंदीजनाचेंही अंतःकरण फुटून जावयाचे, मग एकामागून एक दोन जन्मठेप काळ्यापाण्याची म्हणजे अखंड पन्नास वषोची शिक्षा झालेल्या एखाद्या सुविद्य, सुस्थित तरुणाची वास्तविक काय अवस्था व्हावी ! त्याचें धेय ख्चावें, त्याचा उत्साह मावळावा, असा तो प्रसंग ! कारावासांतील बंदीपालालाही त्या रसरसलेल्या तरुणाच्या छातीवरील जस्ती पत्र्यावस्ची ती भयानक रिक्षा वाचून क्षणभर कंप सुटला. परंतु त्या निर्भय तरुणाच्या अंतःकरणाची शांति क्षणभरही विचलित झाली नाहीं, कीं त्याचा धेर्यांचा एक अंदाही कमी झाला नाहीं. तो आपल्याशी म्हणाला, “ बदी पत्नासचि ना वर्षे? पन्नास कल्पना ही तो: आभास काळ केवळ, वस्तुस्थितिचा पदाथ नाहीं तो बेदी £ ती आंत तशी बाहेरही या शिवासि जीवाची पगडा तुजवरि पांचा वृत्तींचा तोंवरी न केव्हांची आनंद गवसणारा मुक्तीचा, तुज तुरुंग मानस हा त्याचा बंदी जो तू तो जूं ह वांकवूनि मान सहा. ” --“- सप्तर्षि केवढी ही अंतराची स्फूर्ति व शक्ति! सवे सामर्थ्येवान्‌ आत्म्याच्या चिरेतन मुक्ततेची आत्मप्रचीति एवढी प्रखर, कीं त्या पुढें स्थलकालाच्या कल्पनाही मानवनिर्मित मायाजन्य वाटाव्यात, तेथें पन्नास वषाची कथा काय किंवा चार वी ३ टे न्य कांहीं माणसें भिंतींच्या तुरुंगाची काय जाणीव £ असा दुर्दम्य आत्मविश्वास व अविचाल्य धैय गांडीं बाळगूनच सावरकरांनीं बंदीशालेत प्रवेश केला. तेथच्या मरणालाही मारून, काळालाही काखोटीला घेऊन ते पुन्हा नव्या जीवनानें बाहेर पडले. सुखाच्या आयुष्यांतही साध्या “ पन्नाशीची झुळुक ” माणसाची गाते अशक्त बनविते, त्याची प्रखरता खंडिते व त्याला निःसत्व करून सोडते. बंदीबासांतील खडतर जीविताची “' पन्नाशी ” सावररांना नमवूं शकली नाहीं कीं दमवू ठाकली नाहीं. त्यांचें चैतन्य तसेंच रसरसलेले आहे. कांहीं श्रेष्ठ व्यक्तींच्या अंत्नोह्य आयुष्याचा एकच एक मंत्र असतो. त्याच एक, मंत्राचा ते अखंड जप करतात व त्याचेच नवे तंत्र उभे करतात. महात्मा गांधींच्या सत्य ब अहिंसा मंत्राचा परिचय आतां अखिल जगाला झाला आहे. अध्यात्मविद्येचीं हीं सूक्म तत्त्वे राजकारणाच्या संमिश्र, राबल वातावरणांत नांदवून त्यांनीं राजकारणालाही तेवढ्यापुरत शुद्ध व पावन करून घेतलें, श्रीयुत सावरकरांनींही ' स्वातंत्रय ? हा एकच एक 3३८ कारासारखा महामंत्र आत्मोपदेशानें स्वीकारून, त्याचें अनुष्ठान अखंड चालविळें व राजकारणाइतक्‍्याच तीव्रतेने वाड्ययांतून व समाजकारणांतून स्वातंत्र्याचा घोष चालविला. मॅझिनीचें चरित्र किंवा राष्ट्रीय पोवाडे ही अचेतनालाही हलविणारी सावरकरांची वाणी सुखानें वावरू देणें तत्कालीन राज्यपद्धतीला अगदींच रुचणारें नव्हतें हें साहजिकच आहे. तेव्हां ती बंद करण्यांत यावी ह्यांत नवल ते काय ! परंतु अद्रापही तिजवरंचे पटल दूर होत नाहीं, हें आश्रचय ! कारावासाच्या तोकड्या जागेंतही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रतिभाचंडोल अडकून पडेना. तो आपल्या उंच उंच भराऱ्या कल्पनेच्या अवकाशांत यथेच्छ मारीतच असे. शरीराला बद्ध करणाऱ्या शक्तीला ही भरारी थांबवितां येणं अशक्‍य होतें. प्रतिभाविलासांतून निमाण झालेलीं गाणीं सुखरूपपणे व व्यवस्थित रीतीनें सांठवून ठेवण्याइतकी प्रखर बुद्धिमत्ताही देवाने त्यांना दिली होती. तिलाही हातसांड करण्याचें सामथ्ये पाशवी शक्तींत नव्हते. त्यांची प्रतिभा बोळूं लागली म्हणजे ती पुढीलप्रमाणे शब्द काढी -- ते ध्येय अजी! देव ज्यासि लोभावे । मृत कल्पतरु बहारावे ! पवीडहचा 8 ९ ->> वाड्ययांतील सावरकर उज्जयनीचे कळस कांचनी देखे डुलविती नव जरीपटके । चिर मूक, अहो देवदुंदुभी, वाजा; गा भाट : परींनो साजा : सिद्दासार्न, गा, । चढत फिरोनी आजी आदित्य विक्रमाचा जी! ' --- विरहोच्छ्वास स्वातंत्र्यवीराचे सुमधुर आझास्व्न जितकें मोहक, तितकेच उत्तेजक. *वीररसांतून शांत अद्भुतांत बागडणारी कविवाणी गाऊं लागते ती अशी -- : दिक्क्षितिजांचा देदीप्य रथ तुझा सुटतां। ह्या कालपथाच्या अतुट उतरणीवरता । नक्षत्रकणांचा उठे धुराळा परता । युगक्रोश दूरी । मागुती । युगक्रोश दूरी । महाराज आपुली कथा ना कुठें निघे स्वारी ! ण जरनाथाचा रथ इतर कांवजनांच्या कल्पनेलाही ठेंगणेपणा आणणारी ही प्रतिभा अचाट “नव्हे तर काय ? आणि हीच शक्ति इतक्याच तन्मयतेने व चारतेने नवनीतकोमलांगीचही शब्दचित्र काढते व ठंगाराचीं कारंजींही उडविते ! “नास्ति खल धीमतां अविषयो नाम । हे कालिदासाचे म्हणणेच खर! ? एका कारावासांतून सुटून रत्नागिरीच्या परिसरांत स्थानबद्ध होण्याचा प्रसंग आला तरी मूळची अवखळ मनोवद्ृत्ति गप्प बसूं देणार थोडीच ! अडविलेळ पाणी कुठून तरी बाहेर पडण्याचा मार्ग शोधीत असतेच, तो सापडला मात्र, कीं तेथून तें बाहेर पडते तें अफाट वेगानें. राजकारणांतील प्रतिबंधामुळे इतरत्र वळलेली दृष्टि समाजकारणाकडे वळली. स्वातंत्यवीर सावरकर हाडाचे पूण हिंदु आहेत. त्यांच्याइतका हिंदुत्वाचा प्रखर अभिमानी विरळा. हिंद जातीची पुण्यभू व कमंभू अशा ह्या भारतवर्षात राजकारणांत, सामाजिक व 'धार्मिक गोष्टींत जर्जर अवस्था असावी, तिचा कोंडमारा व्हावा ही गोष्ट -- ९७ 4 खा कांहीं माणसें त्यांच्या मनाला अतिशय लागावी, हे योग्यच आहे. ह्या अंतरींच्या व्यथेमुळच त्यांच्या तोंडून त्वेषाचे, क्रोधाचे उद्गार बाहेर पडूं लागले.- शिवाशिवीच्या मारक कल्पना, दलितवगीची सामाजिक असहायता, जुन्या आदरणीय विचारांची झालेली परागति व व्युत्कम, विचाराचा अभाव व भोळसटपणाचा बुजबुजाट, ह्यांच्याच जोडीला कपटपट्ध राजनीति, परघर्मी आक्रमण, अविवेकी राष्ट्रीय कल्पना ह्या सर्वांच्या माऱ्यामुळे चौफेर खिळखिळ्या झालेल्या हिंदुसमाजाला सुसंघटित करण्याकडेच त्यांनीं आपली सारी शाक्ति केंद्रित केली. विज्ञानयुगाच्या वाढत्या काळांत दिवसेंदिवस अनंत अँवकाशाचाही पूर्ण ठाव बेण्यास शास्त्र प्रवृत्त व समथ होत असतांना त्याच्याकडे डोळेझाक करून जुन्या आतप्तवाक्यांचा जीर्णोद्धार त्यांच्या विज्ञानी, विचारी मनाला मानवेना. धार्मिक श्रद्धा भोतिक अभ्युद्याला प्रतिबंधक होत असेल तर तिला लाथाडून पुढें गेले पाहिजे, हा त्यांचा सिद्धान्त. म्हणूनच त्यांनीं सहभोजनाची चळवळ चालविली, अस्प्रश्‍यांना धमाचे मुक्तद्वार म्हणून पतितपावन मंदिर स्थापिले, स्मृतिग्रंथांवर व पुराणावर हला चढविला, धार्मिक भावनांचा धुव्वा उडविण्याचा चंग बांधला, गोमातेला केवळ आदरणीय अवस्थेतून उपयुक्ततंत आणून बसविलें. गमतीची गोष्ट अशी आहे, कीं धार्मिक संस्कारांचे पावित्र्य व त्यांचा परिणाम स्वतः सावरकरांना एके काळीं मान्य होता ( कमला काव्य ); अलोकिक चमत्कार, समाधि, परमेश्वरी अनुग्रह, मृतात्म्यांच्या वासना ब त्यांची पूतता ह्या सर्वे गोष्टींचा साक्षात्‌ स्वीकार त्यांनीं एके काळीं केला होता. उत्तरक्रिया, उःशाप द्या नाटकांतून त्यांचा स्पष्ट खेळ दिसतो. परंतु त्यांच्या विज्ञानप्रचुर लेग्बणीला मात्र आतां तो धम मानवत नाहीं. त्यावर ती अशा कांहीं आवेशाने तुटून पडते, कीं प्रत्यक्ष एखाद्या परधर्मीयाचे खद्ठही इतक्या आवेशाने यावयाचें नाहीं. त्याचें कारणही तसेंच आहे. अभ्युद्याच्या आड येणाऱ्या ह्या गोष्टींचा त्यांचा संताप अनावर आहे. “ कृण्बन्तो विश्वमार्यम्‌ ” ह्या भावनेने सवे जग पादाक्रान्त करूं इच्छिणारी दुर्दम मनीषा जाऊन जुन्या विचार” विकारांच्या डबक्‍्यांत हिंदुजातीची कतेत्वशक्ति बुचकळत राहावी हें त्यांच्या स्वातंब्यवादी बुद्धीला पटत नाहीं, आणि पटावें तरी कसें ? त्यांची मनोब्यथा पुढील शब्दांत प्रकट होते. “' लाखो लोक बाटत आहित. आततायी मुसलमानांचे दंगे, कन्याहरणें, मंदिरोध्वंसप्रभ्रति अत्याचार साऱ्या देशभर चाळू आहित, हिंदुस्थानचे पाकस्थान बनविण्याचे घाटत साहे, मिराने घरें लाता 2 ० आ वाच्ययांतीळ सावरकर पोखरून राहिलीं आहेत, अस्पृरय आमच्या छळानें नि त्यांच्या पिसाळण्यानें कोटि कोटि फुटून जात आहित ! न राष्ट्र, न राज्य, न अन्न, न वस्त्र ” अशा विपन्न अवस्थेंत असणाऱ्या हिंदु जातीकरितां तिळतिळ तुटणारें ह्या हिंदवी स्वातंत्रयवीराचें अंतःकरण सात्त्विक क्रोधाने अभिपूजा, यज्ञविधि, गोपूजन, आसपग्रंथ, संस्कारक्रिया, सनातनधमे, इंश्वराधिष्ठान ह्या साऱ्या आसभावनांविरुद्ध बोळूं लागतें आणि त्याची सात्त्विक ऊर्मि पाहून लोकही तेवढ्यापुरते गप्प ऐकतात. हेतूची आुद्धता ब अकृत्रिम त्याग ह्या गुणांमुळे त्यांच्या वाणीची वचनीयता कोणी सूक्ष्म पारीत बसत नाहीं. नव्या विश्ञानयुगांतील सारी यंत्रराक्ति आत्मसात करून साऱ्या प्रतिबंधक व आक्रमक इाक्षाचा पुरा समाचार घेण्यास सरसावलेला “' नव्या दमाचा शूर शिपाई ” आज सावरकरांना हवा आहे. सावरकरांची बुद्धि हिंदवी, परंतु मन मराठ्याचे आहे. सह्याद्रीच्या दर्‍्याखोऱ्यांतील गूढता, त्याच्या दिखरांची उत्तंगता, त्याच्या अरण्याची गहनता आणि स्वतः त्याचीच अविकंपता त्यांचे ठायी आहे. शिवप्रभूचा स्वातंत्र्य-इतिहास त्यांच्या रोमरोमांतून निनादत असतो. नेपाळच्या एकमेव हिंदु राज्याचें विजयांकित ध्वजचिन्ह त्यांना आनंदवितें. मराठ्यांचा भगवा झेंडा त्यांचें मस्तक सादर नमवितो. सावकरांची हिंदुत्वाची कल्पना जितकी स्पष्ट, तितकीच बिश्ााल आहे. भारतवर्षाला पुण्यभू व कमभू मानणारे सारेच त्यांच्या हिंदुत्वांत येतात. शिखांचा रोमहषेक इतिहास सावरकरांच्या हिंदु मनाला विशोषरच मानवतो; त्याचें कारणही तसेंच. मोंगली सत्तेला सदास्त्र प्रतिकार करणाऱ्या त्या ध्येयनिष्ठ ; बी्यशाली, युद्धप्रवण समाजाचा उत्तरेतील इतिहास दक्षिणेंत मोंगली सत्तेला विरोध करणाऱ्या व हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या श्रीशिवप्रभूच्या मराठी अमिमान्याला कां बरें विदोष अभ्यसनीय वाटूं नये १ त्यांच्या तोंडून शीख गुरू्॑वा इतिहास बाहेर पडूं लागला, कीं प्रत्यक्ष दगडालाही पाझर फुटावा ! यावनी किंवा इंग्रजी शब्दांचे मराठीवरील आक्रमणही त्यांच्या मराठीच्या अभिमानी मनाला सहन होत नाहीं. आणि म्हणूनच त्यांनीं भाषाथुद्धीची वळवळ आरंभली व स्वजातीयांचा उपहास सहन करूनही ती चालविली. गणवृत्तांचे नियमन असह्य होणारी अक्षी त्यांची फोफावलेली काव्यप्रतिभा, प टिरचा, कांहीं माणसं मोकळेपणीं वैनायक वृत्तांत धावू. लागली, लिपीचीं सांकेतिक बंधने तोडून नवीनच वळण त्यांच्या अक्षरांनी गिरविण्याचें ठरविलें. सारांश, त्यांच्या स्वातंत्र्यप्रेमी मनाला कोठेंही सांकेतिक बंधन मानवेनासें झालें. सर्वत्र बंधने तडातड तोडून त्यांचा जीव सारखा मोकळेपणाने वावरावयास झटूं लागला. रत्नागिरीच्या काखासांतून हा “ सिंह ? सुटला आणि महासभांच्या अधिवेशनांतून त्याच्या गर्जना ऐकं येऊं लागल्या. त्यांची महासभेच्या नेत्याची भूमिका न पटणाऱ्या त्यांच्या विरोधकांनाही त्यांचे अकुतोभयत्व व त्यांचें सामथ्ये मान्य करावे लागलें. स्वबातर4प्रेमी सावरकरांच होतात्म्य केव्हांच सर्वांच्या स्पष्ट निदरानास आलें आणि जनतेने ह्या वीराची यथोचित पूजा केली. त्या वीराच्या अंतःकरणांत सध्या एकच विचार आहे तो म्हणजे -- “ तो शकला श्रीबेदा हिंदु हुतात्मा सहण्यासी जरि असह्य छळ ततप्ते तरी कां शकेन मीहि न हे छळ सहूं अहा मीहि हिंदुची असता £ हे सहेनची याहुनिही भयद असं छळ सहनची परि झटेन, जीवनांतिही झटेनची करण्यासी ही विमुक्त मातृभू पुन्हां! मुक्त पुन्हां, झुक्त पुन्हां, मनु जमंगला पुण्यभूमि पुनरुत्यित पतितपावना ! - विरहोच्छूचास आपल्या मातृभूमीला पुनरुत्थित करण्याचा ध्यास घेतलेल्या स्वातंत्र्यवीराची इच्छा पूण व्हावी आणि त्याच्या त्या तन्मयतेचा एखादा अंश तरी आपल्या ठायीं याबा असे कोणता मायभूमीचा सुपुत्र म्हणणार नाहीं ! वीरांची इच्छा व त्याग हीच सामान्य जनतेची प्रेरकशक्ति असते. “' इंश्वराचें अधिष्टान ” ते हेंच आणि त्यावर उभारलेली “' चळवळ ?” समर्थ व सुफलित होणार ह्याविषयीं संशय कशाला १ श्र ७ ... ९९ -- , । स्टॅलिन विर स्टॅलिन विरुद्ध टॉट्स्की रशियाचा सर्वाधिकारी स्टॅलिन आज साऱ्या जगाच्या कौतुकाचा विषय आहे. हिटलरच्या साऱ्या सुखस्वप्तांचा भंग करून व त्याला ररियांतून पळतां भुई थोडी करून त्यानें रशियाला तर जर्मनीच्या तडाक्यांतून वांचविलेंच, परंतु दोस्त राष्ट्रांवरचेंही जिवावरचें संकट दूर केलें. प्रे. रुझवेल्ट किंवा मि. चर्चिल ह्यांनाही स्टेलिनशीं मैत्री जोडतांना अनेक वेळां त्याची मनधरणीही कराती लागते ती ह्याच कारणामुळे. जमेनांच्या चढाईच्या धोरणाला पूर्णपणें प्रतिबंध घालून त्यांची युद्धाची सारी खुमखुमी स्टॅलिननं जिरविली, हाच त्याचा अपूव विनय! अशा तऱ्हेने आजच्या महायुद्धाच्या इतिहासांत स्टॅलिन हा अग्रमागीं आला आहे. खुद्द ररियांत तर स्टॅलिन हा जीव कीं प्राण समजला जात असेल, ह्यांत नवल नाहीं. त्यालाही प्रतिस्पार्ध नव्हते - किंवा आजही नसतील असे नाहीं. परंतु आपल्या धोरणाने व शौयानें साऱ्या प्रतिस्पध्यीना दूर सारून स्टॅलिननें कर्तैत्वाचें व अधिकाराचे उच्च शिखर गांठलें. त्याचा मोठख्यांतला मोटा. प्रतिस्पार्धे म्हणजे ट्रॉट्स्की. ह्याची ब त्याची अधिकाराकरितां जवळ जवळ दहा वर्षे सारखी झटापट चालली. ह्या दोघांच्या झुंजींत ररियनक्रान्तीलाही थोडा मार बसला व तिची थोडी पिछेहाट झाली. रशियन जनतेची तर बरीच हिसकाहिसकी झाली. परंतु ट्रॉट्स्की परागंदा झाला व विजयाची माळ स्टेलिनच्या गळ्यांत पडली. वस्तुतः स्टॅलिन व ट्रॉट्स्की दोघेही लेनिनचे निकटचे अनुयायी, लेनिनच्या क्तेतत्वानें निमाण झालेल्या क्रान्तीचीं सूत्रे त्या दोघांपैकी कोणाच्या हातीं येतात, हा प्रश्न लेनिननें आपल्या हयातींत दोघांच्याही स्वभावधर्माचें नीट निरीक्षण करून आपल्यामागे आपले कार्य कोणाच्या हातीं जावें ह्याविषयी इच्छा प्रदरित केली होती म्हणतात ! लेनिन अगदीं मरण्यास टेकला तेव्हां त्यानें एक मृत्युपत्र केलें. लेनिनजवळ देण्याकरितां संपत्ति वगेरे कांहीं नव्हतीच. फक्त रशियन क्रान्तीचीं सूत्रे त्याला आपल्या अनुयायांच्या हातीं द्यावयाची होतीं. स्टॅलिन व ट्रॉट्स्की ह्या दोघांमधील बिरोध व स्पर्धा दिसत होती, निवड ९३ ष्र न कांहीं माणसं मार्गदर्शक वचन म्हणून त्यानें पुढीलप्रमाणें लिहून ठेवलें म्हणतात. “ (०13082 53911, 130002 0600112 2९1613) 566016€[(क'४ ० (1९ ०१7५, 138 ९071061860 (८ लात०प5 [००७७ 11 1118 1391105, घात 1 9१) 10. $परा82 ॥1€ 91]७9%७ 111085 ॥०% (0 5९ (15 ७०५७ फा 5पत०81. टेप. ” ८: झाई स्टेलिनच्या हातीं अपरंपार सत्ता असून तिचा सावधगिरीने उपयोग कसा करावा हें त्यास समजत नाहीं, ” इतकेंच म्हणून लेनिन थांबला नाहीं; तर तो पुढेही म्हणतो, “' 50811 15 (०0 एपतेट. 1 ७1०७०७७ 6 [1182 प्स्णा8त2$ (0 पात 9 फश ल इढपाठश शश 5910. ""]॥15 ७॥०प॥1७(॥८९ 1199 56९8611 91 1181९111010811 (1116. उप 1 (11171) (1311001 (1९2 [01 0९७० [1८९४७॥(1119 3. 9011 11 (1९ [)१1(७, खाते ताठपणा (1९ ]०॥. ० शासण र्ण 111९ 1861911015 03)९[७6९९1 83111 घात घ०(&७ ॥. 15 101 5 ऐ1116, ठा 1. 15 पी (13 1199 ए€तपा८ १6€०1517८ 3121009110.” “ स्टलिन हा अतिशय उद्धट आहे. कसेंही करून त्याला सर्वोधिकारीपदावरून दूर केळें पाहिजे. ही गोष्ट कुणाला कदाचित्‌ क्षुछक वाटेल; परंतु तशी ती नाहीं. विशेषतः आपल्या पक्षांत दुफळी होऊं नये म्हणून व स्टॅलिन आणि ट्रॅट्स्की ह्यांचे परस्पर संबंध पाहातां तर ती आवश्‍यकच ठरेल. किंबा कदाचित्‌ ती क्षु्क असली तरी तीच पुढें उग्र रूप धारण करील, ” लेनिनचे हें भविष्य एक दोनदा वाचून दाखविण्यांत आले होतें. एकदा तर खुद्द स्टॅलिननेंच ते वाचले. पुढें मात्र ह्या मत्युपत्नाचा पागमूस नाहींसा झाला. पण, लेनिनच्या रांका मात्र खऱ्या ठरल्या. स्वतः लेनिन हा रशियन एज्यक्रान्तीचा निर्माता व महापुरुष असल्याने त्याच्या हयातींत त्याचे हे दोन अनुयायी त्याच्या अंकितच राहिले. पण त्याच्या मृत्यूनंतर मात्र जबळ जवळ ऱहा वर्षे त्या दोघांमध्ये अधिकाराकरितां झगडा चालत राहिला. त्याचें स्वरूप किती उग्र होतें, त्याची सामान्य माणसाला कल्पना नाहीं. ह्या दोन हत्तींच्या झुंजीत कितीतरी माणसें चेंगरलीं. ट्रॉट्स्कीचे संबंधी, अनुयायी, हितचिंतक, पाहाय्यक म्हणून शेकडों लोकांना मृत्युमुखीं पडावे लागलें, अनेकांना बंदिवास -- ७ द्‌ वड स्टॅलिन विरुद्ध ट्रॉट्स्की सोसावा लागला, नानातऱ्हेच्या हालअपेष्टा भोगाव्या लागल्या, खुद्द ट्रॉट्स्कीच्या जिवाची परंबड तर विचारूत्च नका ! प्रथम त्याला मध्य आशियांत डांबून ठेविलें. तेथून त्याळा हद्यपार केलें म्हणून तो तुकंस्थानल, गेला. लगेच स्टेलिनने तुर्की सरकारवर दाब आणून तेथून त्याची हकालपट्टी करविली, नतर बिचारा ट्रॉट्स्की सारखा ह्या देशांतून त्या देशांत आश्रयाकरितां सैरावैरा पळत होता. कोठेंही त्याला निश्चितपणे राहातां येईना. नाहीं म्हणावयास नेॅर्विनें मात्र मोख्या धैर्याने कांहीं दिवस त्याला थारा दिला. परंतु सोव्हिएट सरकार नॉर्वेला जेपू देना. त्याचा सारखा लकडा लागला. दोवटीं नॉर्वेनेंही टरॉट्स्कीला घालवून दिलें. सबंध युरोपांत ट्रॉट्स्कीला 'नवाऱ्याची जागा सापडेना, शेवटीं जिवाच्या आडोनें टरॉट्स्की दक्षिण अमेरिकेंत मेक्सिकांत बसतीला गेला. परिणाम असा झाला, कीं रशियन सरकार मेक्सिकोशीं कोणतेही सलोख्याचे संबध ठेवावयाला तयार होईना. इकडे मॉस्कोमध्य ट्रॉट्स्कीची चवकशी सुरू झाली. सर्वे पुरावा ( अर्थात त्याच्या पश्चातच ) तपासला गेला. अकद्या चबकशीचा निकाल काय लागला असेल हे सांगणं नकोच ! संशयावरून अनेकांचा अनेक तऱ्हेने छळ झाला, दोवटीं मेक्‍्सिकोमध्येच ट्रॉटस्कीचा करुण शहोवट झाला. स्टेंलिनचा प्रतिस्पधि दूर होऊन स्टॅलिनच्या एकट्याच्या हातीं सारी रशियन सत्ता आली. स्टॅलिन व ट्रॉट्स्की ह्या दोघांत व्यक्तिविरोधही होता व थोडाफार तत्वविरोधही होता. ट्रॉट्स्की हा युक्रेनियन ज्यू, तर स्टॅलिन निरक्षर, जॉर्जिअन चांभाराचा मुलगा ! कसेही असलें तरी ट्रॉट्स्कीला स्टॅलिन आवडत नसे. त्याचा त्याला नेहमीं तिटकाराच वाटे. ट्रॉटस्कीला स्टॅलिन हा संकुचित मनोवृत्तीचा, प्रादेशिक कुटिळ मनोवृत्तीचा वाटे. जागतिक क्रान्त, चीनमधील क्रान्ति व खुद्द रशियन राज्यक्रान्ति व तिची प्रगति ह्यांसंबंधीं त्या उभयतांमध्यें बराच मतभेद असे. स्टॅलिंनच्या मनांत प्रथमपासूनच ट्रॉट्स्कीविषयीं मत्सर होता. खुद्द लेनिन असतांनाच त्याचा मत्सर वारंवार प्रकट होई. उलट स्टेलिनला वरच्या पदावरून दूर करावा म्हणून एकदा ट्रॉट्स्कीनेच लेनिनला निश्धन सांगितलें. ट्रॉट्स्की हा उत्कृष्ट सेनापति होता. लाल सेन्याचा नायक म्हणून त्यानें अनेक वेळां महत्त्वाची कामगिरी केली होती. स्वतः लेनिननें त्याचा त्या कामगिरीबद्दल गोरव केला होता. त्याला रशियन भाषा उत्कृष्ट -- ७७-- वांद्दी माणसें अवगत होतीच, शिवाय जर्मन, फ्रेंच ह्याही भाषा नांवाजण्यासारख्या येत होत्या. एकदा तर एका प्रतिनिधींच्या सभेंत प्रथम अडीच तास जर्मन भाषेत, नंतर अडीच तास फ्रेंच भाषेत व शोवटीं अडीच तास स्वतःच्या रशियन. भाषेंत त्यानें वक्तव्य केळे आणि अगदीं थोड्या विश्रांतीच्या, पण सरळ साडेसात तासांच्या भाषणाने व भाषानेपुण्याने त्यानें सर्वांना चकित केलें. परंतु ट्रॉट्स्की अतिशय सडंतोड व टीकेच्या कामीं अतिशय निर्दय होता. त्याला मनुष्य- स्वभावाने, विशेषतः त्याच्या नाजूकपणाचें, म्हणण्यासारखे शान नव्हते, किंबा असलें तरी त्यांकडे तो दुलेक्ष करी. आपल्या मार्गात येणारांना तो स्वुशाल तुडवून जाई आणि ज्यांना ज्यांना तो तुडवून जाई त्यांना त्यांनाच नेमके उचठून स्टॅलिन हाताशीं धरी. ट्रोट्स्की कोणाच्याही हाताखालीं काम करण्यास तयार नसे. खुद्द लेनिनचा दुस्यम म्हणून नांदणेही त्याला कसेसेच वाटे. लेनिनचा उजबा हात म्हणवून घेणेही त्याला रुचत नसे. कोठल्याही कार्यक्षेत्रांत अग्रस्थानी असल्याखेरीज त्याच्या जिवाला चैनच पडत नसे. टॉट्स्की लहरी, संतापी होता. त्याच्या भाषणांनीं सभा हादरून जात, पण वैयक्तिक व्यवहारांत तो अगदींच रुक्ष होता. लोकही त्याच्याशीं बेतास बेतच वागत, स्वतः सवोशीं अगदीं प्रेमळपणे वागणारा लेनिनही ट्ट्प्कीशीं बोलतां वागतांना थंडपणाच धरी. स्वतः ट्रॉट्स्की टापटिपीचा व व्यवस्थेचा भोक्ता होता. पोषाखांत तो नीटनेटका असे, त्याचें ' ऑफीस ' अत्यंत सुसजित असे. सवे कामांत अनियमितपणे वागणाऱ्या व दिरिंगाड करणाऱ्या रशिवन लोकांना नियमितपणा व वेळेचें महत्त्व शिकविण्याचा तो कसोशीने प्रयत्न करी. त्यांच्या ह्या गुणांमुळे तो शिपाइगिरींत सरसावला, पण मुत्सद्देगिरींत मागें पडला, स्वतः ट्रॉट्स्कीनें आपल्या पक्षांत आपलें महत्त्व वाढविण्याचा म्हणण्यासारखा प्रयत्न केलाच नाहीं. तो स्वतःला सवोहून वरचाच समजे. ह्याच त्याच्या श्रेष्ठगंडामुळें त्याचा नाश झाला. *> सन १९२१ च्या मे महिन्यांत प्रथम लेनिन आजारी पडला; तेव्हां मोल्कोच्या बाहेरच, जवळच्या खेड्यांत, ट्रोट्स्की विश्रांति घेत होता. लेनिनच्या ह्या दुखण्यांत कदाचित त्याचा अंतही झाला असता. लेनिनच्या खालोखाल ट्रॉट्स्कीच रदियांत मान्यतेला चढलेला होता. परंतु इतके असूनही, पहिले तोन दिवस लेनिनच्या आजाराची ट्रॅट्स्कीला कांहींच माहिती नव्हती, स्टॅलिन विरुद्ध ट्रॉट्स्की ट्रॉद्स्कीचें गाऱ्हाणे असे, कीं आपला प्रतिस्पा्धि स्टॅलिन व त्याचे साहाय्यक ह्यांनी ही बातमी मुद्दामच आपणास कळविली नाहीं. परंतु, प्रश्न असा, कीं द्या महत्त्वाच्या वेळीं ट्रॉट्स्कीचे सेक्रेटरी काय करीत होते £ त्याच्या पक्षांतील त्याच्या हस्तकांनीं मनांत आणलें असतें तर सहज अगदीं थोड्या वेळांत त्यांना ट्रॉट्स्कीची गांठ घेतां आठी असती ब त्याला मोटारींत घालून मॉस्कोला आणतां आलें असतें. परंतु दुदेवाची गोष्ट ही, कीं ट्रॉट्स्की स्वतःला इतका थोर समजे. स्वतःचे दुय्यम किंबा हस्तक वागविण्याकडे त्याचें लक्षच नसे. त्यामुळें त्याचे शत्रु सहज त्याला घेरीत व त्यावर मारा करीत. स्टॅलिन स्वतः टॉट्स्कीप्रमाणे लेखक किंवा वक्ता नाहीं. शिवाय रिक्षण, संस्कार इत्यादि गोष्टीत ती थोडा कमीच भरेल. परंतु खपक्षाचे सेक्रेटरी स्वतःचे साहाय्यक म्हणून जबळ भाळगण्यास स्टॅलिन कधींही चुकला नाहीं. अनेक मोठमोठ्या भाषणांपेक्षां त्यांचाच त्याला अधिक उपयोग झाला. १९२४ च्या जानेवारींत लेनिन वारला तेव्हां प्रक्ृतिस्वास्थ्यासाठीं ट्रॉट्स्की कॅकेशस पर्वतावर गेला होता. तेव्हां हा प्रवास मॉस्कोहून चार दिवसांचा होता. लेनिनच्या प्रेतयात्रेला टॉट्स्की अर्थातच नव्हता. परंतु ही गोष्ट फारशी महत्त्वाची नव्हती. टॉट्स्कीच्या गेरहजेरींत स्टॅलिन आणि मंडळींनीं त्याचा कसा धुव्वा उडवावबयाचा हें निश्चितच केलें होतें व ट्रॉट्स्कीला केवळ विरोधकाच्या भूमिकेवर आणून ठेविलें होतें. अश्या रीतीने स्टॅलिन हा पक्षाधिकारी व ट्रॉट्स्की हा विरोधक बनला. तथापि, त्याचा विरोध मात्र फारच जोराचा होता. सरकारी नोकरींतील त्याचे सारे अनुयायी निवडून काहून टाकण्यांत आले. विश्वविद्यालयांतील विद्यार्थीवर्ग मात्र त्याच्या अनुयायांत मोडत असे. स्टॅलिन व ट्रॅट्स्की ह्यांच्या राजकीय विचारसरणींत बराच भेद होता. दोघांतील मत्सर व स्पधा हीं तर पराकोटीला गेलीं होतीं. वस्तुतः दोघांचेंही साध्य एकच व दोघेही आपल्या साध्याकरितां प्राणही अपण करण्यास तयार; परंतु वैयक्तिक विरोधामुळें दोघेही एकमेकांना वारंवार पायबंद घालीत, लेनिनच काय तो दोघांना थोपवून धरू शके, रशियन क्रान्तिकाकांत दोघांत पहिला कोण हा वादाचा प्रश्न आहे. परंतु पुष्कळशा तात्विक गोष्टींत दोघांच्या विचारसरणींत अंतर प्रमाणाचे व वेळाचेंच असे. चीनमध्यें कामगारांची क्रान्ति व्हावी अर्स दोघांनाही वाटे, ट्रॉट्स्की डं त ० कांहीं माणसं म्हणे ती तात्काल व्हावी, स्टॅलिनला ती थोड्या अवधीनें झाली तरी चालण्यासारखी होती, रशियन संपन्न शेतकऱ्यांचा - कुलाक (1<॥]] ) - प्रथम बींमोड करावा, असा ट्रॅट्स्कीचा आग्रह. स्टॅलिननें प्रथम ट्रॉट्स्कीचा १९२८त बींमोड केला व नंतर दोतकऱ्यांचा समाचार घेतला. जगांतील सवे कामगारांचे एकीकरण व्हावें व सर्वे देशांत कामगारांच्या क्रान्त्या व्हाव्यात, अशी ट्रॉट्स्कीची इच्छा; परंतु ररियन कामगारांच्या क्रान्तीनंतर स्टेलिनच लक्ष इतर देशांतील कामगारांकडे म्हणण्यासारखे वेधेना. स्टॅलिन अधिकारावर आला व थर्ड इन्टर नॅशनलचें ( कोमिन्टन ) महत्त्व संपुष्टांत आलें आणि क्रेमलिनचें वचेस्व सुरू झालें. स्टॅलिनच नवें अर्थशास्त्रीय धोरण (०७ 1200101117 7010०0-॥श८?) ट्रॉट्स्कीला मान्य नव्हतें. त्याच्यामतें त्या धोरणामुळे रशियांत हळूहळू नव्या भांडवलशाहीचाच लहानक्या प्रमाणावर प्रारंभ होत होता. इतरत्र कोठेंही क्रान्तीचा प्रयत्न फसला, तर ट्रॉट्स्की त्याचा दोष स्टॅलिनवर लादी. स्टॅलिनच्या कारभाराने ररियांत सुबत्ता निमाण झाली नसली तरी निदान स्वास्थ्य निर्माण झालें होते; परंतु नेमक ह्याचेच ट्रॉट्स्कीला वैपम्य वाटे. | ट्रॉट्स्की आवेशाने, तावातावाने भयंकर क्रान्तीच्या गोष्टी बोले. स्टॅलिन भयंकर कृति करी. स्टेलिनचे वागणें व ट्रॉट्स्कीचें विरोधी गरजणें ह्या केचींत त्यांच्या अनुयायांची तारांबळ उडे. असे म्हणतात, कीं स्ुद्द लेनिनलार्ह आपल्या मागें स्टॅलिन रशियाचा -:॥(थकारी व्हावा असं वाटत नव्हते. त्याला स्टेलिनचीं अर्थशास्त्रीय मतें किंवा सामाजिक तत्त्वज्ञान मान्य नव्हते, असें नाहीं. परंतु, त्याच्या मते स्टॅलिन अत्यंत उद्धट व अधिकाराचा फाजील लोभी होता. स्टॅलिन-ट्रॉट्स्की विरोधानें खुद्द रशियन क्रान्तीलाही थोडेफार हाद्रे बसलेच. ट्रॉट्स्की वारंवार कामगारांना चेतबी व त्यांना भावी संकटाचा इषारा देई; पण, हाच त्याचा सोव्हिअट यूनिअनवर उपकार 'झाला. जसजसा तो प्रहार करी, तशीतशी स्टॅलिनची बाजू बळकट होत जाई. स्टॅलिन जें जे करी, त्याला त्याला र्रॅटस्की चूक म्हणे; परिणाम असा होई, कीं स्टेलिनचे चहाते त्याच्या कोणत्याही कृत्याला त्यामुळें उचळून धरीत. ट्रॉट्स्की म्हणे, कीं स्टॅलिन हा माझ्यापेक्षां कमी व सामान्य बुद्धीचा आहे. स्टॅलिनचे अनुयायी म्हणत, कीं स्टॅलिन हा अत्यंत थोर ब अत्यंत बुद्धिमान आहे. शेवटीं शेवटीं तर स्टॅलिनच्या हातून केव्हांही कांहींही उ॒कीचें होणार नाहीं, असें लोकमत तयार झालें. स्टॅलिन वखर्च चढत गेला व न र (व स्टॅलिन विरुद्ध टॉट्स्की मिळत गेळेला अधिकार खंब्रीरपणें आत्मसात करीत गेला. ह्या यंकर चढाओढींत पराजित होऊन ट्रॉट्स्कीला कारावास, हद्दपारी, भोगात्री लागली. जिवाच्या आहोनें देशोदेशीं पळावे लागलें. शेवटीं अज्ञात माणसाच्या हातून मृत्युमुखी पडावे लागलें ! सवेस्वाचा नाश होण्यापूर्वी पुनःश्व सत्ता मिळविण्याचा टोंट्स्कीने एक निकराचा प्रयत्न केला. आपले अनुयायी व विशेषतः लाल सेनिक आपल्या बाजूनें बंड करतील अशी त्यास आश्या होती; परंतु ती फसली. बंडाचा प्रयत्न हुकला. मोख्या कष्टाने ट्रॉट्स्की त्यांतून निभावला. शेवटीं रशियांतून त्याची हकालपट्टी झाली. १९२८ च्या जानेवारी महिन्याच्या सोळाव्या तारखेला स्टेशनवर लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटल्या. त्या गाडीनें ट्रॉट्स्कीला मध्य आरडियांत बंदिवासांत पाठवावयाचे ठरले होतें. स्टेशनवर माणसांची बेसुमार गर्दी जमली. सारी आगगाडी माणसांनीं वेहून टाकली. लोकांना रीघ मिळेना, शेवटीं गाडी सुटण्याची वेळ झाली तरी गाडी जागची हालण्याचें कांहींच ःचन्ह दिसेना. लोकांनीं ट्रॉट्स्कीच्या नांवानें घोष सुरू केला; पण ट्रॉटस्की कोठेंच दिसेना. शेवटीं एकदाची गाडी हलली; पण त्या गाडींत ट्रॉटस्की नव्हताच ! लोकांचा हा प्रचंड जमाव पाहून ट्रॉट्स्कीला त्या दिवशीं नेण्याचें रद्द करण्यांत आले. दुसऱ्या दिवशीं त्याची रवानगी करण्यांत आली. ट्रॉट॒स्की आपल्या पायांनीं चाळेना म्हणून त्याला माडीवरून उचळून आणून मोटारींत ठेवण्यांत आलें ब मोटारींतून आगगाडींत बसविण्यांत आलें. स्टॅलिन अतिशय धिमा, धोरणी, निश्चयी, कठोर आहे. बोलतांना तो श्ांतपर्णे, सावधगिरीने बोलतो. त्याचें बोलणें सामान्य दर्जाचे असतें. ऐकणाराला थक्क करून सोडील असे त्यांत कांहींच नसतं. एखाद्या अर्थशास्त्रज्ञाला कदाचित त्याच्या सांगण्यांत कांहीं तथ्य वाटावयाचें नाहीं. त्याच्या भाषणांत बुद्धिमत्ता, विनोदी कोटिक्रम एकंदरींत कमीच ! परंतु, त्याचा थंडपणा, काम करण्याची धमक, शांत स्वर ह्या सर्वांवरून त्याच्या अंतःसामथ्यांची ब विशेषतः त्या सामर्थ्यांच्या जाणीवेची चांगलीच प्रचीति येते. हा माणूस नांवाप्रमाणेच खरोखर कणखर मनोवृत्तीचा असला पाहिजे ह्याची सहज साक्ष पटते. ट्रॉऱ्स्कीच्या मागें त्याच्या नांवावर जे जं कांहीं नांवा जण्यासारखे होते, ते तें पद्धतशीरपणे पुसून टाकण्यांत आलें. लेनिन आणि ऱंट्स्की अशी जोडी कांहीं माणसें लोकांन्मा ध्यानींही येऊं नये, तर लेनिन व स्टॅलिन हीच दुकल लोकांच्या सदैव स्मरणांत असावी अशी स्टॅलिनची प्रबळ इच्छा ! स्टॅलिन हा थोर माणूस आहे ह्यांत शंकाच नाहीं; नाहींतर तो इतक्या मोठ्या पदवीला पोचताच ना ! परंतु कित्येक वेळां थोर माणसांच्या आंगींही सामान्य माणसाचे दोष आढळतात. मत्सर, दुखावठेला अहंकार, अधिकारलालसा, अनेक बरेवाईट विकार थोरामोठ्यांनाही नाडतातच. त्याच विकारांनी स्टॅलिनलाही झपाटले. रशियांत ट्रॉट्स्कीचें नांबही उरूं न देण्याचा स्टॅलिननें यंग बांधला, ट्रॉट्स्कीचे ग्रंथ रशियन वाचनाल्यांत संदभोकरितांही मिळत नाहींत. त्याचे ग्रंथ, त्याचें सर्व लिखाण, त्याचीं चित्रे, ह्यांचा नाश करण्यांत आला. टॉट्स्कीचें चित्र बाळगणें म्हणजे रशियांत मृत्यूला आमंत्रण आहे. सवे इतिहास, ज्ञानकोश पुनःश्व लिहिण्यांत येऊन त्यांतून ट्रॉट्स्की व त्याचें कार्य बगळण्यांत आलें किंवा विपरीत करून दाखविण्यांत आलें. लालसेनिकांचा पराक्रम सांगतांना ठ्रॉट्स्कीचं नांव घेण्याची सोय नाहीं. इतकेंच नव्हे, तर वादाकरितांही ट्रॉट्स्की किंवा त्याचें मत ह्यांचा उच्चार करतां येत नाहीं. न जाणों त्यांच्या केवळ नामोच्यारानें किंवा विरोधी मतप्रदर्शनानेही लोकमत तिकडे झुकलें तर ! प्रत्यक्ष रशियन क्रान्तीच्या इतिहासांत ट्रॉट्स्कीचे नांवही नाहीं. . उलट एक हुकुमशहा कामगार-क्रान्ति-विरोधक, अशा तर्‍्हेनंच ट्रॉट्म्कीचा उलेख शक्‍य आहे. स्टॅलिननें ग्रॉटस्कीचे सारे अनुयायी तर दूर केळेच, पण त्याबरोबरच स्वतःचे सारे विरोधकही बाजूस सारले ! आज ररशियांत स्टॅलिन सर्वे कल्पनांचा जनक समजला जातो. जें ज चांगलें, तं ते स्टेलिनमुळे, असे मानण्यांत येतें. कोठल्याही ग्रंथाला स्टेलिनच्या बचनाशिवाय शोभा येत नाहीं. विषय पुराणाचा असो किंवा अध्यात्माचा असो, स्टॅलिनचें नांव व त्याचें एकाद दुसरं अवतरण तेथे आढळतेच. रशियांत स्टॅलिन नांब धारण करणारीं नऊ गांवांचीं नांवें आहेत. पोस्टाला ते एक घोटाळ्याचे कामच ! स्टॅलिन कामगार लोकांत फारच प्रिय आहे. स्त्री कामगार त्याला नेहमीं आशीवबोद देत असतात. रशियन मुलें त्याच्या नांवाने वारंवार जयजयकार करतात. स्टॅलिनचें युद्ध-कतेत्ब साऱ्या जगाला ठाऊकच आहे. श्र स प्र - डा ७ , मास्तर ] मास्तर | मास्तरांमध्यें त्यांची बरोबरी करू शकेळ असा दुसरा कोणी नव्हता. कोणालाही आदर वाटावा अशीच त्यांची योग्यता होती. कुशाग्रबुद्धि, विलक्षण ह्मरणराक्ति, गाढ विद्दत्ता, अखंड व्यासंग, विद्याथ्यीवर अकृत्रिम प्रेम, विद्यादानाची अपरंपार आवड, स्वतःच्या व्यवसायाविषयी आदरबुद्धि, स्वजा तीयांशीं निमत्सर वर्तणूक, विद्याथ्यीच्या उत्कषींची कळकळ, उत्कृष्ट शिक्षकाचे हे सर्व गुण त्यांच्या ठिकाणीं होते. मागच्या परंपरेंत अभ्यारूकम पुरा केला असल्यानें भरपूर पाठान्तर झालेलें. कोठचाही विषय निघो, अवतरणांचा व सुभाषितांचा नुसता ओघ वाहूं लागावयाचा. ८ अमुष्य विद्या रसनागय्रनर्तकी ” ह्या कालिदासाच्या वचनाप्रमाणे सारी विद्या त्यांच्या जिव्हाग्रीं सारवी नाचत असावयाची. ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी गमत वाटावयाची - आश्चर्यही वाटावयाचें. एग्बायया छोकाचे चार चरणही ध्यानीं न राहाणाऱ्या विद्याथ्यांना तर मोठाच अचंबा वाटावयाचचा. बुद्धिमान विद्यार्थ्यांना विद्येविषयीं विदोप प्रेम वाटूं लागावयाचें. सकाळच्या समयाला थंड पाण्याचे स्नान करून धार्मिक आन्हिक कर्म उरावया'चें, कपाळावर दुबोटी आडवें गंध लावावयाचें व नंतर आवडीच्या विद्यार्थ्यांना संथा देण्यास प्रारंम करावयाचा, प्राचीन काळच्या गुरुग्र्हीं आचार्यांच्या समोर पोथीवरून किंवा तोंडानेंच अध्ययन करणाऱ्या विद्याथ्यांच्या परंपरेचेंच चित्र तेवढ्या- वेळापुरते उर्भे राहावयाचे. सकाळचें विद्यापठण झालें नाहीं तर मास्तरांना चैनच पडावयाचे नाहीं. घरीं आवडीनें शिकविण्याचे व्यसनच. शिकवण्या कराव्यात, पैसे मिळावेत, धावपळ करावी, लोकांच्या घरीं आर्जेबानें ट्रव्यसंपादनावर दृष्टि ठेवावी असला विचारही मास्तरांच्या मनाला कधीं शिवत नसे, विद्येचे ते अव्यभिचारी निष्ठावान उपासक होते. विद्येचा उपयोग पोटभरूपणानें, बाजारीपद्धतीनें विकण्यांत करणें, हें त्यांना लांछन वाटे. जी विद्यादानाची हौस घरीं तीच शाळेंत. आपला साधाच पोशाख चढवून मास्तरांची स्वारी एकदा शाळेंत गेली, कीं वर्गांच्या व्यवसायाशी तन्मय व्हावयाची. अवांतर गोष्टींकडे त्यांचें लक्षच जावयाचे नाहीं. वरिांची -ः "१ ३ क कांहीं माणसें मनधरणी, इतर शिक्षकांशी बायफळ गप्पागोष्टी, गांवगोष्टींची निरर्थक चौकशी, इतरेजनांचा बाष्कळ कोटिक्रम, अवांतर पंचायती - भानगडी - असल्या बिययेला बाधक गोष्टींकडे ते ढुंकूनही पाहात नसत. स्वतः ते त्यापासून अलिप्त राहात परंतु त्यांचा अलिप्तपणा उग्र नसे, तर सौम्य असे. सामान्य प्रकृतीचीं माणसे अश्लींच असणार, असेही त्यांना वाटे. त्या कारणांनीं असल्या प्रकारांचा: ते निषेध करीत. परंतु कोणाही व्यक्तीशीं विरोध करीत नसत, कीं कोणालाही ते टाकून बोलत नसत किंबा कोणाशीं संजंघही ते तोडून टाकीत नसत. ह्याच त्यांच्या सौजन्यामुळें सवाना ते हवेहवेसे ब आपलेच वाटत. वर्गात शिकवितांना स्वतःच, विषयाशीं ते अगदीं तद्रप होऊन जात. केव्हां केव्हां ते आपल्याशींच 'रंगत, त्यासुळे त्यांची रसवती विशेषच वाढे, त्या प्रवाहांत डुंभण्याची शक्ति असलले विद्यार्थी आनंदित होत, बाकीचे नुसते कांठावरूनच तटस्थपणें गंमत पाहात. असा प्रकार रोजचाच असे. शिकविण्याच्या भरांत मास्तर वेळेचेंही भान विसरत. घंटा होऊन गेली तरी त्यांचे शिकविणें चाठूच राही. क्वचित विद्यार्थ्यानाही भान राहात नसे. इतर शिक्षकांनीं वगाच्या समाधीचा भं. करावा, तेव्हां सर्वांच्या ध्यानीं ही गोष्ट येई. राहिलेला विषय निरुपायाने तसाच अधेवट टाकून, स्वतःशींच गुणगुणत मास्तर वगाचे बाहेर पाऊल टाकीत, विद्याथीही आपल्या पुढच्या उद्योगाला लागत. मास्तरांच्या जुन्या बुद्धीला शिक्षणशास्त्राचे वळण लागलेले नव्हते, लागणें शक्यही नव्हतें. छडी वाजे छमछम, विद्या येई घमघम्‌, असे मानणाऱ्या गुरूंच्या तालमींत अध्ययन झालेलें, स्वतः भरपूर पाठान्तर करून विद्या जिवंत ठेवलेली, स्वतःच्या विद्याथ्योना विद्यादान करतांना तीच पद्धति पाळलेली, अशा स्थितींत पाठान्तराच्या मुळावर आलेली, शिष्याला रिक्षेचें बोट्ही न लावणारी, असली अभिनव पद्धति त्यांना मुळीं चमत्कारिक वाटे. मुलांचे मानसशास्त्र, अभ्यासाची पूर्वतयारी, विषयाचा प्रारंभ, मध्य, शेवट, तपासनीसांचे शेरे इत्यादि गोष्टी त्यांना बेचैन करीत. शिक्षक हा जन्मजात असावा लागतो, शिक्षणशास्त्राचा अभ्यास करून रिक्षक बनतां येत नाहीं, असा त्यांचा अनुभव होता. त्यामुळें अलीकडे शाळांतून जारीनें अमलांत येत चाललेली नवी शिक्षणपद्धति त्यांच्या आंगीं उतरत नसे. मास्तर आपल्या विषयांत पूर्ण पारंगत खरे पण नव्या पद्धतीनें शिकविणे त्यांना कसें जमणार १ मास्तर 221 ससकसगसलभ ते एकदा शिकवू लागले, कीं स्वतःचेंही देहभान विसरणार तेथें त्यांना वेळेचीही द्ध कशी राहाणार १ पण हा त्यांचा गुण असलां तरी तो नव्या शिक्षणपद्धतींत, कसा बसणार १ तेथें घंटा होतांच वर्गांत पाऊळ टाकलें पाहिजे, वगावर पथम चोफेर नजर फिखून मुलांच्या रांगा नीट आंखीव ओळींत बसविल्या पाहिजेत, विषयाचा प्रारंभ, मध्य सांभाळला पाहिज व तास संपण्याच्या गेटेच्या नादांत शोवटरचें वाक्‍य संपविले पाहिजे ! दोन मिनिटें अगोदर शीकविणे संपळें तर काय करावयाचें १? दोन मिनिटें खस्थ बसून कर्से एहाणार ! किंबा घंटा झाली व दोन वाक्यें राहिलीं तर सांगायला वेळ कोटून आणणार १ बरोबर वेळेवर धडा न संपवील तो मास्तर कसचा : इतका प्रांत्रिकि कांटेकोरपणा जिवंत माणसाच्या आंगीं येणार तरी कसा १? एखादा विषय रंगला तर टिकविणे त्या तासाला अर्थेही राहील, किंवा कांहीं कारणानें पास्तराचें चित्त स्थिर नसेल तर अध्यांच वेळांत सगळाच धडा संपेल. परंतु ठराविक चाकोरींतूनच जाणाऱ्या पद्धतीला ह्या गोष्टी कशा मान्य व्हाव्यात १ 'ऐवें लक्ष अंतरंगापेक्षां बाह्यरंगाकडेच विदोप. बाह्यरग सजविणे मास्तरांना कधींच जमत नसे; त्या कारणानें शाळा तपासनीसांच्या रोर्‍्यांत मास्तरांच्या संबंधाने नेहमीं कांहींना कांहीं उणीवच नमूद असे, कोठें वेळेचें अनुसंधान सांभाळले नाहीं म्हणून, कोठें पाठान्तरावर अभध्कि भर दिला म्हणून, कोठें सबंध तासांत वाजवीहून अधिक सुभाषिते आलीं म्हणून, कोठें विषयाचा विस्तार फार झाला म्हणून, असे अनेक खुळचट आक्षेप घेतले जात. एवढे गाढ व्यासंगी, परंतु एका विदिष्ट पद्धतीला पारखा झाल्याने हव्या त्या पोरसवद्या, अननुभवी व्यक्तीने केवळ विलायती विद्येच्या अल्पकालीन परिचयाच्या जोरावर झाडलेळे अनेक ताहोरे त्यांना मुकाट ऐकून घ्यावे लागत ! केवळ कालचे पोर म्हणून ज्याचा उलेख करतां येईल अश्या कोणींही उठावे, विलायतची वारी करून कोठच्या तरी तिकडच्या विद्यापीठांत वर्षभर बसावे, येतांना एखादे सर्टिफिकिट मिळवून यावें व तेवढ्या आधारावर शिक्षणशास्त्री म्हणून मिखावें ! विलायती प्रतिष्ठापत्रांची भुरळ आमच्या बुद्धीवर इतकी पडली आहे, कीं त्यांच्या योग्यायोग्यतेची किंवा खरेखोटेपणाची दांकाही कधीं आमच्या मनाला शिवत नाहीं. विद्येचे हे हाल मास्तरांच्या मनाला फार जाचत., आंतल्या आंत त्यांचा कोंडमारा होई शिवली कांहीं माणसं अंतर्यामींची विद्यादानाची तळमळ त्यांना गप्प बसूं देत नसे, उलट नव्या पद्धतीचा फोलपणा पाहून त्यांचा उबग फारच वाढे. त्यांची ही तगमग त्यांच्या स्नेह्यासोबत्यांना फारच जाणवे. परंतु करणार काय ? पोटाचे दास व पद्धतीचे गुलाम बनलेली मंडळी मुकाटपर्णे तें अवजड जू मानेवर टाकून घेत असत. त्यांच्या मुक्या मनाचा कोंडमारा उष्ण निश्वासांच्या रूपाने बाहेर पडे. एकदा तर कडेलोटच झाला. मास्तरांच्या तासाला शाळा-तपासनीसाची स्वारी आली असतां ज्या विषयाचे अध्ययन चाललें होतें तो विषय कोठें पुसट पुसट त्या तपासनीसाच्या कानांबरून गेला होता. परंतु झकपक पोशाख व विलायती डोल ह्यांच्या भपक्‍्यांत विवेचं दारिद्य झाकण्याची कला साधलेल्या त्या पद्धति-तपासनीसाला स्थळाचे ब माणसाचे भान राहिले नाहीं व त्यानें मास्तरांच्या शिकविण्यांत चुका काढायला प्रारंभ केला, बिचारे मास्तर तर क्षणभर थक्कच झाले. जो विषय आत्मसात करण्यांत आपण इतकीं हाडाची काडे केलीं तोच आंपणाला येत नाहीं का ? काय आश्चये आहे म्हणावयाचे ! मूळ ग्रंथाच्या चार ओळीही एकदम लावण्याची ज्यांची पंचाईत त्यांनीं विलायती ग्रंथांच्या आधारं त्या ग्रंथाचे बाह्यांग, शब्दांग सांगत सुटाबींत आणि विद्वान म्हणून मिरबावें, हें त्यांना कसें सहन व्हावें ! एरूहींचे सौम्य पण आतां अगदीं मर्मांच घाव पडल्याने थोडे चिडीस आलेले मास्तरही अगदीं एकेरीस आले. तपासनीसांनीं त्यांचा तो आविर्भाव पाहून शाहाणपणानं आवरते घेतलें व आपला मोचा इतरत्र बळविला. परत जातांना मात्र शोरेबुकांत मास्तरांच्या वागण्याविरुद्ध व शिकविण्याविरुद्ध त्यांना समज देण्यास ते विसरले नाहींत. जिचारे मास्तर ! दुर्दैव म्हणून कर्माला हात लावण्यापलीकडे काय करणार | श्रीमंतांना आपल्या मुलांना शिकविण्याकरितां एखादा विशेष हुशार मास्तर ठेवण्याची फार होस, त्यांत थोडा प्रोढींचाही अंश असतो. मुलगा शाहाणा व्हावा त्याबरोबरच आपल्या पदरीं एकादा विद्वानही असावा ही भावना थोडीफार ह्या प्रवृत्तीच्या मुळाशीं असतेही., मास्तरांच्या विद्येचा लौकिक सवेत्रत्न पसरला होता, तो एका धनाढ्य शेठजींच्याही कानीं गेला. रोठजींना वाटलें, कीं आपल्या चिरेजीवांना शिकवावयास हे शिक्षक ठीक टा प्ञु द्‌ न मास्तर आहेत. मोठ्या अगत्याने शेठजींनीं मास्तरांना बोलावू पाठविलें, त्यांचें आगतस्वागत केलें, त्यांच्यापुढे पानाचे तबक सरकविलें, चिरंजीवांच्या शिकण्याचा विषय काढला, मास्तरांच्या विद्वत्तेची अमूप स्तुति केली, त्यांच्या शिकवणीचे अगत्य दर्शविले, तें काम पत्करण्याविषयीं त्यांना गळ घातली. व्यवहारी डावपेच माहीत नसलेल्या मास्तरांनी शेठजींचे म्हणणें मान्य केलें. देण्याघेण्याच्या पांचपेंचाच्या गोष्टी मास्तरांना बोलतां येतच नव्हत्या. त्यांच्या त्या भोळेपणाचा फायदा घेऊन व त्यांची अघळपघळ स्तुति करून, रोठजींनीं हा सोदा कितीतरी स्वस्तांतच पटविला. तथापि मास्तरांना त्याची कांहींच दखल नव्हती, ते आपले शांतपणें काम स्वीकारून उठून आले. दुसऱ्या दिवशीं ठरलेल्या वेळीं शिकविण्याकरितां स्वारी शेठजींच्या बंगल्यावर दाखल झाली, तों रोठजींच्या मुनीमांनीं त्यांना बाहेरच बसविलें. बराच वेळ वाट पाहूनही विद्यार्थी येण्याचे कांहीं चिन्ह दिसेना तेव्हां त्यांनीं वौकशी केली, तां कळलें, कीं धाकटे शोठसाहेब अद्याप निजूनच उठले नाहींत ! ते निजून उठल्यावर त्यांचा प्रातःकाळीन चहा फराळ उरकेल, मग त्यांचें स्वान होइल व नंतर ते अभ्यासास येतील ! तांवर बिचाऱ्या मास्तराना मात्र ताटकळत बसावयास हर्वे ! आपली ही लाजिरवाणी स्थिति ध्यानीं येऊन मास्तर खजील झाले, परंतु पहिलाच दिवस म्हणून त्यांनीं तिकडे दुलक्ष केळे, बऱ्याच वेळानें धाकटे दोठसाहेब आज अभ्यासाला बसणार नाहींत तेव्हां तुम्हीं परत गेलांत तरी चाळेलळ, असा निरोप आला व मास्तर निनारे त्या दिवशीं तोंडही उघडल्याशिवाय जड मनानें परत आले ! घाकट्या शेठताहेबांचा असा क्रम मास्तरांच्या मधून मधून वारंवार अनुभवास येई. कधीं कधीं शोठसाहेबांच्या मातुःश्री अभ्यासाच्या वेळेला तेथेंच बसत, कधी वेळ पुरा झाला तरी कांहीं तरी निमित्ताने मास्तरांना बसवून घेण्यांत येई, कधीं एखादे दिवशीं मास्तर कांहीं अपरिहार्य कारणानें जाऊं शकले नाहीं, कीं दुसऱ्या दिवशीं प्रथम “' काल कां आलां नाहीं ! धाकटे शोठसाहेब वाट पाहून कंटाळून गेळे. शिवाय त्यांचा कालचा अभ्यास राह्यला, ” असे उद्गार ऐकावे लागत, विद्यार्थी अभ्यासाला बसला नाहीं व मास्तर बिचारे ताटकळत बसून, फुकट वेळ गमावून परत जात त्याचें कोणालाच कांहीं वाटत नसे. पुढे पुढें मास्तरांच्या वाटेवरची बारीकसारीक न पड ९9 -- कांहीं माणसें का्मेद्दी त्यांच्या वाट्याला येऊं लागलीं, पोस्टांत पत्रें टाकणें, कार्डेपाकिटे आणणें» एखादा निरोप सांगणे, असल्या गोष्टी क्षुक खऱ्या पण मास्तरांच्या मानी मनाला त्या जाचत. सरळ स्वभावाच्या मास्तरांना त्या प्रथम समजत नसत, परंतु अतिपरिचयानें त्यांच्याही ध्यानीं ह्या क्लुप्त्या येऊं लागल्या. एखाद्या हरकाम्याप्रमाणे आपला उपयोग हीं माणसें करून घेऊं पाहातात, हें समजतांच त्यांना संताप आला. शिवाय अभ्यासाविषयी फारशी आख्या नाहीं, परंतु. मास्तरांच्या रोजच्या येण्याजाण्याच्या वेळा मात्र कांटेकोरपर्णे नियमितपणे संभाळण्यावर कटाक्ष फार ह्याची त्यांना चीड येई. विद्यार्थ्याला वाटे, आपल्या -/$लांनीं दरमहा पैसे मोजन मास्तरांना विकत घेतलें आहे. शेठजींना वाटे; ' कीं आपल्या वैभवाला साजेशी इतर माणसें जशीं आपण पदरीं बाळगिलीं आहित तसाच एक मास्तरही आपण ठेवला आहे. इतर नोकरचाकरांना वाटे, कीं जसे आपण इतके सर्व तसाच हाही आपल्यांतीळ एक. त्याचा वेगळा तो दिमाख काय १ विव्रेची म्हणजे कांहीं स्वतंत्र तेजस्विता असते आणि विद्यादान करणारा गुरु हा विदोष पूज्य, वंदनीय पुरुष असतो, असें मानावयास तेथें बिचाऱ्या एकऱ्या मास्तराशिवाय दुसरें कोणीच नव्हते. बैठकीवर आसन ठोकून, लोडाला टेकून बसणाऱ्या मुनिमाजवळून इतर मंडळीबरोबरच स्वतःच्या शिकवणीचाही तनखा सही शिक्‍्क्‍्यानिशीं घेणें मास्तरांना कमीपणाचे वाटे. मास्तरांनी हा त्रास फारच थोडे दिवस सहन केला. एका महिन्यानंतर आपले शिकवणीचे पैसे घेत असतांनाच आपण आतां शिकवणीत येण्याचे बंद केळे, असे त्यांनीं स्पष्टपणें सांगितलें. मुनिमाला तर आश्चयेच वाटले. मास्तर वेडे तर नाहींत ? इतक्या मोठ्या शेठजीची शिकवणी सोडून द्यावयाची म्हणजे काय १ त्याने मास्तरांना मोलाचा, व्यावहारिक उपदेश करण्यास सुरुवात कली. परंतु त्याचे ते बहुमोल शब्द ऐकण्यास मास्तर होतेच कोठें, ते केव्हांच तेथून उठून गेले होते ! मोठ्या शेठजींनींही मास्तरांना बोलावणे पाठविलें, परंतु मास्तरांनी आपला नकार त्यांना लेखीच कळविला. शेठजीं्नी दुसरा मास्तर ठेवला. धाकट्या शेठजींचा पूर्वीचा क्रम तसाच चालू होता. एक शिक्षक जाऊन दुसरा आला, ह्याचें त्यांना काय £ घरांत एक नोकर जाऊन दुसरा येणें हें त्यांच्या नेहमींच आंगबळणीं पडलें होतें. आमच्या मास्तरांना दोष देणारे व्यवहारी शाहाणे लोक नव्हते, असे नाहीं, त्यांचे मास्तर म्हणणें, कीं ह्या गोष्टींकडे लक्ष याच कशाला, महिन्याच्या महिन्याला पगार मिळाल्याशीं कारण ! तिकडे कांदीं कां होईना ! परंतु वियेच्या एकनिष्ठ उपासकाला असें वागणें कसें शक्‍य आहे ? द्रव्यापेक्षां विद्या ब स्वाभिमान ही अधिक प्रिय असणाऱ्या मास्तरांनी क्षुद्र लोकांच्या कलकलाटाकडे लक्षच. दिलें नाहीं. ते 'आपले आवडते विद्यार्थी जमवून त्यांना संथा देण्यांतच आनंद मानीत. जग त्यांना हसे; ते जगाला हसत ! दोघांच्या हसण्यांत मात्र किती फरक ! आजही मास्तर आपल्या वियरेची अखंड उपासना चालवीत आहित. त्यांची विद्यार्थ्यांना विद्यादान करण्याची होस तशीच सदेव ताजी आर. त्यांचा व्यावसायिक नित्यक्रम तसाच अखंड चालू आहे. त्यांच्या वाणीचा ओघ अजूनही तसाच वाहातो, अजूनही नव्या पद्धतीचे लेप त्यांच्या आंगावर बसू, शकत नाहींत. जुन्या, प्रचंड वटवृक्षाच्या छायेचा आश्रय घेणाऱ्या छायाप्रेमी लोकांप्रमाणे विद्याव्यासंगी विद्याथी अजूनही त्यांच्या आश्रयास घावतात, यांच्या सहवासांत त्यांना आनंदोर्मि येतात. मास्तर व त्यांचे विद्यार्थी ह्यांचे ते प्रेमळ संबंध पाहिले म्हणजे आजच्या शाळांच्या व्यवहारांत कांहींतरी चुकत तर नाहीं ना, अली रुखरुख वाटावयास लागते. एखाद्या ध्यानयोग्याप्रमाणे मास्तर आपल्या विवेच्या तंद्रींत असतात. त्यांच्या त्या योगाचा भंग करण्याचें सामर्थ्य जगाच्या खडखडाटांत नाहीं, हृंच योग्य, ग अंबादास ] अंबादास | अंबादास त्याचें नांव. जन्माने तो गुजराती परंतु व्यवसायनिमित्ताने अनेक दक्षिणी लोकांशीं वारंबार संबंध येत गेल्यामुळें मराठी भाषाही तो चांगली बोले, मराठी शब्द किंबा मराठी आघात हीं दोन्हीही त्याला नीट साधत. त्यामुळें त्याच्या मराठी बोलण्यांत एखाद्या परप्रांतीय बोलणाराचा घाबरटपणा £<वा सरांचा विचित्रपणा नसे. “ अंबादास, तुम्हांला मराठी छानच येतं हो, असें म्हटलें, कीं लगेच त्यानें म्हणावे, “ वा ! त्यांत काय आहे १ आपल्यासारख्या अनेक लोकांशीं रोज संबंध येत असल्यानें मराठी बोलण्याची आतां अगदीं सवय होऊन गेली. तेव्हां कां नाहीं येणार थोडंसं तरी मराठी ? आमचचा अप्रत्यक्ष उपयोग त्याला मराठी शिकण्याला होतो ह्या अभिमानांतच आम्हीही होकारानें मान डोलवाबी. पण खरा प्रकार असा होता, कीं अंबादास स्वतःच फार हुशार आणि ज्ञानप्रिय होता. त्याचा धंदा म्हणाल तर न्हाव्याचा. सकाळपासून तों संध्याकाळपावेतों लोकांचे केस कापावेत व त्यांच्या डोक्यावरचा बाहेरचा भार हलका करून तेवढ्यापुरतें तरी त्यांच्या डोक्यावरचे ओझे उतरवाबें ! अंबादासाचा हा व्यवसाय खरें म्हटले तर परोपकाराचा ! कारण आजकाल डोक्यावरचा भार उतरविणाराच मोठा उपकारकर्ता वाटतो आणि तेवढ्यापुरते हलकें व मोकळें कोणाला वाटत नाहीं ? अधा तास न्हाव्याच्या कचाटींत व चौकटींत बसून खालीं वर माना करकरून दमलेला माणूस मोकळा झाल्यावर कर्तनक्रिया संपतांच आंगाला आळोखेपिळोखे देऊन सुटकेचा अमिनय करतो त्याचें कारण तरी हेंच. त्याला त्या वेळीं केवढे मोकळे झाल्यासारखे वाटतें ! क्षणभराची कां होईना पण ही मुक्तता अनेक लोकांना अंबादास रोज रोज देत असे आणित्या त्या वेळीं त्या सर्वे लोकांचा तो दुवा घेई. न्हाव्याच्या दुकानांत वेळ साधून जाणें, क्रमांक लावणें, ताटकळत बसणें, क्रमांक साधणे, कर्तन प्रयोगांतून सविस्तर पार पडणें आणि पुनश्च मार्गाला लागणें ह्या लांबलचक विधीचा वारंवार अनुभव आलेल्या कोणाही जिवाला अंबादास ह्या वेळीं आपला साहाय्यक व संरक्षक वाटायचा. कातरी, वस्तरा, यंत्रे, ह्यांची झपाझप उलथापालथ अंबादास करी, तेव्हां त्याच्या त्या शीघ्र > > ७ --. अंबादास गतीचे आणि कुशल कृतीचे मोठें कोतुक वाटे. किती गिऱ्हाइकांचीं डोकीं अंबादासच्या हातून परीक्षून बाहेर पडलीं असतील कोण जाणे ! अंबादास हा धंद्याने न्हावी खरा पण वृत्तीने हजाम नव्हता. तो लोकांचीं डोकीं भादरी किंवा त्यांचे केस कापी परंतु तो गांवच्या वृथा हजामती करीत नसे. गिऱ्हाइकें आपलें डोकें निमेळ करून घेण्याकरितां त्याच्याकडे येत. परंतु अंबादासर्चे सखवतःचे डोकें मूळचेंच निमळ असे. सामान्य गिऱ्हाईक ह्या मुंडनक्रियेला योग्य असा कळकट पोषाख करून आलेला आढळे तर अंबादास स्नान, उपासना उरकून, धुवट स्वच्छ कपडे घाठून आलेला अते. दुकानांत येतांच अंबादास प्रथम आपल्या आराध्य देवतेला नमस्कार करी व तिच्यापुढें निरांजन लावी. आपल्या हत्यारांवर एकदा सफाईंचा हात फिरवी, एकदा गिऱ्हाइकांकडे नजर टाकी आणि ऐटींत खुर्चीचा खटका दाबून ती जरा पुढे ओढी व “ चला साहेब ” म्हणून तो आलेल्यांना पुकारी. ज्याचा क्रमांक असे तो चटकन त्या उच्चासनावर विराजमान होई ब आपले डोकें त्याच्या स्वाधीन करून आपल्या विचारांच्या तंद्रीस लागे. अंबादासच्या हाताखालीं त्याचे सेवक होतेच. परंतु स्वतः अंबादास हा कुशल कर्तनकार असल्यानें आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे तो मोठा बहुश्रत असल्यानें त्याचा हात आपल्या डोक्यावरून फिरावा अशीच इच्छा पुष्कळ जणांची असे. म्हणून कांहीं कांहीं मंडळी तर दुसऱ्या ओळींतील आपला क्रमांक सोहून अंबादासच्या ओळींत स्वतःची पाळी येण्याकरितां खोळंबूनही बसत. आणि अंबादासचा गुणच तसा होता. न्हाव्याची जात नुसती बोलकीच नव्हे तर वाचाळही असते. परंतु अंबादास बार्‍चाळ नव्हता, बोलकाही नव्हता; मितभाषी होता. स्वतः तो आपण होऊन कोणाशीं कांहींही बोलत नसे. एरव्ही न्हावी आणि गप्प बसलेला असे जरी सापडाबयाचें नाहीं तरी माणसांनी भरलेल्या अंबादासच्या दुकानांत त्याच्या हत्यारांच्या कचकच ह्या आवाजा- शिवाय किंवा कचित एखाद्या लहान मुलाच्या रडण्याशिवाय दुसरा ध्वनि ऐकूं यावयाचा नाहीं. परंतु एखादा ओळखीचा माणूस आला, कीं अंबादास बोलू लागे आणि मग अंबादासचें खरें रूप प्रगट होई. “' अंबादास, तुम्ही मुकाऱ्यानें सवे क्रिया चालवली आहे हें कांहीं बरं नव्हे; तुमच्या जातीचीं माणसं तर आपल्या गिऱ्हाइकांचं मनही डोक्‍्याबरोबर गुंतवून ठेवतात, नि तुम्ही... ?” । क कांडी माणसे *€ साहेब, पण आतां काळ बदलला ना! कुणाला बोलणं आवडतं, कुणाला आवडत नाहीं. सवोची मर्जी राखायची ! पूर्वीच्या काळीं आम्हां न्हावी लोकांना समाजांत एक वेगळा दजा होता. त्यांची कामगिरी मोठी मानली जात असे. “-कोटिलीय अथेशास्त्रांत तर साहेब, न्हाव्याकडे फारच महत्त्वाच्या कामगिऱ्या सोपविल्या होत्या !. . .” कातरी किंवा वस्तरा चालविणारा हा आपल्या रोजारीं उभा असलेला न्हावी कोटिलीय अथेशास्त्राच्या किंवा समाजव्यवस्थेच्या गोष्टी बोलतो हें पाहून कोणाला आश्चर्य वाटणार नाहीं १ थोरामोठ्यांनीं आपल्या ज्ञानाचें प्रदशन करण्याकरितां ज्या गोष्टी सभा व्याख्यानांतून सांगण्याचा आव आणावा त्या गोष्टी हा साधा माणूस सहज सफाईनें बोलतो हें पाहून अर्थातच त्याच्याविषयी आदर व कोतुक वाटूं लागे आणि असें वाटे, कीं ह्या ग्ह्स्थाला आणखी काय काय ठाऊक आहे व कायकाय वाटतें हें तरी पाहावें. ह्या जिशञासेनें वारंवार अधिकाधिक प्रश्नोत्तरही होत. “' अंबादास, सध्या तुमच्या धेद्याचा मालमसाला मिळायला तुम्हांला फार त्रास पडत असेल नाहीं १ तुमच्या आवतींभोवतींचे सामानसुमान पाहा-त्यांत देशीपेक्षां विलायती वस्तूंचाच भरणा आहे. कानडा, अमेरिका ह्या दोन देशांनीं आमच्या न्हाव्यांचीं दुकानं काबीज केलेलीं दिसतात. आमचे पूर्वीचे वस्तरे, ते करणारे शिकलगार. . .....?” गिऱ्हाइकाचें बोलणें पुरं होण्याच्या पूर्वीच अंबादास म्हणे, ८: साहेब, कशाला हव्यात आतां त्या गोष्टी ? आतां तो ' जमाना ? बदलला ! आतां आमच्या लोकांना सारं कांहीं विलायती हवं. त्या जुन्या हत्यारांनीं जर आम्ही आमचा धंदा चालवला तर आमच्याकडे कुणीही येणार नाहीं. आतां प्रत्येकाला विलायती फॅशन नि विलायती थाट हवा ना ! म्हणून आम्हांलाही तें सांग उभं करावं लागतं. मग त्याच्यापायीं कितीही खर्चे झाला तरी चालेल, हा खचे तरी आम्ही चोपून गिऱ्हाइकांकडूनच वसूल करून घेतों. दोन पैशाच्या कामाला आम्ही आतां दोन आणे घेतों. वरच्या डोलाला भाळणार॑ आमचं गिऱ्हाईक आपण व्यर्थ चौपट पैसे देतों इकडे पाहातच नाहीं. बरे ह्या वस्तु देशांत तयार होण्याची गोष्टच नको. आमच्या लोकांचं लक्ष सध्यां (2911191 1110051125 तयार करण्याकडे आहे. ५६: (0150101018? ' (३०00१5 कडे पाहातोच कोण ? ” त्याच्या तोंडचे ते अर्थशास्त्राचे विचार मला मोठे विचारपर्वतक व अद्‌भुत वाटले, बदलत्या तऱ्हा व अर्थशास्त्रीय योजना ह्या विषयांवरील एकाद्या न्हाव्याचे विचार कोणी ब्याद रे अंबादास थ्रमाण मानीत नाहीं, ह खरें. परंतु अंबादासचें डोकें व मन खिमे नसून तें सारखे विचार करीत असते हें पाहून विचारी माणसाला विस्मय वाटल्यास नवल काय ! ज्ञानाची किंवा विचारांची कोणाला मिरासदारी दिलेली नाहीं हें खरे. परंतु ज्या ठिकाणीं त्यांची अपेक्षा संभवनीयही नाहीं, त्या ठिकाणीं तीं 'दिसल्यास त्यांचें कोतुक कां करूं नये ? अंबादासच्या दुकानांत येणारीं अद्रीं अनेक माणसें असतील, कीं ज्यांच्या डोक्यावरचे केस मात्र वाढावेत, परंतु ज्यांच्या डोक्यांत विचारांची मात्र कांहींच वाढ होऊं नये ! खरेंच, बाहेर केस वाढतात त्याच्या निम्यानेंही आंत शाहाणपण वाढलें असत तर...! परंतु तें व्हार्वे कसे ? म्हणूनच अंबादासच्या विचारांचे आश्चर्य व कोतुक वाटे. रिकाम्या वेळीं अंबादास सामान्य वतेमानपत्री वाउययाचें अध्ययन न करतां खरोखरीच ग्रंथपठण करी. त्याची ज्ञानलालसा तीत्र होती, वृत्ति विचारी होती, वागणूक निर्मळ होती. व्यवसायाला प्रारंभ अंबादास स्नान करून शुचिभूतपणें करी, दिवसाचा उद्योग संपल्यावर तो . स्नान करून आपल्या आंगावरील गिऱ्हाइकांचे मलसिंचन नाहींसे करी. ह्या स्वच्छतेवर त्याचा फार कटाक्ष असे. माणसांना निर्मळ करणाऱ्या ह्या नापिताची अंतर्बाह्य निमळ वृत्ति प्रशसेला पात्र झाली तर नवल काय १? म्हणून तर इतर कोठेही न जातां अंबादासच्या दुकानाकडेच जाणत्यांचे पाय वळतात व त्याचे हात चाळू असतांना त्याचें तोंडही चाळू राहावें म्हणून उगीचच प्रश्न विचारून त्याला बोलाबयाला लावावेस वाटतें. तेथून बाहेर पडतांना डोके तर इलकें झाल्याचे पटतेंच परंतु मनालाही थोडासा मोकळेपणा आला असा अनुभव येतो. अंबादास हा न्हावी खरा परंतु तो म्हणतो त्याप्रमार्ण समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहि ह्यांत संशय नाहीं. | हे इंग्रज ! हे इंग्रज ! | असें म्हणतात, कीं सुप्रसिद्ध चोकस मुत्सद्दी नाना फडणवीस ह्यांना सुद्धा एकदा एक असा पेंच पडला, कीं *“' हे इंग्रज आहेत तरी कोण ? किती १ हे येतात तरी कोठून ? ह्यांचा देश कोणता १? ” नानांच्या काळांत युरोपिअन लोकांना जातीने ओळखणारे थोडेच. आज इंग्रज राज्यकत्यांची वहिवाट होऊन शांभर वर्षे होऊन गेलीं; त्यांची सावेभोम सत्ता जबळ जवळ आमच्या आंगीं मुरली ! परंतु खरोखर ' हे इंग्रज) आहेत तरी कसे ह्याविषयी किती लोकांना कितीसे स्पष्ट ( प्रत्यक्ष ) ज्ञान आहे ? सातासमुद्रांपलीकडून हिंदुस्थानांत येऊन राज्यकारभार चालविणारा इंग्रज आपल्या मायभूमीशीं कघींही निमकहरामी करीत नाहीं. येथच्या कोठल्याही मोठमोठ्या बिकट प्रसंगीं गांगरून जात नाहीं. येथच्या राज्यकारभाराच्या चौकटींत चपखलपणे सहज बसतो. मूळ स्वभावाने कसाही उदारमतवादी असला तरी एकदा अधिकारावर चढला, कीं इंग्रजी हिताला कधींही विसंबत नाहीं. एतददेशींयाशीं म्हणण्यासारस्वा मिसळत नाहीं. आमचीं सारीं बिंग त्याला ठाऊक असतात, पण आम्हांला मात्र त्याचें एखांदेही ठसठशीत न्यून माहीत नसतें. साहेब म्हटला, कीं आम्हांला नेहमीं तो वरचढ'च वाटतो. ह्यापेक्षा आम्हांला तरी इंग्रजांचे काय अधिक ज्ञान आहे ? नाहीं म्हणावयाला आमच्यापैकी कांहीं लोक विद्येच्या निमित्ताने, प्रवासाच्या हेतूनें विलायतची यात्रा करून आले, त्यांना त्या ठिकाणीं जे इंग्रजांचे आयुष्य दिसळें असेल, तें खरें. पण तेंही ज्ञान अपुरेच. कारण एकतर बाह्य देखावाच त्यांच्या दृष्टीला पडणार, समाजाच्या अगदीं अंतरंगांत त्यांचा प्रवेश व्हावयाचा कसा व इतकी अंतर्भेदी दृष्टि कितीकांची असणार ! प्रसिद्ध झालेल्या निरनिराळ्या प्रवास वणेनांत बाहेरच्या गोष्टींचा फापटपसारा'च पुष्कळ. येथच्या विषयीं तर बोलावयाला नकोच. साहेबाचे सान्निध्य लाभणेंही दुर्मिळ. सारांश, कसेही पाहिलें तरी इंग्रज माणूस हा अद्यापही एक न सुटलेले कोडंच आहे ही स्थिति आमचीच आहे असें नाहीं, तर खुद्द युरोपांतील जमन लोकांनाही इंग्रज माणसांविषयीं सम्यग्श्ञान नाहीं अशा समजुतीने जमन लेखक आ हे इप्रज ! रपा( ४७०) ७(फपीलपालाा ह्याने 11052 1212115310 * नांवाचें एक पुस्तक लिहिलें. त्यांत त्यानें स्पष्टच म्हटलें आहे, कीं आम्हा जर्भनांना, आम्ही समजतों इतकें इंग्रजांविषयीं नीटसे ज्ञान नाहीं. . 'तेवढ्यासाठीं इंग्रज माणूस अंतर्यामी कसा असतो, हें माझ्या देशबांधवाना समजावें, द्या हेतूनेंच मी येथे माझ्या पुस्तकांत त्याचें चित्रण करीत आहे ! इंग्रजांशी निकटचा संबंध असणाऱ्या जरमनांची ही दा, तर साता समुद्रांपलीकडे राहाणाऱ्या व इंग्रजांच्या अंकित हिंदी माणसाची काय गोष्ट ! परंतु वस्तुतः हिंदी माणसानेच इंग्रजांचा अभ्यास अधिक सूक्ष्मपणे करावयास हृवा. कारण कीं जो आपल्यावर सत्ता गाजवितो तो माणूस आहे तरी कसा हें जाणण्याचे अगत्य त्यालाच अधिक, तूर्त उपरिनिर्दिष्ट जर्मन लेखक इंग्रजांविषयीं काय म्हणतो ते पाहा-- “८ ह्या इंग्लिश बेटावर राहाणारे लोक मोठे आश्चर्यकारक आहेत. त्यांच्यांत कितीही दिवस राहा, दिवसेंदिवस त्यांच्या ठिकाणचे निरनिराळे गुणच दिसतील. इंग्रज माणसाच खरें रूप जाणावयाचें असेल तर त्याच्या निकट सहवासावांचून दुसरा मार्ग नाहीं. कारण एरूहीं इंग्रज माणूस कधींही आपलें रूप प्रगट करणार नाहीं. त्याच्या स्वभावाला ते आवडतच नाहीं. स्वत:विषयीं वाजवीहून अधिक बोलणं हं इंग्रजी शिष्टाचारांत असभ्यपणाचे समजलं जातं. परकी माणसाशी वागतांना इंग्रज माणसाची वृत्ति कधींही निःसंकोच नसते. तो इतरांशीं मैत्री करील, गप्पा गोष्टी मारील परंतु त्याचे खरं द्ृद्वत प्रगट होईल तें फक्त स्वतःच्या घरींच ( ७॥ 110112 ). तेथेच फक्त त्याचा खरा स्वभाव पाहावयास सापडेल, त्या कारणानें परदेशांतील इंग्रजांच्या स्वभमावधमांवरून व बीगणुकीव* न मूळच्या इंग्रजाविषयीं कल्पना करणे बहुशः चुकीचे ठरते. इंग्रज लेखकांनी काढलेलीं इंग्रजांची स्वभावचित्रेही ह्या कामीं फारशीं उपयोगी नसतात. खरा इंग्रज अगदीं वेगळाच असतो. “ इंग्रजी माणसाला कला, शास्त्रे ह्यांची चाड आहे. लंडन शहरांत मोठमोठी प्रदर्शने माणसांनीं नुसती फुळून जातात. मोठमोठ्या जलशांना तिकिटें बेद * |']॥०४९ 1८12)1181---नपा ७०॥ उ(प(७ ण. 715६८ 010100 1937, 5९ल्जाचे ७०1100 1938, डक रन री वाह कांहीं माणसं होतात. लक्षाबधि पोंड धमार्थ देणाऱ्यांना कबडीचुंभक कोण म्हणेल १ तथापि ह्याच इंग्लंडमध्ये सांपत्तिक भेद किती चमत्कारिक आहेत हें पाहिल्यास आश्चर्य वाटेळ, समजा, कीं दोघा सख्ख्या बहिणींपैकी एक श्रीमंत घरीं पडली व दुसरीच एखाद्या गरिबाशीं लग्न झालें तर श्रीमंत बहीण आपल्या गरीब बहिणीकडे सहसा कधींही फिरकणार नाहीं ! मुक्या प्राण्याच्या रक्षणाकरितां येथे संस्था आहेत तर लहान मुलांना निष्ठुरपणे वागविल्याचे खटलेही चालूच आहित. इंप्रज लोकसत्तावादी आहेत हें काय आतां सांगावयास हवे १ तथापि मध्ययुगाला शोभतील अशा सरदारअसामदाऱ्या ब मानमरातब अखंड टिकूनच आहेत. ह्या परस्पर विरोधाचा सारांश इतकाच, कीं इंग्रजांविपयीं सरसकट सामान्य विधान करणें बरेंच कठीण आहे. प्रांजळ मनाने अभ्यास केल्याशिवाय इंग्राजाच्या स्वभावाचा थांगपत्ता लागणार नाहीं. त्याचा स्वभाव शब्दापेक्षा कृतींत जास्त उमटतो. अश्या माणसाच्या मनांतून एकेक गोष्ट काढून घेणे ह्याला बरेंच धोरण हवें, “६ हूंग्रज माणूस स्वतःला पूर्ण सुधारलेला समजतो. आपली अगदीं प्राथमि7 अवस्था तो आतां पूर्णपणे विसरला आहे. इंग्रजाच्या स्मरणांत इतिहास असेल तर तो वैभवशाली सम्राज्ञी एलिझाबेथपासूनचा. जुन्या पुराण्या पोराणिक गोष्टी ध्यानांत ठेवण्याच्या व त्यांचा व्यथ काथ्याकूट करण्याच्या भानगडींत तो पडत नाहीं. जुनाट देवते, आपल्या पितरांचे प्रताप ह्यांच्या विषयींच्या विचारांत तो आपली शक्ति खर्चीत नाहीं. जुन्या लोककथांनीं अंतःकरण भरून यावे, अश्या लोककथाही सांठविण्याच्या तो भरीस पडत नाहीं. जमन लोकांना व हिंदी लोकांनाही इतिहासाचा प्रांत संपून पुराणांचे नांव निघाले, कीं आनंदाचे भरते येते. इंग्रजाला तें सारे मृतवत वाटते. नाहीं म्हणावयास केल्ट लोकांना मात्र त्याची थोडी आवड आहे. “ह्या पुराणप्रियतेमुळें जमन लोकांच्या मनांत निसगाविषयीं विशेष प्रेम आहे. (जी गोष्ट जमनांची तीच हिंदी लोकांची. ) दोघांनाही सृष्टीशी एकजीव व्हावेसे वाटते. निसर्ग ब मानव ह्या दोघांच्या ठिकाणीं एकात्मकतेचा भास जर्मन लोकांप्रमाणेंच हिंदी लोकांनाही होतो. इंग्रजाचा स्वभावच वेगळा. एखादा इंग्रज कवि सोडा, परंतु साधारण इंप्रजाची निसर्गाविषयीं बृत्ति वेगळी. विस्तृत पटांगण त्याला क्रीडाक्षेत्त म्हणून आवडेल. निरनिराळ्या कुरणांतून माडी द द न हे इंग्रज! तो आपल्या आवडल्या कुत्र्याला फिरवील, रानांत शिकारीला जाईल. नदींत मासे पकडीत दिवसभर बसेल. सुंदरशा कुरणावर टेनिस खेळेल. त्याची बागेची आवड तेथे फुलें होतात म्हणून. झाडांखोडांनीं घराला शोभा येते म्हणून त्यांविषयी प्रेम, त्याच्या दृष्टीनें निसगे एक कार्यक्षेत्र आहे. भूमीपेक्षां प्राण्यांवर त्याचें जास्त प्रेम असते. प्राणी हे त्याला आपले स्थेही वाटतात. धरणीमातेच्या अंकावर डोकें टेकावबयास तो धजत नाहीं. त्याला तिची भीतीच वाटते. आपल्या बांधवांशींच त्याचें सख्य होऊं शकते. धरित्रीशीं तो नेहमींच दुजाभाव धरतो, कदाचित समुद्रावरच्या वरचेस्वानैच सारं जग जिंकणाऱ्या ह्या सागरप्रिय लोकांना समुद्रच आपला पिता वाटत असावा आणि त्याच्याच विषयीं त्यांच्या मनांत प्रेमभाव असावा. (इंग्रजी धर्मात तरी देवाला आईच्या जागीं बापच म्हटलं आहे ना?) :: निसर्ग आणि मानव ह्यांच्या एकात्मकतेमुळे जर्मन माणसाच्या ( आणि हिंदी माणसाच्याही ) मनांत धर्म आणि निसर्ग ह्यांच्याविषयीं निकट साहचयं उत्पन्न होते. इंग्रज माणसाला ही कल्पनाही समजत नाहीं. इंग्रजाच्या मतानें घर्म हा व्यक्तिशः इश्वर व मानव ह्यांच्या वैयक्तिक संबंघाला अनुलक्षून आहे. इश्वराचा प्रत्यक्ष साक्षात्कार मनुष्येतर व्यवहारांत त्याला कधींच होत नाहीं. इंश्वरानें बायबलच्या द्वारे सांगितलेला जो संदेश तोच इश्वराचा अंतिम प्रमाण शब्द. इंग्रज माणसाच्या साऱ्या नैतिक, आध्यात्मिक आकांक्षा तेवढ्या धर्मवचनानें तृप्त होतात. सामान्य इंग्रज माणूस शाश्वत चांगल्या बाइंटाच्या विचारांनी स्वतःला व्यर्थ गांधळांत टाकीत नाहीं. व्यावहारिक व तात्कालिक चांगल्या वाइटाच्या निर्णयाने आपला चालू व्यवहार उत्कृष्टपणे तो पार पाहूं शकतो, अज्ञेयवाद त्याला भेडसावीत नाहीं, किंवा अज्ञेयवादाने तो नुसता जडवादीही बनत नाहीं. धमोवरील विश्वास सामान्य इंग्रज जनतेच्या मनांत अद्याप तसाच वसत आहे. अजूनही धर्मसत्ता - चचेचा अधिकार - मानण्यांत येतोच. इंग्रज हा प्राचीन परंपरेचा अत्यंत अभिमानी असल्याने प्राचीन श्रेष्ठ परंपरा असलेल्या धमोविषयीं त्याच्या मनांत आदरच आढळेल. धर्माचे त्यानें एक सस्थानच बनविले आहे; त्या संस्थानाचा ईश्वर हा राजा आणि बिशप हे त्याचे मंत्री ! “: इग्रज लोकांच्या आचारांत, विचारांत एक प्रकारचा मयोदितपणा दिसेल. अम्यांदपणें विचार करून अनंतत्वांत विलीन होण्याइतकी प्रवर कल्पनाशक्ति च ८७ मिड काहीं माणसं त्यांची नसते. ह्या मर्यादितपणाच्या बंधनांचा अप्रत्यक्ष भास खुद्द इंग्रजालाही झाल्याविना राहात नाहीं आणि त्यांतूनच सुटण्याचा त्याचा प्रबत्न चाललेला असतो, उलट, विशाल दृष्टीच्या अभावामुळे, त्याच्या चाळू कृतीला मात्र अधिक स्थेय॑ येतें. त्याची शक्ति सैरावैरा विखुरली जात नाहीं, त्यामुळें कोणत्याही एका कामीं ती संपूणेत्वानें वापरतां येते. त्याचें जीवितकार्य म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा प्रश्न सोडविणे व कोठल्याही परिस्थितींत राहतां येईल असें जीवनशास्त्र अभ्यासणे. हिंदी माणसाला जितकी आत्मचिंतनाची स्वाभाविक होस तितकी इंग्रज माणसाला सुव्यवस्थित जीवनाची होस. देनंदिन व्यवहारांतच त्याचे सारं लक्ष गुंतलेलं असते. ह्याचा अर्थ इतकाच, कीं नित्य व्यवहाराच्या ज्या सांस्कृतिक, कलाविषयक गोष्टी त्यांकडेच तो अधिक अवधान देतो. सामान्य वयवहारांत अरेरावी सत्तेपेक्षां अनुनयानें काम करून घेण्याकडे त्याची प्रत्रत्ति विशोष. आपल्याच आवडीच्या गोष्टी तिम्हाइताकडून त्याच्याच तंत्राने करून घेण्याची हिकमत त्याला साधलेली ! जुलमानें झालेलीं कार्म फार दिवस टिकत नाहींत, हें तो जाणून असतो. म्हणून दुसऱ्याच्या कलाकलानेंच पण स्वतःच्या मनासारखे घडवून आणण्याचा तो प्रथम प्रयत्न करतो. त्याप्रमाणें नच जमल्यास शेवटीं धाकट्पटशा करण्यास तो मागेपुढे पाहात नाहीं. महत्त्वाच्या वेळीं एका क्षणांत तो कठोर बनू शहाकतो. आंतरराष्ट्रीय व्यवहारांतही त्याच्या ह्या स्वभावाचे प्रत्यंतर येतं. एकदा युद्ध पुकारळें, कीं तो सव शक्तींचा उपयोग केल्याशिवाय राहाणार नाहीं. परंतु युद्ध संपले, कीं त्याच्या मनांतील तेढही संपली. “६ टंग्रजी शिक्षणाचा मुख्य गुण म्हणजे आत्मविश्वास उत्पन्न करणं. प्रत्येक सामान्य माणसाच्या ठिकाणींही त्या गुणाचा यथाप्रमाण अंश आढळतो. त्याच्या शिक्षणाची पद्धतीही भिन्न. स्वतःच्या ब आपल्या मुलांबाळांच्या डोक्यांत तो निरथक गोष्टी कोंब्रीत नाहीं. निरथंक गोष्टींच्या माहितीनें माणसाची वारेमाप अवस्था होते, असं त्याला वाटतें. इंग्रज माणूस केव्हांही पृथ्वीवरचे पाय उचलून आकाशांत उड्डाण करायला तयार होणार नाहीं. इतर कित्येक गोष्टी त्याला खपल्या तरी निश्चवयाभावाची संदयावस्था त्याला मुळींच खपत नाहीं. कोणत्याही गोष्टींत चटकन निश्चय न करतां येगें त्याला कमीपणाचे वाटतें. त्याला नावीन्याची चटक नसते. निसर्गाप्रमाण त्याचें सारे काम स्य ६ ८ - हृ इंग्रज ! 'घीमेपणाने चालतें. वर्तमान पद्धति वारंवार बदलून नित्य नव्या पद्धतींचा प्रयोग करून पाहाण्याचा त्याला हव्यास नाहीं. असलेल्या पद्धति कटाक्षानं पाळण्याचीच त्याला शिक्षणामुळे सवय जडते. किंबहुना तसाच तो अभ्यास करतो. ह्यामुळे एका बाजूला इंग्रज माणूस आपल्यापुरता व्यक्तिनिष्ठ असला तरी व्यवहारांत परंपराप्रियय आढळतो. त्यामुळेंच साऱ्या इंग्रज लोकांच्या आयुष्यांत एकसूरीपणा आला आहे. त्यांत त्याचे फाजील श्रम बांचतात, हें मात्र खास. खार्णेपिणे, घराची सजावट, कपड्याल्त्त्यांचे निमध, सामान्य शिष्टाचार व चालीरीति ह्यांची परंपरा व पद्धत अगदीं अंगवळणीं पडलेली, ती अगदीं गाळीव बनली असून आतां तिजविषयीं कांहीं विचारही करावा लागत नाहीं. आयुष्याच्या बारीक सारीक साऱ्या गोष्टींना आतां अखंड परंपरेने एक विशिष्ट, निश्चित रूप प्राप्त झालें आहे. फक्त तें रूप तेवढें समजले कीं झाले. इंग्लंडचे लोक विशिष्ट सवयींच्या संपूण आहारी गेले आहेत. “८ इग्रुज माणसाचे ज्ञान व्यावहारिक स्वरूपाचे असतें, नुसत्या तात्विक ज्ञानाच्या मागे तो लागत नाहीं. आयुष्यांत समोरून जे ज येईल त्याला त्याला तो आनंदाने व वेर्यांने तोंड देण्यास सदा तयार असतो. प्रत्यक्ष आयुष्यांत केवळ तर्केशास्त्राचा तो कधींही अवलंब करणार नाहीं. ठाऊक असणाऱ्या कारणांवरून कार्याचे अनुमान करीत बसण्याचा रिकामटेकडा खेळ खेळणं त्याच्या स्वमावाला रुचत नाहीं. तकंशास्त्र व प्रत्यक्ष व्यवद्वार ह्या टोहोंमध्य तो व्यवहारालाचच प्राधान्य देतो, आयुण्यांत, दरेक क्षणाक्षणाला, ज़ ज सहज घडत जात, तेंच खरं, पुढच्या संशयित गोष्टींचा विचार करीत बसणें किंवा पुढची संकटे आजच कल्पनेने उभीं करून तीं निवारण्याच्या योजना टरवीत बसणे, त्याला चुकीच वाटतें. संकटे प्रत्यक्ष उभीं राहिली, कीं मग त्यांवर उपाययोजना, प्रत्यक्ष इंग्रजी साम्राज्य सुद्धा पूर्वी योजून झालेले नाहीं. इंग्रजी साम्राज्य हा एक चमत्कारिक योगायोग आहे, अस स्वतः इंग्रज सुद्धा म्हणतात. दिंदुस्थानांतद्दी आपल्या हातांतील तराजू गळाळी कशी आणि केव्हां व आपण तेथंच सिंहासनावर जसलों कसे व केव्हां हें इंग्रजांचे इंग्रजांनाच नीटसं समजले नाहीं ! इंग्रजी इतिहासाचे ज्ञान असणाऱ्या कोणाही माणसाला ही गोष्ट मान्य करावी लागेल. 'योटापाण्याचाच प्रश्न असल्यामुळे पुप्कळ वेळां इंग्रजी राजनीतीचे वागेटोरे ने द€ न्स कांह माणसें लांबवर गेळेले कचित आढळतातही. माणसाचा स्वतःच्या सामर्थ्यावर अढळ विश्वास असल्याविना त्याला भविष्याविषयीं इतकें निष्काळजी राहातां येणार नाहीं. कोठच्याही परिस्थितींत आपल्याला योग्य तो निर्णय करतां येईल, असंच त्यास वाटत असते. आणि समजा, कीं एखाद्या वेळीं चुकलेंच तर आपली चुकी झाली असेंही कबूल करावयास तो लाजणार नाहीं. इंग्रजी स्वभावांत तेवढा प्रांजलळपणा असतोच. वृथा गर्विष्ठपणानें आपल्या चुक्यांबरही पांघरूण घालणें, असभ्यपणाचें मानलें जाते. वृथा गर्विष्ठपणानें फजिती होते, हें त्यांना ठाऊक असते. क्रिया-प्रतिक्रिया न्यायाने गर्विए्पणाला तडाखे देणारे निघतातच. ह्यामुळें प्रत्येक वेळीं सावघधगिरीची भाषाच त्याच्या तोंडून निघते. कोणतेंही काम अत्यंत यशस्वीपणें पार पडलें तरी, “ कां |! कसें झालें ! ” अशा प्रोढीचे उद्गार तो काढणार नाहीं. तर उलट, “' मला वाटतं ह्यांत फारसं कांहीं चुकलं नाहीं, असेंच नम्रतेने तो म्हणेल. अथातच ज्याच्याजवळ हे उद्गार तो काढतो त्याला त्यांतला गूढाथ समजतोच. एक इंग्रज दुसर्‍या इंग्रजाला चांगल्या तऱ्हेने ओळखून असतो. एखाद दुसर्‍या शब्दानेंच ते एकमेकांचे इंगित जाणतात. ज्या ठिकाणीं दुसऱ्या माणसांना दहा शब्द बोलावे लागतात तेथें त्यांचे एका शब्दांत काम होतें. जी गोष्ट खाजगी व्यवहाराची तीच सावेजनिक व्यवहाराची. वर्तैमानपत्रांहही अशीच सावधगिरीची भाषा. एक युद्धाचा समय सोडल्यास, एरहीं सामान्य व्यवहाराच्या कालांत इंग्रज माणूस तावातावाने बोलतांना किंवा वबदेळीवर आलेला दिसणार नाहीं, शब्दाशब्दी करण्याचा त्याचा कधींच विचार नसतो, तर स्वतःच्या लाघवी भाषेने आपल्या गिऱ्हाइकांना स्वतःकडे ओढणाऱ्या एखाद्या आजेबी दुकानदाराप्रमाणे, इंग्रज माणूस दुसऱ्याला आकर्षेण्याचा प्रयत्न करील, इंग्लंड व्यापाऱ्यांचें रा आहे ना ! तेव्हां ह्या मानसिक सोम्यपणाला लोकव्यवहारांत महत्त्व येणें साहजिकच आहे. ५< डूग्रजांच्या राजकीय बुद्धिमत्तेविषयीं विचार करतांना तर विदोषरच आश्चर्ये वाटतें. जागतिक इतिहासावरून इंग्रज माणसाच्या डोक्यांत राजकारणाचें सदेव थैमान चाललं असेल असे समजणे चुकीचे आहे. दोन जमन माणसें एका ठिकाणीं भेटली, तर अज्ञा आवेशाने तीं बोलतांना आढळतील, कीं जणुं काय साऱ्या जगाचे राजकारण त्यांच्या राहात्या खेड्याभोंवतींच घुटमळत आहे. परंतु इंग्रज माणसांचे तसे नाहीं. त्यांचे संभाषण हवामान, डा २9 ९७ ->- हे इंग्रज ! सणवार, उद्योगधंदा, मुलांचे शिक्षण ह्या गोष्टींनींच भरलेले आढळेल. कोठच्याही बिकट परिस्थितींतून इंग्रज माणूस स्वतःला चटकन बाहेर काढील. कोठच्याही राजकारणी-प्रश्नाचा काथ्याकूट करण्यापेक्षा, प्रत्यश. क्रियाप्रधान राजकारणामुळेच इंग्रजांना राजकारणी म्हणावयाचें. इंग्रजी भाषेंतील ' ५०] ” ८ 1॥१1४॥( हें शब्दच पाहा कसे सावघगिरीचे, राजकारणी आहेत. इंग्रज माणूस बोलतांना आवाज चढविणार नाहीं, डोळा फार वर उचलणार नाहीं; हातवारे करणार नाहीं, परंतु ह्या त्याच्या बाह्य सोम्यपणांतच सूक्ष्म, अंतस्थ राजकारणाचा वास येतो. ८ घरस्थ माणसाला इंग्रजाच्या घरांत सववत्र परंपरेचा आढळ होईल परंतु इंग्रज माणूस मात्र आपली स्वतंत्र व्यक्तिनिष्ठा दाखविण्याचा प्रयत्न करील. नाहीं म्हणावयास सभ्यता आणि विनय हीं मात्र सवे व्यक्तींच्या ठिकाणीं नमुन्यालायक आढळतील. पॅरिसपक्षां इंग्ठंड कितीतरी अधिक विनयशील अहि. त्या विनयांत रोमची कृत्रिमता नाहीं किंवा बर्लिनमधील पढिक शिस्त नाहीं. एखाद्या रस्त्यावर तिऱ्हाईत माणूस नांवाच्या पाट्या वाचीत किंबा घरांचे आंकडे शोधीत फिरतांना दिसला तर सहजच जाणारा त्याचा नवखेपणा जाणून “ झी दाखवू का तुमचा पत्ता १ ” असें सोम्यपणे विचारील. रस्त्यावरच्या दमल्या भागल्या पांथस्थाला चार पावले उचलून नेण्यास मोटारी थांबतील. ही दैनंदिन व्यवहारांतील सभन्यता हा इंग्रज माणसाचा मोठा आदरणीय विशेष आहे. ह्या सभ्यतेच्या पोटींच तडजोडीचा जन्म होऊन, इंग्रज माणसाला एकेरीवर येऊन ““ एक घाब, दोन तुकडे ” करून टाकण्यापेक्षा तडजोड करणे अत्यंत रुचतें. मतविरोधाचे पयवसान आत्यंतिक प्रक्षोभिक व्यक्तिविरोधांत क्रचितच होते. ह्यामुळेंच इंग्रज माणसाचे आयुष्य सदैव निष्कंटक अस दकत, आणि त्याच्याच जोडीला आयुष्य सुखावद्द करावयास त्याची विनोदवृत्तीही साहाय्यकच होते. “ मानवी गुणांचे, प्राकृतिक व आनुषंगिक असे भेद केल्यास विनोदवृत्ति हा इंग्रजांचा प्राकृतिक गुण मानतां येईल. विनोद म्हणजे ह्या देशांत नुसती क्षणिक हास्यवृत्ति किंवा पांडित्य नव्हे, तर तो इंग्रजांचा स्वभावच आहे. त्यांचा जीविताचा दृष्टिकोणच विनोदावर उभारलेला असतो. ह्या बिनोदवृत्तीमुळेच कोंठच्याही गोष्टी इंग्रज माणूस जिवाला लावून घेत नाहीं आणि त्या कारणानें नच 73 कांद्री माणसें थोड्याशा अनासक्तिमुळें जीवित त्याला सह्य ब सुखावह होते. विनोदवृत्ति हच सवे मानसिक रोगावरचें त्याचें ओषध. दुसरा कोठचाही माणूस किंवा दुसरे कोठचेंह्द। राष्ट्र, स्वतःच स्वतःची गंमत करतांना असं आढळणार नाहीं. ज्याच्या आंगीं विनोदव्रत्ति नाहीं त्याचा कुयोगच. कोणाच्याही ठिकाणीं शिष्टाचाराचा किंबा विनोदव्रत्तीचा अभाव इंग्रज माणसाला खपत नाहीं. ज्याला मोकळेपणीं हसतां येत नाहीं असा माणूस इंग्रजाला रुचत नाहीं. विनोद हँ इंग्रजी राष्ट्रांचे आराध्य दैवत आहे. क्वचित प्रसंगीं ह्या विनोटाचा अतिरेक होऊन गांभीर्यांला दूर लोटले जात असेल किंबा विनोदाच्या नांवावर उथळपणाला वावबह्ी मिळत असेल; परंतु विनोदीव्रत्तीचे युभ परिणाम मात्र अनेक आहेत. ह्या वृत्तीनेंच उत्कृष्ट वाड्याला जन्म दिला, जीवितांत सुख निर्माण केळे, सामाजिक स्नेहसंबंध उभारले व वर्गमिन्नतेचा कडवटपणा कमी केला. ह्या विनोदवृत्तीचें मूळ शोधीतच गेलों तर ते इंग्रजाच्या आद्यावादीपणांत आढळेल. लक्षावधि इंग्रजांना आयुष्यांतील सामान्य सुखसोयी सुद्धा पुरेशा मिळत नाहींत. परंतु इंग्रजी राष्ट्राच्या भाग्यांत त्यामुळे कांहींच फरक झाला नार्दी. प्राचीन दीघ इतिहासाने इंग्रजाला स्वतःच्या सुयोगावर विश्वास ठेवण्यास शिकविले आहे. फारच थोडीं इंग्रज माणसें निराऱोने खंगळेलीं आढळतील. कितीही अडचणी आल्या, किंबा कितीही प्रयत्न फसले तरी, पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहाण्यास इंग्रज माणूस कधींही सोडणार नाहीं. जमन लोकांचें ( व हिंदी लोकांचेही ) आयुष्यासंबंधीं वेराग्य, किंवा म्लाव्ह्‌ लोकांचा निराशावाद, इंग्रजांना अगदीं परका आहे. जेथे इतर लोक हातपाय गाळतात, तेथें इंग्रज माणूस म्हणतो, कीं“ धीर धर, पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहा.” अंतीं यश न मिळाले तरी, इंग्रज देवाला किंवा देवाला फारसा बोल लावणार नाहीं. आपली असमर्थता जाणून, खांदे उडवीत उडवीत तो दुसऱ्याच्या यशस्वी प्रयत्नाचेंच कोतुक करील. स्वतःपेक्षा इतरांना त्या कामीं अधिक यश आलें, असं तो समजेल. ह्या असूयेच्या अभावामुळेंच मोठमोठी श्रीमंत माणसें अगदीं दरिद्री बस्तींतून आपल्या उत्कृष्ट मोटार गाडींतून सुखाने संचार करूं दाकतात. कामकरी वर्गात येथे असूयेचें बीजारोपण करणें म्हणजे त्याला चांगलाच पद्धतशीर प्रचार हवा-तरीहि तें काम अदवाक्यच. डी ७५९ व्वा हे इंग्रज! “८ अशा रीतीनें ह्या मर्यादित ब्रिटिश बेटावर राहाणाऱ्या लोकांच्या आचारा- विचारांत एक प्रकारच्या मर्यादितपणाचा अंश आला तरीही त्या मयादेत मात्र इंग्रज माणसाला संपूर्ण स्वातंत्रय हवें असत. शिस्त ब संब्रम हीं त्याच्या स्वभावाशी, प्राचीन परपरेप्रमाणेंच, एकजीव झालीं आहेत, “८ : ठुसऱ्याच्या कामांत ढवळाढवळ करूं नका?, “ आपापले काम चोख करा?, ही इंग्रजाची शिकवण आहे. परंतु ह्याचा अथ इंग्रज सहवासप्रिय नाहीं, असा नव्हे. इतरांच्या सहवासाची त्याला फार आवड. आपणाप्रमाणेच आपल्या सहवासाने इतरांनाही सुस्व व्हावे, अशी त्याची इच्छा. भांडणापेक्षां तत्त्वबोधाकरितां वाद करण्याकडे त्याची प्रत्रत्ति. एखाद्या वेळीं खरडपट्टी काढण्याची पाळीच आली तर त्या वेळीं मात्र मागे पुढें पाहाणे नाहीं. परंतु असा प्रसंग क्वचितच यावयाचा. इंग्रजाच्या स्वभावांत थेडपणा फार, त्यामुळे हवामान किंवा खळ ह्याशिवाय इतर कांहीं चटकदार विषय संभापणांत झटकन निघणेंच कठीण, सारा समाजच्या समाज असा बोद्धिक थंडपणाने ग्रासलेला, न्यामुळें एग्वाद्याच प्रखर वुद्धिमानाला अगटीं एकएकस्यासारखें वाटतें. ““ राजाशी इंग्रज माणसाचे संबंध इतर ठिकाणांपेक्षां अगदीं भिन्न आहेत. राजाचा अंश राजाला दिल्यावर, उरलेला म्वतःचा अंश, तो डोळ्यांत तेल घाळून जपेल, आपल्या स्वतंत्र व्यक्तिनिष्ठेला बाघ येऊं देणार नाहीं. ह्या त्यांच्या एकाकी वृत्तीमुळे त्यांचे एकीकरण करणं फार कटीण होते. विशेषतः आर्थिक किंवा राजकीय चळवळी जबरदस्तीने घडवून आणणे इंग्रजांच्या बाबतींत फारसे शक्य नाहीं, त्यांचा स्वतःवरच विश्वास आणि भर अधिक. ह्याप्रमाणे इंग्रज माणसांच्या ठिकाणीं जबाबदारीची जाणीव, सामाजिक कार्याची आवड, प्रकृतीचा कणस्वरपणा व चिवटपणा हे गुण आढळतात. अशाच माणसांनीं, स्वतःकरितां व आपल्या देशाकरितां खपणाऱ्या ह्याच लोकांनीं, इंग्लंडला वेभब शिखरावर चढविले. ? ह्या वर्णनावरून हिंदी लोकांना कांहींच बोघ घेतां येण्यासारखा नाहीं का ६ स्वतंत्र, उदयोन्मुख जर्मन राष्ट्राचा एक नागरिक इंग्रजांचा स्वभाव इतक्या बारकाइने अभ्यासतो ब त्यांत त्याला व्यांच्या स्वभावाचे अनेक विदोष आढळतात. इंग्रज जमनांना निकटचे, तेजस्वी, प्रबल प्रतिस्पर्धी. स्वतःच्या प्रतिस्पध्याच्या स्वभावाचे ब आचारविचारांचे मार्मिक अवलोकन -- '७ र्क नर कांहीं माणसें करणे, हें राजनीतीचे एक महत्त्वाचे अंग आहे. आम्हां हिंदी लोकांना तर अश्या अध्ययनाची विदोषच आवश्‍यकता आहे. इंग्रज व इंग्रजी सस्था ह्यांच्या बाह्य रूपावरच लोभावून तेथेंच स्तब्ध होऊन न बसतां, इंग्रजांच्या अंतरंगाचा ठाव काढणे आम्हांला अत्यंत जरुरीचं आहे. प्रत्यक्ष सहवासाने हा परिचय झाल्यास ठीकच; परंतु तसा योग नच आल्यास, ज्यांनीं तसा परिचय करून घेण्याचा प्रयत्न केला आहि, त्यांच्या सांगण्याकडे तरी लक्ष द्यावं. ज्वानाच्या प्रमाणांत प्रत्यक्षाइतके--किंबहुना थोडे अधिकच--शब्दप्रमाणाला महत्त्व आहि, हें कोण नाकबूल करील ? >> ९७ षु न्न १ / “संगीत-स्तन”] तका तावात | “ सर्गाीत-रत्न ” | : संगीतरत्न ' ही त्याची जुनी पदवी होती. गाण्यांत तसा तो पट्टीचा निष्णात होता. त्याच त्याच्या गुणामुळे त्याला संगीत नाटक मंडळींत प्रथम प्रवेश मिळाला. मराठी रंगभूमीच्या उज्ज्बल कारकीर्दीचा तो काल होता. संगीत कंपन्यांची तेव्हां चलती होती. नटांना भरपूर काम असे. उत्कृष्ट अभिनयाला वाव होता. सुरेल संगीताला हवा तेवढा अवसर होता. अद्याप चित्रपट खृष्टि बाल्यांत होती. बोळपटाचा बोलबाला झाला नव्हता. आटोपशीर कालबद्ध संगीत निर्माण झालें नव्हतें. तेव्हां रंगभूमीवरच्या संगीताची मेफल झडे, श्रोते त्या प्रवाहांत यथेच्छ डुंबत. अशा काळांत त्याच्या गायनकलेला एंगभूमीचा भरपूर आश्रय मिळाला. त्याच्या कलेला तेज चढलें. नित्य नव्या नत्ग्लाईने ती नटूं लागली. त्याचा भरदार आवाज, सुरेल ताना, गाण्यांतील चमक, श्रोत्यांच्या जिवाला जाऊन भिडणारे आलाप, साऱ्यांचा अपूव परिणाम होऊन तो साहजिकच मानमान्यतेला चढू लागला, रंगभूमि गाजवू डागला. प्रेक्षक त्यावर निहायत संतुष्ट होऊं लागले. कंपनींत त्याचा दजा वाढला, नाटकी जगांत त्याचा लोकिक वाढळा. त्याच्या चाहात्यांनीं त्याला पंगीत-रत्न ही पदवी दिली. काय धन्यता वाटली त्याला ! तेव्हांपासून कोणत्याही वेळीं त्याचा उलेख संगीत-रत्न म्हणून होऊं लागला. कंपनीच्या फळकावर त्याच्या नांवामा्गे “संगीत-रत्न” झळकू लागलें. त्याला मूठभर मांस नढले. कंपनीच्या प्रतिष्ठेंेही थोडी भरच पडली. आपल्या सुमधुर गायनान श्रोत्यांना तो गोड धुंदींत ठेवी. श्रोतेही त्या अवीट आनंदाचा भरपूर आस्वाट जेत. गाणारा व ऐकणारे ह्या उभयतांमध्ये समरसता उत्पन्न झाल्यानें आनंदाचा आस्वाद तादात्म्यानें दोघांनाही घेतां येत असे. त्याच्या मुद्रेवर समाधानाचे तेज देसे. श्रोत्यांचा आनेद टाळ्यांच्या कडकडाटानें प्रसिद्ध होई. सजीवता व परसता ह्यांचा मधुर संयोग होत असे. परंतु कालळचक्राच्या फेऱ्यांत मराठी रंगभूमि सापडली व तिचे वैभव प्रोसरत चाललं. चित्रपट पुढ सरकू लागले व प्रेक्षकांचे लक्ष त्यांकडे वेधले. कांहीं माणसें स्ंगभूमीचा मांड बिघडू लागला. नटांचें कोतुक कमी झाळें, कंपन्या आटोपल्या, नट मोकळे झाले, गायनकला थांबली, अदा! स्थितींत ' संगीत-रत्नःही सापडल्यास नवल काय १ रंगभूमीवरून रिकाम्या झालेल्या ह्या निष्णात गायकाला जीवनाकरितां आपली गायकी आतां कोठें राबवावी, हा विचार 'पडला. सिनेमा आणि रेडिओ हींच काय तीं आतां लोकप्रिय व द्रव्यदायक ठिकाणें उरलीं, पेकीं सिनेमाचा अनुमव प्रथम घ्यावा असे त्याच्या मनांत आले, “* संगीत-रत्न ) सिनेमा कंपर्नींत शिरला. सिनेमाजगाइतके कृत्रिम ब चमत्कारिक जग दुसरें कोणतेंही नसेल. तेथे नटापेक्षां दिग्द्शकच सवेनियामक असावयाचा, लहानशा बंदिस्त जागेत, प्रकाशाच्या प्रखर झोतांत, माणसांच्या हजेरी-गेरइजेरींत नाना प्रकारचे देखावे तयार केळे जावयाचे, तुकड्यातुकड्यांनीं त्यांचे चित्रण व्हावयाचें व मग ते एकमेकांना जोडले जावयाचे ! प्रेक्षकांना सबंध चित्रपट सलग ब क्रमवार 'दिसला तर त्याचें प्रत्यक्ष चित्रीकरण मागंपुढे हेलकावत, ग्वण्डःशा अस्वाभविकपर्णे ब अगदीं निजींवपरगे होणार ! * संगीत-रत्न? ह्या क्रियेला कंटाळल्यास काय आश्चय्न १ तेथें गाण्याला वाव नाहीं, ऐकणारे श्रोते नाहींत , आनेदाच्या टाळ्या नाहींत, जिवंतपणाचा लवलेरा नाहीं. सारा कारभार यांत्रिक, आधीं तालमींनीं जीव अधमेला व्हाबयाचा, त्यानंतर प्रत्यक्ष पांच मिनिटांच्या देखाव्याची रुपेरी योजना करण्याची तासन्‌ तास खटयट आणि कटकट, दिग्दरशेकान “चळाव” म्हणतांच यान्त्रिक सुरुवात, मध्येच कोठें कांहीं ग्वुद्ट झाल्यास एकदम “कट” म्हणून सारा प्रग्रोग बंद, पुनश्च व्यवम्था, पुनश्च प्रारंभ, एक कीं दोन. ह्या निरकंथ फापट पसाऱ्यानं खऱ्या कळावंताचा जीव हराण होई, शिवाय इतकें करून गाणें तरी मोकळेपणीं आहि म्हणावे, तरी तही नाहीं. चाली कोठल्यातरी सामान्य, वेळाचें नियन्त्रण--कारण फिल्मची लांत्री मर्यादित. त्यावर कळस म्हणजे अडाणी दिर्दशंकांचा जाच ! कंटाळला ब्रिचाऱ्याचा जीव ह्या तापत्रज्राला आणि एक दिवस तो सिनेमा जगाच्या बाहेर पडला. किती मोकळें वाटले त्याला त्या वेळीं ! त्याच्या गाण्याच्या गुणामुळे त्याला रेडिओवर गाण्याचेंही आमंत्रण येड, घसाही मिळे त्याबद्दल, परतु त्या गाण्यांत त्याचा जीव उमटेना, कांचेच्या वद स्वोलींत, निर्जीव यन्त्रासमोर, अज्ञात व अदृष्ट श्रोत्यांकरतां गातांना न्याच्या -- ७ द र “ संगीत-रत्न मनाला समाधान होत नसे. गाण्याची खरी सजीव रंगत ही सहसंवेंदनेविना कशी येणार १? व जिवंत श्रोत्यांशिवाय संवेदना कशी निर्माण होणार १ गायकाने गावे, श्रोते मंत्रमुग्ध नागाप्रमाणं डोलावेत, श्रोत्यांच्या * चेहेऱ्यावर आनंद व गायकाच्या मुद्रेवर समाधान खेळावे, तेव्हां गाण्याला खरा रंग चढावयांचा. त्याच्या कलाप्रेमी अंतःकरणाला यन्त्रापुढच्या गाण्याने काय समाघान वाटावे ? तथापि पोट त्याला तसळें गायन करावयास लावी. गाण्याच्या भरांत येऊन एखाद। आलाप अधिक वाढवाबा ता तेथच्या नियामकाने वेळ संपल्याची सूचना देऊन कायक्रम थांबबाबा व त्याला बाजूला करून दुसऱ्या गायक-वादकाला पुढे करावें, असाही प्रकार होई. बिचारा हिरमुसला होऊन आपल्या वाटेला लागे. रेडिओवरच्या गाण्याने पोट भरे पण मन मरे. रंगभूमीच्या आठवणीने त्याचें चित्त ब्याकुल होई. पुन्हा कधीं रंगभूमि मिळेल का, ह्याचा त्याला ध्यास लागे. गुर्जर रंगभूमीने त्याची कीर्ति ऐकली होती. मराठी रंगभूमि पडली पण गुजर रंगभूमि अद्याप चांगली शाबूत होती. तिच्या संपन्न चाहात्यांचा तिजवरचा लाभ कमी झाला नव्हता. पैशाच्या पाठबळामुळे तिचे मालक मोठ्या आनंदांत होते. नटांना तनखाही भरपूर मिळे. कित्येक दोंकडे पगाराचे भारी नट गुजर रंगभूमि सहज पोपूं शके. आमच्या “' संगीत रत्ना “ला अशाच एका संपन्न मालकाने आश्रय दिला, पांच-सह्ादोंचा पगार त्याच्या गांबींही नव्हता. मराठी रंगभूमीचा पूवीचा एक नामांकित गायक आपल्या पद्रीां आहे, हेच त्याचें मोठें समाधान होतें. त्याच्या गायकीचा त्या रंगभूमीला उपयोग नव्हता, प्रेक्षकांना खेचून आणण्याचे सामथ्ये त्याचे ठिकाणीं नव्हते, हे जाणूनही मालकाने त्याला आपल्याजवळ ठेवलें. द्रव्याच्या लोभाने तोही दाखल झाला. निर्जीव यन्त्रापेक्षां पुन्हा सजीव रंगभूमि मिळाली ह्याचाच त्याला आनंद वाटला. पण काय चमत्कार ! त्याच्या कलेला द्रव्याने भरते येई ना. गुजेर रंगभूमि त्याच्या गायकीला निष्प्राण वाटूं लागली. तो गाऊं लागला, कीं तबलजीला ठेका धरणेंही कठीण होऊं लागलें. पेटीबाल्याला कधीं कधीं सूर सापडत नसे. इतर साथीदारांची धांदल विचारूच नका. शिवाय ज्यांच्याकरितां गावयाचं त्या प्रेक्षक श्रोत्यांना त्याची मुळींच आवड नाहीं, त्याची रागदारी जागच्या जागीं कांहीं माणसं जिरून जाई. आलाप तोंडांतच घोटाळत. ताना मान मोडून मागच्या मागें नाहींशा होत. केवळ आपल्या अंतरात्म्याची भूक भागविण्याकरितां चार दोन लकेरी तो घेर. समोरच्या प्रेक्षकांच्या अनास्थेचा त्याला उद्देग बाटे, त्याची सारी मानसिक ब्यथा त्याच्या मुद्रेवर दिसूं लागे. आपल्या बंडखोर मनाला आंतल्या आंत आवरून तो आपली होस आपली आपणच भागवून घेई. त्याच्या कलेला काल आणि ताल दोन्हीही मिळेनात. बेचेन मनाने रंगभूमीबर रेंगाळतांना त्याचीं पावलें जड होत. परंतु तें सवे दुःख गिळून तो आपलें काम कसेतरी पार पाडी, अजूनही त्याच्या नांवाचा उछेख ' संगीत-रत्न ) ह्या पदवीने होत असे. पण आतां त्या पदवींत प्राण राहिला नव्हता. त्या शुंगारांत सजीवपणा नव्हता. त्याच्या *:' 7५५४५" ती पदवीही आतां केवळ नाटकी होती ! गुजर मालकाच्या प्रोढीचा तो एक विषय होता. मराठी रंगभूमीचा हा “ संगीत-रत्न ” गुर्जर रंगभूमीवर जेव्हां स्वरालाप काढी तेव्हां त्याच्या सुरांत एक करुण विषादाचा स्वर तरंगे --आणि तो त्या गायकाप्रमार्णेच जाणत्यांचे अंतःकरण कापीत जाई ! -- ७ € न भे १ पोऱ्या | त्याचें खरे नांव होतें महादेव. त्याची आई त्याला हाका मारी म्हाद्या. लोक त्याला म्हणत पोऱ्या. त्याचें कारण असे, कीं तो एका होंटेलांत नोकरीला होता. त्याचें वय नोकरी करण्याचे नव्हत खरें, परंतु त्याला नोकरी करण्या- खेरीज चालण्यासारखेंच नव्हते. गरिबांच्या बाबतींत वयापेक्षा पोटाचाच विचार नोकरीच्या बाबतींत महत्त्वाचा असतो. तसे म्हटलें तर शाळेत शिकण्याचेच त्याचें वय होते. त्याचें शाळेत नांवही होतें. परंतु मनावर विद्येचा संस्कार नाहीं, भोवतीं शिक्षणाची आवड उत्पन्न करणारें वातावरण नाहीं, स्वस्थपणे पुस्तकी अभ्यास करण्यास घरांत अनुकूल स्वास्थ्य नाहीं, तेव्हां शाळेचा व त्याचा संबंध केवळ नांवापुरताच राहिला तर नवल काय १ महाद्या ( त्याचे शाळासोबती त्याला महाद्याच म्हणत ) शाळेंत गेलाच तर कधीं वेळेवर जात नसे. त्याच्या पाटीपुस्तकांचा पत्ता नसायचा. त्याच्या डोक्यांत ज्ञान नसल्यामुळें मास्तरांच्या प्रश्नांची उत्तरें त्याला येत नसत. मास्तरांचें सवे शिक्षण त्याच्या पाठीलाच मिळत असे. त्या तालमींत तयार झाल्याने बरोबरीच्यांशीं गुंडगिरीनें वागण्यांत महाद्या कोणालाच हार जात नसे. आपल्या शक्तीची जाणीव तो रोज एखाददुसऱ्या सोबत्याला देई. रोज त्याच्या कांहीं ना कांहीं खोड्या आईच्या कानांवर जात. उरलेसुरले धपाटे आई त्याला देत असे. शेवटीं, झालें तेवढें शिक्षण बस्स झालें. असं समजून आईने एक दिवस त्याला एका होंटेलवाल्याच्या स्वाधीन केला आणि तेव्हांपासून तो “ पोऱ्या ” झाला, आईने तरी काय करावें १ घरांत दारिद्य, कर्ता पुरुष कोणी नाहीं, सारा संसाराचा भार डोक्‍यावर, घरांत चार कच्चींबश्ीं, मुलगा हा असा अवखळ. कोठेतरी त्याला डांबून तर टाकावयास हवें ? चार घरचीं चार काम करावयास बिचारी बाई जाणार ! पोरावर लक्ष तरी कोण ठेवतो ! तेवढाच गुंतलेला असला तर बरा. शिवाय कांहीं चार-पांच रुपये मिळविल्यास तेवढाच संसाराला हातभार | त्यांतही हॉटेलसारख्या खाण्यापिण्याचे जागीं राहिला तर तेवढेंच त्याचें पोट बाहेर निघावयाचें ! गरीब बिचारी कामकरी बाई ! तिने मुलाच्या भवितव्याचा अधिक विचार तो किती व कसा करावयाचा १ पली २७७९ ऱ्य कांहीं माणसे शेवटीं म्हाद्या हॉटेलांत “ पोऱ्या ?” बनला, प्रथम त्याची योजना कपबशा विसळप्याच्या कामावर झाली. सकाळीं रामप्रहरी म्हाद्या कामावर दाखल होइ. कळकट, फाटका पोशाख चढविलेली म्हादबांची स्वारी पाहून बाहेर कोणीही त्याला हॉटेलपोऱ्या म्हणून ओळस्यू शके. खांद्यावर तितकेंच एक कळकट फडकें टाकून महाद्या आपल्या कामावर बसे, उष्स्या कपबऱ्यांच्या चळतीच्या चळती त्याच्या जवळ येऊन पडत. त्या धुण्याचे काम त्याचें असे. धुणे हं मोठें नांव व्यथेच होते. दोन लाकडी पिपांत भरलेल्या पाण्यांतून त्या कपबशा फक्त बुचकळून काढावयाच्या असत. दोन्ही पाण्यांचा रंग अगदीं काळवंडून त्याच्या आंगावरील काळ्या कपड्याशीं बरोबरी करीत होता. त्याच पाण्यांत शेकडों कपबश्या बुचकळून निघत होत्या. उलस्या निथळून पालथ्या टाकल्या कीं म्हाद्याचें धुण्याचे काम पुरे होई. सारखे त्या घाणेरड्या पाण्यांत बुचकळून राहिल्याने त्याच्या हाताचे पंजेही खराच झाले होते. पण त्याचें कपबशा धुण्याचे काम चालूच होतं. मधून मधून पिपांतील पाणी बदलणे, कपाळावरचा घाम. आंगावरच्या घामट आंगरख्यान पुसणं, मध्येच तलफ आल्यास व मालकाचे लक्ष नसल्यास कोणाकडून तरी एखादें विडीचें थोट्ूक मिळवून त्याचे दोन झुरके घेणें, हेही त्याचे व्यवसाय चालत. तोंडाने शीळ घालावी, हातानें कपबश्या ग्वडखडाव्यात, मध्येंच शोजारच्याला एखादी इरसाल ठावी द्यावी, मांबच्या सिनेमाच्या गप्पा माराव्यात - मोठें मजेचें वाटे तें आयुष्य त्याला. मालक सकाळीं नास्तापाणीही देई. बंब्रांतील चहाचे कळकट पाणी, शिळावलेलीं शेकरपाळीं किंबा चिवडादोव हींही त्याला अमृताप्रमाणे वाटत, खरंच आहे, घरीं शिळ्या. भाकरीचे तुकडेही मिळण्याची मारामार, तेथें हीटेलच्या चवीचे पदार्थ महाय़ानें मिटक्या मारीत खाले तर त्यांत नवल वाटण्यासारखे काय आहे १ मध्यरात्री पावेतों महादबांचे कपनशा विसळण्याचे काम सतत चालत राही. मध्यरात्र. झाली म्हणजे म्हाद्या आपली फाटकी, कळकट गोधडी तेथेच फळकुटावर पसरी आणि त्यावर पहुडे. झोपेच्या बाबतींत कुंभकर्णांचा त्याच्यावर वरदहस्तः होता. शरीराची मुटकुळी करून एकदा मह्वाद्या पडला, कीं कोणीं त्याला उचठून नला तरी त्याला त्याची दाद लागली नसती. दिवसाचा शीण म्हणा किंबा त्याचें पोरवय म्हणून म्हणा, पण त्याला झोप गाढ लागे इतकें मात्र खास. सूर्यकिरणांनीं सुद्धा म्हाद्या जागा होत नसे. मालक एकदा आंगावर वसकन क वा पोऱ्या ओरडला, त्यानें बकोटें घरून खसकन त्याला ओढलें, म्हणजे म्हाययाची स्वारी डोळे चोळीत जागी व्हावयाची, मोठ्या कष्टाने आंगाला आळोखे पिळोखे देऊं लागावयाची. पुन्हा एकदा मालकानें त्याच्या नांवाचा उद्घार करावयाचा, एखादा धपाटा पाठीवर चढवावयाचा, तेव्हां मग पोऱ्या आपल्या आंथरुणाच्या चिंध्या खाकोटीला मारून आंत निघून जावयाचा, झालें, दिवस उजाडला, महाद्या आपल्या कामावर रुजू झाला. म्हाद्याच्या आंगवळणीं पडत चालले होते हें आयुष्य. मधूनमधून त्याची आईही चोकशी करून जावयाची. महिन्याकांठीं मालकाकडून त्याचा पगारही ती नेई. पगार म्हणजे सारे चार पांच रुपये, पण त्यांचीही तिला धन्य वाटे. कांहीं दिवसांनीं म्हाय्यालळा बढती मिळाली, कपबशा विसळण्याच्या कामावरून चहा देण्याच्या कामावर तो चढला, त्याच्या मूळच्या जागीं दुसरा एक मुलगा येऊन दाखल झाला. म्हाद्याच्या आंगीं मोठेपणा दिसूं लागला. नव्या कपविसळ्या पोऱ्यावर तो संधि सापडेल तेव्हां खेकसू लागला. गिऱ्हाइकांना चहा देतांना पोर्‍्याच्या डोळ्यांत वेगळेच पाणी खेळूं लागलें. मधूनमधून बाहेरची चहाची “ ऑडर? आली, कीं कपब्ररयांची उभी चळत घेऊन महादबाची स्वारी एखादा फेरफटकाही करून येई. तेव्हांचा त्याचा थाट मोठा पाहाण्यासारखा असे. कानावर एखादें विडीचे थोडक झळकत ठेवून तो बाहेर पडे. तोंडाने सिनेमाच्या गाण्याची शीळ घाली. “ मेरा बुलबुल-सो रहा हे ” म्हणून एखादी कर्केशा लकेर मारतांना तो असा कांद्दीं अभिनय करी, कीं जणूं कांहीं त्याची मनोरम प्रेयसीच त्याच्या समोर एखाद्या पर्येकावर पहुडलेळी आहे. सिनेमांतील गुंगार प्रसंग व त्यावेळचीं गाणीं ह्यांचा त्याच्यावर इतका परिणाम होई, कीं त्याला अगदीं बेचेन झाल्यासारखे वाटे. त्याच्या बाह्य रूपांत म्हणण्यासारखा फरक झाला नव्हता पण त्याचें अंतःस्वरूप हळूहळू पालटत चालल होते. आपण आतां मोठे होत चाललों आहां, ह्याची त्याला पुसट जाणीव होऊं लागली होती. कप विसळणाऱ्या पोऱ्याचे रूपांतर झाळे. आतां हॉटेलांतील वरच्या जागेचा * चार्जे) आपणाला मिळावा असें त्याला वाटूं लागले. गिऱ्हाइकांच्या * ऑडरी ' घेऊन “ एक इसम चार आणे ” म्हणून मोठ्या आवाजांत आपण केव्हां फरमावू ह्याची तो मनांतल्या मनांत वाट पाहूं लागला. त्याच्या मनानें ती मोटी मानाची जागा होती. झोपेतही --€ १ पे कांहीं माणसं त्याला तीं सुखस्वबपनें पडत ब मध्येच तो “' एक इसम चार आणे” म्हणून ओरडे. मालकाच्या हॉटेलविषयींही त्याला आतां थोडी आपुलकी वाटूं लागली. “' पोऱ्या ” म्हणून हाक मारतांना मालकाच्या आवाजांतही थोडा सोम्यपणा आला. गिऱ्हाइकांच्या “ पोऱ्या ? म्हणून हाकांना हजर राहातांना मात्र म्हाद्याचा जीव टेकीला येई. टेबलावर खांद्यावरचे फडकें फिरवायचे, गिऱ्हाइकांना चहाची पुरवणी करावयाची, रिकाम्या कपबश्या आंतल्या घरांत पोहोंचवायच्या, बाहेरच्या “' ऑडंरी ” मधूनमधून संभाळायच्या, ह्या साऱ्या ब्यवसायांत महादूच्या जिवाची लगबग कांहीं विचारूं नका. ह्या साऱ्या दंगलींत घर, शाळा, भावंडे, आई ह्यांचीही त्याची आठवण बुजत चालली. त्याचा पगारही आतां दोन चार रुपयांनीं वाढला, दिवसांतून एखाद्या वेळीं थोडें चहाचे पाणीही त्याला अधिक मिळे. नासत्याच्या वेळीं दोन घास खाद्य स्वतःच्या हातानें अधिक घेतल्यास मालक आतां पूर्वीसारखा त्याच्यावर गुरगुरत नसे. मालकाच्या ओरडण्याची त्याला आतां मागल्यागत भीतीही वाटत नसे. एवंच म्हाद्या आतां त्या जगांत अगदॉं रंगून गेला होता, त्या कळकट कपड्यांच्या आंतील पोऱ्याच्या डोक्यांत “ चहा, चिवडा, ( आणि चिरूट )? ह्याशिवाय वेगळा विचारच येत नव्हता. “८ पोऱ्या ” मोठा होत चालला. असेच त्याचें सगळें आयुष्य जाणार ! हेंच स्याचें जग आणि हेंच त्याचें जीवित ? ह्याच जगांतील तरी त्याचीं मुखस्वभें खरीं होणार कीं जन्मभर तो * पोऱ्या? च राहाणार १ स्य ८ र >>